Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वाहतूक पोलिसामुळे तरुण गंभीर जखमी; दुचाकी थेट रस्त्याच्या दुभाजकावर आदळली

लातुरमधून एक मोठी घटना समोर आली आहे. लातूर शहरातील गांधी चौकाजवळील मिनी मार्केट सिग्नल परिसरात वाहतूक पोलिसांनी अडविलेल्या एका दुचाकीस्वाराचा अपघात झाल्याची घटना घडली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 09, 2026 | 01:36 PM
वाहतूक पोलिसामुळे तरुण गंभीर जखमी; दुचाकी थेट रस्त्याच्या दुभाजकावर आदळली

वाहतूक पोलिसामुळे तरुण गंभीर जखमी; दुचाकी थेट रस्त्याच्या दुभाजकावर आदळली

Follow Us
Follow Us:

लातूर :  लातुरमधून एक मोठी घटना समोर आली आहे. लातूर शहरातील गांधी चौकाजवळील मिनी मार्केट सिग्नल परिसरात वाहतूक पोलिसांनी अडविलेल्या एका दुचाकीस्वाराचा अपघात झाल्याची घटना घडली असून, या अपघातात संबंधित युवक गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेबाबत विविध चर्चा रंगत असून, अपघात नेमका कशामुळे झाला याबाबत अद्याप स्पष्टता नाही. या प्रकरणातील सत्य सीसीटीव्ही फुटेज आणि अधिकृत चौकशीनंतरच स्पष्ट होणार आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, मिनी मार्केट सिग्नलजवळ वाहतूक पोलीस वाहनांची तपासणी करत असताना एका दुचाकीस्वाराला थांबविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, दुचाकीस्वाराला वाहनावर नियंत्रण ठेवता आले नाही. वाहतूक पोलिसांना चुकविण्याच्या प्रयत्नात त्याची दुचाकी थेट रस्त्याच्या दुभाजकावर जाऊन आदळली. या अपघातात युवक गंभीर जखमी झाला आहे. या घटनेबाबत विविध चर्चा रंगत असून, अपघात नेमका कशामुळे झाला याबाबत अद्याप स्पष्टता नाही. दुचाकीस्वाराने स्वतःच्या घाईगडबडीत वाहनावरील नियंत्रण गमावले की, त्याला अडविताना काही अनुचित प्रकार घडला, याची खात्रीशीर माहिती समोर आलेली नाही.

दरम्यान, काही नागरिकांकडून वाहतूक तपासणीदरम्यान वाहनचालकांना अडविण्याच्या पद्धतीबाबत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. दंडात्मक कारवाईची भीती, कागदपत्रांची तपासणी आणि दंडाच्या शक्यतेमुळे काही वाहनचालक घाईघाईने पळण्याचा प्रयत्न करतात, ज्यामुळे अशा अपघातांना निमंत्रण मिळत. असल्याचे मतही व्यक्त होत आहे. मात्र, कोणाचीही चूक असो, एका युवकाला गंभीर दुखापत सहन करावी लागली ही बाब चिंताजनक आहे. त्यामुळे या संपूर्ण घटनेची निष्पक्ष चौकशी करून संबंधित सीसीटीव्ही फुटेज तपासावे आणि दोषी आढळणाऱ्यांवर योग्य कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

हे सुद्धा वाचा : पुण्याचे माजी महापौर अन् त्यांच्या कुटुंबाचे मतदार यादीतून नाव गायब; प्रशासनावर गंभीर आरोप

ट्रॉफीक दंडाच्या भीतीतून युवकाचा जीव धोक्यात?

वाहतूक नियमांचे पालन करणे जितके आवश्यक आहे, तितकेच वाहनचालकांना अडविताना सुरक्षित आणि संयमी पद्धतीचा अवलंब करणेही महत्त्वाचे आहे. गांधी मिनी मार्केट परिसरातील ही घटना वाहतूक व्यवस्थापन आणि वाहनचालकांच्या जबाबदारीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरत आहे.

हे सुद्धा वाचा : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला लातुरात मिळेना जिल्हाध्यक्ष; दीड महिन्यांपासून शोधाशोध सुरु

Web Title: A two wheeler has hit a divider in the mini market signal area near gandhi chowk in latur city

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 09, 2026 | 01:36 PM

Topics:  

  • Accident News
  • Latur news
  • Traffic Police

संबंधित बातम्या

बार्शी शहरातील ताड-सौंदणे रस्त्यावर भीषण अपघात; पिता-पुत्राचा मृत्यू
1

बार्शी शहरातील ताड-सौंदणे रस्त्यावर भीषण अपघात; पिता-पुत्राचा मृत्यू

वडगावातील एमआयडीसी रस्त्यावर पार्किंगचा विळखा, वाहतूक कोंडीमुळे अपघाताची भीती; तातडीच्या कारवाईची मागणी
2

वडगावातील एमआयडीसी रस्त्यावर पार्किंगचा विळखा, वाहतूक कोंडीमुळे अपघाताची भीती; तातडीच्या कारवाईची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.