Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tuljapur News : तुळजापुरात तणाव, नगराध्यक्ष विनोद गंगणे यांच्यावर हल्ला; नेमकं काय घडलं?

तुळजापूर नगर परिषदेचे नगराध्यक्ष विनोद उर्फ पिटू गंगणे यांच्यावर दिनांक २३ मे रोजी रात्री जीवघेणा हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणामुळे तुळजापूर शहरात खळबळ उडाली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 25, 2026 | 12:20 PM
तुळजापुरात तणाव, नगराध्यक्ष विनोद गंगणे यांच्यावर हल्ला; नेमकं काय घडलं?

तुळजापुरात तणाव, नगराध्यक्ष विनोद गंगणे यांच्यावर हल्ला; नेमकं काय घडलं?

Follow Us
Follow Us:
  • नगराध्यक्ष विनोद गंगणे यांच्यावर हल्ला
  • हल्ल्यामुळे तुळजापूर शहरात खळबळ
  • नेमकं काय घडलं?
तुळजापूर : तीर्थक्षेत्र आई तुळजाभवानी मंदिर परिसर अतिक्रमणमुक्त करण्यासाठी सुरू असलेल्या मोहिमेला विरोधाचे स्वर उमटत असतानाच तुळजापूर नगर परिषदेचे नगराध्यक्ष विनोद उर्फ पिटू गंगणे यांच्यावर दिनांक २३ मे रोजी रात्री जीवघेणा हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणामुळे तुळजापूर शहरात खळबळ उडाली असून, अतिक्रमण हटाव मोहिमेभोवतीचे तणावपूर्ण वातावरण पुन्हा चर्चेत आले आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, अतिक्रमणमुक्त तीर्थक्षेत्र मोहिमेचे नेतृत्व करणारे नगराध्यक्ष गंगणे यांना वैजिनाथ सुरवसे याने रात्रीच्या वेळी अडवून गच्ची धरत मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेनंतर शहरातील राजकीय व सामाजिक वर्तुळात संताप व्यक्त होत आहे.

तुळजापुरात अतिक्रमणविरोधी मोहीम तीव्र

दरम्यान, तुळजाभवानी मंदिर परिसरातील बालभिक्षुकरी व भीक मागणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नावरही नगराध्यक्षांनी गंभीर भूमिका घेतली आहे. बाहेरून येणाऱ्या भाविकांना यामुळे त्रास सहन करावा लागत असून, आगामी काळात या सर्वांचे पुनर्वसन करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. “काही ज्येष्ठ नागरिकांना बाहेरून तुळजापूर येथे आणून सोडले जाते आणि ते येथे भीक मागतात. अशा नागरिकांना वृद्धाश्रमात दाखल करण्याची कार्यवाही केली जाईल,” असेही गंगणे यांनी नमूद केले. अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे तुळजापूर शहरात प्रशासन आणि अतिक्रमणधारक यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होत असल्याचे चित्र असून, आगामी काळात या प्रश्नावर आणखी घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हे सुद्धा वाचा : आंबेनळी घाटात स्कॉर्पिओ ८०० फूट खोल दरीत कोसळली; 8 मित्रांची अकाली एक्झिट

हातगाडी अतिक्रमणावर प्रशासनाने उचलला बडगा

याबाबत प्रतिक्रिया देताना गंगणे म्हणाले, “अशा भयाड हल्ल्यांमुळे अतिक्रमणमुक्त मोहीम थांबणार नाही. ती अधिक कठोरपणे सुरू राहील.” यापूर्वीही अतिक्रमणाच्या मुद्यावरून फोनवरून जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या होत्या, असेही त्यांनी सांगितले. तुळजापूर शहरातील रस्त्यांच्या कडेला हातगाड्या व व्यवसायिक अतिक्रमणे वाढत असून त्यामागे मोठे अर्थकारण कार्यरत असल्याचा आरोपही त्यांनी केला. काही व्यक्ती हातगाडी धारकांकडून पैसे गोळा करीत असल्याचा दावा करत नियमित कारवाई होणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

हे सुद्धा वाचा : CET निकालानंतर मानसिक तणाव, विद्यार्थिनीने राहत्या घरी संपवलं जीवन; पुण्यातील घटना

Web Title: A shocking incident of attack on vinod gangane has taken place in tuljapur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 25, 2026 | 12:20 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • crime news
  • tuljapur news

संबंधित बातम्या

बेपत्ता अल्पवयीनाचा नदीपात्रात आढळला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिसांच्या तपासावर आक्षेप
1

बेपत्ता अल्पवयीनाचा नदीपात्रात आढळला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिसांच्या तपासावर आक्षेप

Police Destroy Seized Drugs: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ३४३ किलोहून अधिक गांजाची विल्हेवाट
2

Police Destroy Seized Drugs: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ३४३ किलोहून अधिक गांजाची विल्हेवाट

Crime News: मेरठच्या ‘ब्लू ड्रम’ हत्याकांडाचा आज निकाल; मुस्कान-साहिलच्या शिक्षेचा मार्ग मोकळा होणार?
3

Crime News: मेरठच्या ‘ब्लू ड्रम’ हत्याकांडाचा आज निकाल; मुस्कान-साहिलच्या शिक्षेचा मार्ग मोकळा होणार?

कसायाचा भयंकर प्रकार! महिलेचा गळा चिरला अन् तुकडे करून कालव्यात फेकले; टॅटूवरुन झाला खुलासा
4

कसायाचा भयंकर प्रकार! महिलेचा गळा चिरला अन् तुकडे करून कालव्यात फेकले; टॅटूवरुन झाला खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.