Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime : धारधार हत्याराने सपासप वार करून तरुणाचा खून; धक्कादायक कारणही आलं समोर

आंबेगाव पठार परिसरात अनैतिक संबंधातून एका तरुणाचा डोक्यात लाकडी पाट तसेच धारधार हत्याराने सपासप वार करून खून करण्यात आल्याची घटना रविवारी रात्री घडली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 12, 2026 | 12:30 AM
धारधार हत्याराने सपासप वार करून तरुणाचा खून; धक्कादायक कारणही आलं समोर

धारधार हत्याराने सपासप वार करून तरुणाचा खून; धक्कादायक कारणही आलं समोर

Follow Us
Follow Us:

पुणे : राज्यासह देशभरात गुन्हेगारीच्या घटना वाढल्या असून, दररोज खून, खुनाचा प्रयत्न यासारख्या गंभीर घटना उघडकीस येत आहेत. अशातच आता पुण्यातून एक मोठी घटना समोर आली आहे. आंबेगाव पठार परिसरात अनैतिक संबंधातून एका तरुणाचा डोक्यात लाकडी पाट तसेच धारधार हत्याराने सपासप वार करून खून करण्यात आल्याची घटना रविवारी रात्री घडली आहे. दरम्यान, दोघांनी या तरुणाचा खून केला असून, दोघेही पसार आहेत. त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती आंबेगाव पोलिसांनी दिली.

 

दिपक क्षीरसागर वय (३८, रा. आंबेगाव) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी आंबेगाव पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत दिपक याच्या बहिणीने पोलिसांकडे तक्रार दिली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, दिपक हा पुणे महापालिकेत पाणी पुरवठा विभागात कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने काम करत होता. त्याचे या भागातील एका आरोपीच्या नात्यातील महिलेशी अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. त्यावरून रविवारी रात्री साडे नऊच्या सुमारास दिपक हा इंद्रायणीनगर येथून पायी जात असताना दोघांनी त्याला गाठले. तसेच त्याच्याशी वाद घालत, त्याच्या डोक्यात लाकडी पाट घातला. त्यानंतर त्याच्यावर धारधार हत्याराने सपासप वार करून त्याचा खून केला. खूनानंतर आरोपी पसार झाले. भररस्त्यात गर्दीच्या वेळीच खून झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच आंबेगाव पोलिसांनी येथे धाव घेतली. पसार झालेल्या आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत.

हे सुद्धा वाचा : दारूच्या नशेत पतीचा हैवानपणा! नातवांसमोर पत्नीची कुऱ्हाडीने निर्घृण हत्या; काय घडलं नेमकं?

ब्युटीपार्लर चालक तरुणीचा गळा दाबून खून

केशवनगर येथील कचरा डेपोच्या रोडलगत गळा दाबून तरुणीचा खुन करुन तिला फेकून दिलेल्या प्रकरणाचा उलघडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. गुन्हे शाखा आणि मुंढवा पोलिसांनी एका कॅबचालकाला याप्रकरणी अटक केली असून, पैशांच्या वादातून हा खून झाल्याचे समोर आले आहे. गोरखनाथ देवराम शिंदे (वय ४२, रा. विडी कामगार वसाहत, चंदननगर) असे या कॅबचालकाचे नाव आहे. आफरीन सलीम पठाण (वय २९, रा. वडगाव शेरी) असे खुन झालेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी मुंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद आहे.

Web Title: A shocking incident of murder of a young man has taken place in pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 12, 2026 | 12:30 AM

Topics:  

  • crime news
  • Murder Case
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

Crime News: सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर निधीच्या मृत्यूने खळबळ; आईने केले गंभीर आरोप
1

Crime News: सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर निधीच्या मृत्यूने खळबळ; आईने केले गंभीर आरोप

Baramati Crime: माळेगाव हादरले! गजबजलेल्या राजहंस चौकात दोन तरुणांवर कोयत्याने प्राणघातक हल्ला
2

Baramati Crime: माळेगाव हादरले! गजबजलेल्या राजहंस चौकात दोन तरुणांवर कोयत्याने प्राणघातक हल्ला

केतन अग्रवाल हत्येप्रकरणी धक्कादायक माहिती समोर; सिया-चेतनचा डाव उघड, केतनला परराज्यात नेऊन…
3

केतन अग्रवाल हत्येप्रकरणी धक्कादायक माहिती समोर; सिया-चेतनचा डाव उघड, केतनला परराज्यात नेऊन…

Neelam Gorhe यांच्या निवासस्थानी घुसखोरीचा प्रयत्न; पिशवीत हातोडा, पक्कड अन्…
4

Neelam Gorhe यांच्या निवासस्थानी घुसखोरीचा प्रयत्न; पिशवीत हातोडा, पक्कड अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.