Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Fraud News : तीन कोटींचे आमिष, 7.35 लाखांचा गंडा; ‘अशी’ झाली फसवणूक उघड

बर्फ कारखान्यासाठी तब्बल तीन कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करून देण्याचे आमिष दाखवत एका भामट्याने समाजसेविकेला तब्बल ७ लाख ३५ हजार रुपयांचा गंडा घातला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 26, 2026 | 12:49 PM
आयटी इंजिनिअरला तब्बल 62 लाखांचा गंडा

आयटी इंजिनिअरला तब्बल 62 लाखांचा गंडा

Follow Us
Follow Us:

छत्रपती संभाजीनगर : बर्फ कारखान्यासाठी तब्बल तीन कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करून देण्याचे आमिष दाखवत एका भामट्याने समाजसेविकेला तब्बल ७ लाख ३५ हजार रुपयांचा गंडा घातला आहे. ही घटना २५ एप्रिल २०२२ ते २४ जून २०२६ दरम्यान सहकार नगरात घडली आहे. शैलेश बाबुराव कांबळे (रा. सिद्धीविनायक अपार्टमेंट, एन-३९, गादिया विहार) असे महिलेची फसवणूक करणाऱ्याचे नाव असून, त्याच्याविरोधात उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे कर्जप्रकरणाशी संबंधित शासकीय पत्रव्यवहार अर्जदारापर्यंत पोहोचू नये म्हणून आरोपीने चुकीचा पत्ता दिला, तसेच त्यावर स्वतःचा मोबाइल क्रमांक टाकण्यात आला. मात्र बँकेत धनादेश न वटल्याने सर्व प्रकार उघडकीस आला आहे.

 

३ कोटींचे कर्ज मंजूर करून देण्याची लालच

या प्रकरणात सविता गणेश पाथरे (वय ४१, रा. बजाजनगर, वडगाव कोल्हाटी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्या सुसंकल्प महिला मंडळ व सुसंकल्प निधी अर्बन लिमिटेडच्या अध्यक्षा असून, विविध बचत गटांना मार्गदर्शनाचे काम करतात. मार्च २०२२ मध्ये सुषमा व तातेराव गवई यांच्या माध्यमातून त्यांची आरोपी शैलेश कांबळे याच्याशी ओळख झाली. कांबळे याने स्वतःला मोठ्या कर्जप्रकरणांचा जाणकार असल्याचे सांगत बर्फ कारखान्यासाठी तीन कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देण्याचे आश्वासन दिले.

तसेच बचत गटांनाही कोट्यवधी रुपयांचे कर्ज मंजूर करून देण्याचे आमिष दाखविले. कर्ज प्रक्रियेसाठी विविध खर्च, शासकीय स्तरावरील पाठपुरावा आणि कागदपत्रांची पूर्तता आवश्यक असल्याचे सांगून आरोपीने वेळोवेळी पैसे मागितले. त्यावर विश्वास ठेवून एप्रिल २०२२ ते डिसेंबर २०२३ दरम्यान रोख, ऑनलाइन व्यवहार आणि धनादेशाद्वारे एकूण ७ लाख ३५ हजार पीडितेने त्याला दिले. मात्र वारंवार आश्वासने देऊनही कर्ज मंजूर झाले नाही.

परतफेडीसाठी दिलेले तीन चेक बाऊन्स

फसवणुकीची बाब लक्षात आल्यानंतर फिर्यादीने पैशांची मागणी केली. त्यावेळी आरोपीने प्रत्येकी एक लाख रुपयांचे तीन धनादेश दिले. मात्र बँकेत सादर केल्यानंतर तिन्ही धनादेश बाऊन्स झाले. संबंधित खाते बंद असल्याचेही पुढे समोर आल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. या प्रकरणात पाथरे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल आहे. पुढील तपास सहायक निरीक्षक शिवाजी चौरे करीत आहेत.

हे सुद्धा वाचा : पुरंदरमधील वनपुरीसह चार गावांतील जमिनी संपादनाची अधिसूचना जारी; एमआयडीसीच्या औद्योगिक विकासाला गती

कर्ज प्रस्तावातील खेळ उघडकीस

जानेवारी २०२४ मध्ये फिर्यादीने कर्जप्रकरणाची माहिती घेतली. तेंव्हा जून २०२२ मध्येच दीड कोटी रुपयांच्या कर्जाचा प्रस्ताव संबंधित विभागाकडे सादर झाला होता. त्यानंतर कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी दोन वेळा पत्रेही काढण्यात आली होती. मात्र त्या पत्रांवर फिर्यादीचा चुकीचा पत्ता नमूद करण्यात आला होता. एवढेच नव्हे तर स्वतःचा मोबाइल क्रमांक टाकून आरोपीने ती पत्रे स्वतःकडे घेतल्याचे देखील फिर्यादी नमुद करण्यात आले आहे.

Web Title: A woman has been defrauded by someone who lured her with the promise of getting a loan sanctioned

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 26, 2026 | 12:49 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Fraud Case

संबंधित बातम्या

सीएनजी पंपावर रिक्षा रांगेत लावण्यावरुन वाद, रिक्षाचालकावर शस्त्राने वार; पुण्यातील घटनेनं खळबळ
1

सीएनजी पंपावर रिक्षा रांगेत लावण्यावरुन वाद, रिक्षाचालकावर शस्त्राने वार; पुण्यातील घटनेनं खळबळ

निवृत्त रेल्वे कर्मचाऱ्याला घातला 32 लाखांचा गंडा; DRM अधिकारी असल्याची बतावणी केली अन् बँक माहिती घेतली
2

निवृत्त रेल्वे कर्मचाऱ्याला घातला 32 लाखांचा गंडा; DRM अधिकारी असल्याची बतावणी केली अन् बँक माहिती घेतली

झोपेतून उठवल्याचा राग अनावर, नातवाने केला आजीचा खून; चऱ्होलीतील घटनेनं खळबळ
3

झोपेतून उठवल्याचा राग अनावर, नातवाने केला आजीचा खून; चऱ्होलीतील घटनेनं खळबळ

Satara Crime: वाईत गावठी पिस्टलचा धसका; दोन आरोपी जेरबंद, दोन पिस्टल आणि पाच जिवंत काडतुसे जप्त
4

Satara Crime: वाईत गावठी पिस्टलचा धसका; दोन आरोपी जेरबंद, दोन पिस्टल आणि पाच जिवंत काडतुसे जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.