दगडाने ठेचून गुंडाची हत्या
पुणे : राज्यात गुन्हेगारी वाढली असून, पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. आंबेगाव बुद्रुक परिसरात एका महिलेचा खून करून तिचा मृतदेह सर्व्हिस रोडलगत असलेल्या नाल्याजवळ टाकून देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. खून कोणी आणि कशामुळे केला, हे स्पष्ट झालेले नसून, त्याबाबत पोलिसांचा तपास सुरू आहे.
प्रिती सचिन वखारे (वय ३१, रा. खोपडेनगर) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी सरकारतर्फे सहाय्यक निरीक्षक समीर कदम (वय ४२) यांनी भारती विद्यापीठ पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानूसार, अज्ञात आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २१ मे रोजी उघडकीस आली होती. याप्रकरणात अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. तपासानंतर पोलिसांनी खूनाचा गुन्हा नोंदवला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात शहरात मुसळधार पाऊस सुरू होता. पावसातच आंबेगाव बुद्रुक परिसरातील धबाडी येथील सर्व्हिस रोडलगत असलेल्या नाल्याजवळ दगडात एका महिलेचा मृतदेह असल्याची माहिती भारती विद्यापीठ पोलिसांना मिळाली. त्यानूसार, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. महिलेची ओळख पटली नव्हती. मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी ससून रुग्णालयात पाठविला. तसेच, याप्रकरणात आकस्मात मृत्यूची नोंद केली. तपास सुरू केल्यानंतर महिलेची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले.
महिला घोपडेनगर येथील प्रिती वखारे असल्याचे समोर आले. दरम्यान, शवविच्छेदनात तिच्या अंगावर मारहाणीच्या खूना आढळल्या. त्यानूसार पोलिसांनी याप्रकरणात खूनाचा गुन्हा नोंदवला आहे. अद्याप खूनाचे कारण स्पष्ट झालेले नसून, आरोपीही अज्ञात आहेत. अधिक तपास भारती विद्यापीठ पोलीस करत आहेत.
हे सुद्धा वाचा : ग्रामसभेत प्रश्न विचारला म्हणून एकावर हल्ला; लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण