Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बॉम्ब शोधक पथकाची पळापळ अन् सोडला सुटकेचा निश्वास; ‘टेडीबेअर’मुळे पिंपरीत खळबळ

पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालयाच्या मुलींच्या वसतीगृह परिसरात एक संशयास्पद बॉक्स आढळून आल्याने शुक्रवारी रात्री एकच खळबळ उडाली होती.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 16, 2026 | 12:20 PM
बॉम्ब शोधक पथकाची पळापळ अन् सोडला सुटकेचा निश्वास; 'टेडीबेअर'मुळे पिंपरीत खळबळ

बॉम्ब शोधक पथकाची पळापळ अन् सोडला सुटकेचा निश्वास; 'टेडीबेअर'मुळे पिंपरीत खळबळ

Follow Us
Follow Us:

पिंपरी : पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालयाच्या मुलींच्या वसतीगृह परिसरात एक संशयास्पद बॉक्स आढळून आल्याने शुक्रवारी रात्री एकच खळबळ उडाली होती. बॉम्बच्या संशयाने पोलिसांची मोठी धावपळ झाली; मात्र तब्बल तासाभराच्या थरारानंतर जेव्हा तो बॉक्स उघडण्यात आला, तेव्हा त्यात चक्क एक मोठा ‘टेडी बियर’ आढळून आला. या प्रकारामुळे पोलिसांनी सुटकेचा श्वास सोडला असून, यानिमित्ताने पोलिसांची एक उत्तम ‘मॉकड्रिल’ पार पडली.

 

पोलीस निरीक्षक गोरख कुंभार यांनी दिलेल्या माहितीनुसार, संत तुकाराम नगर पोलिसांना शुक्रवारी रात्री सव्वा आठ वाजताच्या सुमारास डॉ. डी. वाय. पाटील मुलींच्या वसतीगृहातून एक फोन आला. वसतीगृहाच्या परिसरात एक बेवारस आणि अनोळखी बॉक्स पडलेला असल्याची माहिती फोनवरून देण्यात आली होती. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने पावले उचलली. मुख्यालयातून राखीव पोलिसांची तुकडी, गुन्हे शाखेची पथके आणि बॉम्बशोधक व नाशक पथकाला (बीडीडीएस) तात्काळ पाचारण करण्यात आले.

हे सुद्धा वाचा : नीट पेपरफुटीप्रकरणी मोठी अपडेट; सीबीआयने लातुरातून निवृत्त प्राध्यपकाला घेतले ताब्यात

बॉक्समधून निघाला टेडी बियर

घटनेची माहिती मिळताच संपूर्ण परिसर पोलिसांनी ताब्यात घेतला. खबरदारीचा उपाय म्हणून सुरुवातीला वसतीगृहाचा संपूर्ण परिसर रिकामा करण्यात आला. त्यानंतर बीडीडीएस पथकाने अत्यंत काळजीपूर्वक त्या संशयित बॉक्सची तपासणी केली. पोलिसांच्या उपस्थितीत तो बॉक्स अलगदपणे उघडण्यात आला. सर्वांचे श्वास रोखले गेले होते, मात्र बॉक्स उघडताच त्यातून एक भला मोठा ‘टेडी बियर’ बाहेर आला. पथकाने त्या टेडी बियरची देखील सखोल तपासणी केली, परंतु त्यात कोणतीही संशयास्पद किंवा घातक वस्तू आढळून आली नाही.

हे सुद्धा वाचा : रुग्णालयात सापडलेला ‘तो’ बॉम्ब नव्हताच! पुणे पोलिसांची घाई; एटीएसलाही कळविले नाही

पोलिसांची झाली ‘मॉकड्रिल’

मुलगी किंवा इतर कोणीतरी तो बॉक्स तिथे विसरले असावे किंवा तो टेडी बियर कुणीतरी तिथे आणून ठेवला असावा, असा अंदाज वर्तवला जात आहे. या अफवेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, या संकटसमयी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि वेळेत घेतलेली धाव यामुळे पोलिसांची एक उत्तम मॉकड्रिल यशस्वीरीत्या पार पडली, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: A suspicious box was found in pimpri causing a stir

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 16, 2026 | 12:20 PM

Topics:  

  • maharashtra
  • Pimpri News
  • Pimpri Police

संबंधित बातम्या

मुंबईकरांनो, आता तुरुंगवासासाठीही तयार राहा! २० दिवसांत राँग साईडने गाडी चालवल्याबद्दल ३४३ चालकांवर गुन्हा दाखल
1

मुंबईकरांनो, आता तुरुंगवासासाठीही तयार राहा! २० दिवसांत राँग साईडने गाडी चालवल्याबद्दल ३४३ चालकांवर गुन्हा दाखल

Mumbai News: मोहिमेचा धडाका १४ दिवसांत ६८ किलोमीटरचे पदपथ अडथळामुक्त! मुंबईत पालिकेचे ‘पादचारी प्रथम’ अभियान
2

Mumbai News: मोहिमेचा धडाका १४ दिवसांत ६८ किलोमीटरचे पदपथ अडथळामुक्त! मुंबईत पालिकेचे ‘पादचारी प्रथम’ अभियान

Mumbai University: मुंबई विद्यापीठ प्रशासनाचा विद्यार्थ्यांशी थेट संवाद; समस्या, अपेक्षा आणि शैक्षणिक गुणवत्तेवर चर्चा
3

Mumbai University: मुंबई विद्यापीठ प्रशासनाचा विद्यार्थ्यांशी थेट संवाद; समस्या, अपेक्षा आणि शैक्षणिक गुणवत्तेवर चर्चा

Eknath Shinde: ठाण्याचा होणार कायापालट! मेट्रो, बोरिवली बोगद्यासह अत्याधुनिक सुविधांना वेग, उपमुख्यमंत्र्यांची माहिती
4

Eknath Shinde: ठाण्याचा होणार कायापालट! मेट्रो, बोरिवली बोगद्यासह अत्याधुनिक सुविधांना वेग, उपमुख्यमंत्र्यांची माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.