Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

येरवडा कारागृहातून जन्मठेपेची शिक्षा भोगणारा कैदी पळाला; जेवून येतो म्हणून गेला अन्…

खूनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगणारा आरोपी येरवडा खुल्या जिल्हा कारागृहातून पळून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना 8 मे रोजी दुपारी दीड ते सायंकाळी सहाच्या दरम्यान घडली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 12, 2026 | 05:40 PM
येरवडा कारागृहातून जन्मठेपेची शिक्षा भोगणारा कैदी पळाला; जेवून येतो म्हणून गेला अन्...

येरवडा कारागृहातून जन्मठेपेची शिक्षा भोगणारा कैदी पळाला; जेवून येतो म्हणून गेला अन्...

Follow Us
Follow Us:

पुणे : खूनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगणारा आरोपी येरवडा खुल्या जिल्हा कारागृहातून पळून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. येरवडा कारागृहातील शेतीत सापडलेल्या मोबाईलच्या चौकशीच्या भीतीने तो पळाल्याची प्राथमिक माहिती आहे. संतोष लक्ष्मण भिंगारे (मुळ रा. पाचवड, ता. वाई, जि. सातारा) असे कारागृहातून पळून गेलेल्या कैद्याचे नाव आहे. याप्रकरणी तुरुंगाधिकारी श्रेणी २ नागनाथ महादेव भानवसे (वय ५५, रा. मांजरी) यांनी येरवडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना 8 मे रोजी दुपारी दीड ते सायंकाळी सहाच्या दरम्यान घडली आहे.

 

पोलिसांच्या माहितीनुसार, भिंगारे याला साताऱ्यातील भुईज पोलिस ठाण्यात दाखल खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. हा कैदी कोल्हापूर खुल्या जिल्हा कारागृहातून १९ ऑक्टोबर २०२५ पासून येरवड्यातील जिल्हा खुल्या कारागृहात वर्ग करण्यात आला होता. त्याला केशकर्तनालयात काम देण्यात आले होते. दरम्यान अधिक्षकांसह वरिष्ठ तुरुंगाधिकारी हे ८ मे रोजी कारागृहाच्या शेती विभागाची पाहणी करत होते. तेव्हा तुती बागेतजवळ बेवारस, सिमकार्ड नसलेला मोबाईल आढळून आला.

या मोबाईलसंदर्भात भिंगारेसह दुसऱ्या एका कैद्याची चौकशी केली जाणार होती. दरम्यान, घटनेच्या दिवशी तो सायंकाळच्या जेवणानंतर येतो” असे सांगून बराकीकडे गेला. मात्र चौकशीसाठी पुन्हा बोलावले असता तो बराकीत आढळून आला नाही. कारागृहातील शेती व परिसरात शोध घेतला असता भिंगारे सापडला नसल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सत्रे करत आहेत.

हे सुद्धा वाचा : NEET पेपरफुटीचा ‘नाशिक’ पॅटर्न उघड! हरियाणा ते बिहार पसरले धागेदोरे; नाशिकमधून ३० वर्षीय संशयिताला अटक

धारधार हत्याराने सपासप वार करून तरुणाचा खून

आंबेगाव पठार परिसरात अनैतिक संबंधातून एका तरुणाचा डोक्यात लाकडी पाट तसेच धारधार हत्याराने सपासप वार करून खून करण्यात आल्याची घटना रविवारी रात्री घडली आहे. दरम्यान, दोघांनी या तरुणाचा खून केला असून, दोघेही पसार आहेत. त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती आंबेगाव पोलिसांनी दिली. दिपक क्षीरसागर वय (३८, रा. आंबेगाव) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी आंबेगाव पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत दिपक याच्या बहिणीने पोलिसांकडे तक्रार दिली आहे.

Web Title: A prisoner serving a life sentence has escaped from yerwada jail

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 12, 2026 | 05:40 PM

Topics:  

  • crime news
  • Jail
  • pune news

संबंधित बातम्या

गाडीवर आमदाराचा लोगो लावून फिरणं पडलं महागात! पोलिसांनी कार जप्त करून मालकावर केला गुन्हा दाखल
1

गाडीवर आमदाराचा लोगो लावून फिरणं पडलं महागात! पोलिसांनी कार जप्त करून मालकावर केला गुन्हा दाखल

मोबाइलच्या वादातून तरुणाची दगडाने ठेचून हत्या, दारूच्या नशेत हल्ला; यवतमाळमधील घटनेनं खळबळ
2

मोबाइलच्या वादातून तरुणाची दगडाने ठेचून हत्या, दारूच्या नशेत हल्ला; यवतमाळमधील घटनेनं खळबळ

गणेश विसर्जन मिरवणुकीत पोलिसांना अरेरावी, भाजप तालुकाध्यक्षासह 14 जणांवर गुन्हा; नेमकं काय घडलं?
3

गणेश विसर्जन मिरवणुकीत पोलिसांना अरेरावी, भाजप तालुकाध्यक्षासह 14 जणांवर गुन्हा; नेमकं काय घडलं?

Pune Graduate Constituency:जागावाटपावर महायुतीत अद्याप चर्चा नाही; राजेश पांडेंचा मोठा दावा
4

Pune Graduate Constituency:जागावाटपावर महायुतीत अद्याप चर्चा नाही; राजेश पांडेंचा मोठा दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.