Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चिंचवडच्या यात्रेत ‘मेड इन पाकिस्तान’ वस्तूंची विक्री? व्हायरल व्हिडिओमुळे खळबळ; पोलिसांकडून तपास सुरु

चिंचवड येथील श्री मोरया गोसावी मंदिराजवळ संकष्टी चतुर्थीनिमित्त भरणाऱ्या यात्रेत कथितपणे ‘मेड इन पाकिस्तान’ वस्तू विक्रीसाठी आल्याचा दावा एका महिलेने केला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 06, 2026 | 01:18 PM
चिंचवडच्या यात्रेत ‘मेड इन पाकिस्तान’ वस्तूंची विक्री? व्हायरल व्हिडिओमुळे खळबळ; पोलिसांकडून तपास सुरु

चिंचवडच्या यात्रेत ‘मेड इन पाकिस्तान’ वस्तूंची विक्री? व्हायरल व्हिडिओमुळे खळबळ; पोलिसांकडून तपास सुरु

Follow Us
Follow Us:

पिंपरी : चिंचवड येथील श्री मोरया गोसावी मंदिराजवळ संकष्टी चतुर्थीनिमित्त भरणाऱ्या यात्रेत कथितपणे ‘मेड इन पाकिस्तान’ वस्तू विक्रीसाठी आल्याचा दावा एका महिलेने केला आहे. या संदर्भातील व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान, हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर चिंचवड पोलिस ठाण्यांतर्गत एक पथक तपासासाठी नियुक्त करण्यात आले आहे.

 

व्हिडिओमध्ये संबंधित महिला यात्रेतून खरेदी केलेली चादर दाखवत आहे. चादर धुतल्यानंतर तिच्या एका कोपऱ्यात लपविण्यात आलेले लेबल आढळल्याचे ती सांगते. त्या लेबलवर ‘Made in Pakistan’ असा उल्लेख असल्याचा दावा करण्यात आला आहे. या घटनेनंतर स्थानिक बाजारपेठांमध्ये विकल्या जाणाऱ्या वस्तूंच्या उगमाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. यात्रेत आणि रस्त्यावरील स्टॉलवर विकल्या जाणाऱ्या वस्तूंची तपासणी होते का, असा सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे. व्हिडिओमध्ये संबंधित महिलेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. देशात पाकिस्तानी वस्तूंवर विविध प्रकारचे निर्बंध असताना अशा वस्तू स्थानिक बाजारात कशा पोहोचतात, असा प्रश्न तिने उपस्थित केला आहे.

हे सुद्धा वाचा : सासवडच्या सोपानदेव मंदिरात अतिरेकींच्या अटकेचा थरार; पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सासवड पोलिसांकडून मॉकड्रील

दरम्यान, सोशल मीडियावर या व्हिडिओची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. काहींनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. तर काहींनी वस्तूंच्या लेबलची पडताळणी करूनच निष्कर्ष काढण्याची भूमिका घेतली आहे. नागरिकांनी कोणतीही वस्तू खरेदी करण्यापूर्वी तिच्यावरील उत्पादन तपशील, उत्पादक कंपनीचे नाव आणि मूळ देश याची खात्री करावी, असे आवाहन करण्यात येत आहे. या प्रकरणातील व्हिडिओ व्हायरल झाला असला तरी संबंधित वस्तू नेमकी कुठून आली, ती अधिकृतपणे आयात झाली होती की नाही, तसेच विक्रेत्याची बाजू काय आहे, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे संबंधित यंत्रणांनी या प्रकाराची सखोल चौकशी करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

संबंधित प्रकाराबाबत आम्ही विशेष काळजी घेत आहोत. तपासासाठी एक स्वतंत्र पथक तैनात करण्यात आले आहे. गुन्हे शाखेच्या पथकाकडून देखील ही चादर विक्री करणाऱ्याचा शोध घेतला जात आहे. याबाबत कोणाकडे अधिक माहिती असल्यास नजिकच्या पोलिसांशी संपर्क करावा. त्याचबरोबर महानगरपालिकेला पत्र देऊन, मंदिर परिसरातील अवैध अथवा संशयास्पद वस्तू विक्री होणार नाही यासाठी अतिक्रमण कारवाईमध्ये सातत्य राहावे अशी सूचना करण्यात आली आहे. – रणजीत जाधव, पोलीस निरीक्षक चिंचवड पोलिस ठाणे.

Web Title: A woman has claimed that made in pakistan goods are being sold during the chinchwad yatra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 06, 2026 | 01:18 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Pakistan News
  • Pimpri Chinchwad

संबंधित बातम्या

लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याची राखरांगोळी, मोदी सरकारला देश कदापी माफ करणार नाही; हर्षवर्धन सपकाळांचा इशारा
1

लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याची राखरांगोळी, मोदी सरकारला देश कदापी माफ करणार नाही; हर्षवर्धन सपकाळांचा इशारा

संतापजनक! विवाहित महिलेला दोघांनी दुचाकीवर बसवले, नंतर घरात नेऊन दारु पाजली अन्…
2

संतापजनक! विवाहित महिलेला दोघांनी दुचाकीवर बसवले, नंतर घरात नेऊन दारु पाजली अन्…

Flood News : भारताच्या शेजारी देशात मुसळधार पावसाचा हाहा:कार; १२ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
3

Flood News : भारताच्या शेजारी देशात मुसळधार पावसाचा हाहा:कार; १२ जणांचा मृत्यू, अनेक जखमी

Fazlur Rehman: ‘कारगिल युद्धाचे सर्वात मोठे पाप, पाकिस्तानी लष्कराने स्वतःच्या सैनिकांचे मृतदेह’ मौलाना डिझेल यांचा खळबळजनक दावा
4

Fazlur Rehman: ‘कारगिल युद्धाचे सर्वात मोठे पाप, पाकिस्तानी लष्कराने स्वतःच्या सैनिकांचे मृतदेह’ मौलाना डिझेल यांचा खळबळजनक दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.