Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यात भाजप कार्यकर्ता हत्याकांडातील मोठी अपडेट; ‘या’ कारणामुळेच रमेश रेड्डींना संपवलं

खुनाच्या गुन्ह्यात तुरुंगात असलेल्या आई आणि भावाच्या जामिनाला विरोध करत असल्याने रमेश गुरूस्वामी रेड्डी याचा खून करण्यात आल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 30, 2026 | 11:59 AM
पुण्यात भाजप कार्यकर्ता हत्याकांडातील मोठी अपडेट; 'या' कारणामुळेच रमेश रेड्डींना संपवलं

पुण्यात भाजप कार्यकर्ता हत्याकांडातील मोठी अपडेट; 'या' कारणामुळेच रमेश रेड्डींना संपवलं

Follow Us
Follow Us:

पिंपरी : खुनाच्या गुन्ह्यात तुरुंगात असलेल्या आई आणि भावाच्या जामिनाला विरोध करत असल्याने रमेश गुरूस्वामी रेड्डी याचा खून करण्यात आल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे. रमेश रेड्डीच्या भावाच्या खुन प्रकरणात आरोपीचा भाऊ आणि आई तुरुंगात असून, त्यांच्या जामिनाला रमेश रेड्डी विरोध करत होता. त्यामुळे तीन महिन्यांपूर्वीच आरोपींनी रमेश रेड्डी याच्या घरासमोर उभे राहून आमच्या आई आणि भावाला जामीन झाला नाही तर सर्वांना जीवे मारू, अशी धमकी दिली होती. शेवटी मंगळवारी (२८ एप्रिल) रात्री नऊ वाजताच्या सुमारास पाळत ठेऊन आरोपींनी रेड्डी याच्यावर गोळीबार करत खून केला.

 

देहूरोड येथे मंगळवारी (२८ एप्रिल) रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली. मयत रमेश रेड्डी यांची बहिण शारदा रेड्डी (वय ३९) यांनी या प्रकरणी देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, लखन आगळे, आफताब समीर शेख, अरमान शेख आणि इतर सात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक वर्षांपूर्वी रमेश रेड्डी याचा भाऊ विक्रम गुरूस्वामी रेड्डी याच्यावर गोळीबार करून खून करण्यात आला होता. या गुन्ह्यामध्ये साबिर शेख व त्याचे आई रजिया शेख व त्याचे साथीदार हे आरोपी असून, ते सध्या जेलमध्ये आहेत. मयत रमेश रेड्डी हा त्यांचा जामीन होऊ देत नव्हता. तीन महिन्यांपूर्वी साबीर शेख यांचा भाऊ आरोपी आफताब समीर शेख याने रमेश रेड्डी यांच्या घरासमोर उभे राहून रजिया शेखला जामीन झाला नाही तर मी रमेश रेड्डी आणि त्याच्या जवळच्या नातेवाईकांना जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली होती. या वादातूनच रमेश रेड्डी याचा खून झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

…असा झाला खून

रमेश रेड्डी आणि त्यांचा मित्र संतोष स्वीट मार्टच्या मागे कपड्याच्या दुकानांमध्ये कपडे घेण्यासाठी दुचाकीवर गेले होते. कपडे घेऊन दुचाकी चालू करत असतानाच एक कार आणि दुचाकीवर बसून आरोपी आले. त्यांच्या हातात पिस्तूल आणि कोयते होते. सर्व आरोपी रमेश रेड्डीला शिव्या देत त्याच्या दिशेने धावले. त्यावेळी रमेश रेड्डी याने आणि त्यांच्या मित्रांनी लोकांकडे मदत मागितली. मात्र बंदुकीच्या गोळ्यांचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक भीतीने सैरावैरा पळू लागले. रमेश रेड्डी पळून जात असताना आरोपींनी मागून गोळीबार केला तसेच त्याच्या डोक्यात कोयत्याने वार करून त्याला गंभीर जखमी केले. त्यानंतर आरोपींनी तेथून पळ काढला. या हल्ल्यात जखमी झालेल्या रमेश रेड्डी याला तातडीने देहूरोड येथील आधार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथून वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले.

आरोपींनी झाडल्या २१ गोळ्या

रमेश रेड्डी याच्यावर आरोपींनी तब्बल २१ गोळ्या झाडल्या असून त्यातील नऊ गोळ्या रेड्डी याच्या शरीरात घुसल्या. तसेच एका आरोपीने रेड्डीच्या डोक्यात कोयत्याने वार केल्याचीही निष्पन्न झाले आहे. दरम्यान, आरोपींच्या मागावर पोलिसांची तपास पथके तैनात करण्यात आली आहेत.

वायसीएम रुग्णालयात तब्बल तीन तास तणावपूर्ण वातावरण

देहूरोड येथील आधार रुग्णालयातून रमेश रेड्डी याला रात्री साडेनऊच्या सुमारास ॲम्बुलन्समधून वायसीएम रुग्णालयात आणण्यात आले. त्यावेळी रुग्णालय परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. रुग्णालय परिसरात प्रचंड आरडाओरडा आणि गोंधळ झाला होता. डॉक्टरांनी सर्व तपासणी करून नातेवाईक आणि गर्दीसमोर रमेश रेड्डी याला मृत घोषित केले. मृतदेहात तब्बल नऊ गोळ्या आणि कोयत्याने वार केल्याने डोक्याला जखमा होत्या. नातेवाईक आणि जमलेल्या गर्दीमुळे प्रचंड तणावाचे वातावरण होते. गर्दीतील काही लोक आणि पोलिसांनी गर्दी पांगवत वातावरण शांत केले.

हे सुद्धा : ‘नाथजल’ 15 रुपयांनाच द्या, अन्यथा…; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा विक्रेत्यांना सज्जड दम

Web Title: A shocking incident of murder of bjp worker ramesh reddy has taken place in pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 30, 2026 | 11:59 AM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Murder Case

संबंधित बातम्या

धक्कादायक ! पती-पत्नीमधील वाद गेला टोकाला; पत्नीची हत्या करून पती फरार
1

धक्कादायक ! पती-पत्नीमधील वाद गेला टोकाला; पत्नीची हत्या करून पती फरार

Pune Crime: पुण्यात खळबळ! भाचा गेला, सून माहेरी निघून गेली… मामाच्या मनात पेटला संताप, पुढे घडलं धक्कादायक
2

Pune Crime: पुण्यात खळबळ! भाचा गेला, सून माहेरी निघून गेली… मामाच्या मनात पेटला संताप, पुढे घडलं धक्कादायक

आखाड पार्टीत तडीपार गुंडावर हल्ला, डोक्यात दगड घातला अन्…; पुण्यातील घटनेनं खळबळ
3

आखाड पार्टीत तडीपार गुंडावर हल्ला, डोक्यात दगड घातला अन्…; पुण्यातील घटनेनं खळबळ

Nanded Crime News: ‘मंगल, माझ्याशी लग्न कर!’ नकार मिळताच नात्याला रक्तरंजित वळण; तरुणीचा मृत्यू, प्रियकर फरार!
4

Nanded Crime News: ‘मंगल, माझ्याशी लग्न कर!’ नकार मिळताच नात्याला रक्तरंजित वळण; तरुणीचा मृत्यू, प्रियकर फरार!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.