Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कमी दारु दिल्याचा राग; कामगाराने डोक्यात सिमेंटचा ब्लॉक मारुन केला खून

खेड (ता. सातारा) येथे भंगार दुकानात काम करणार्‍या दोन कामगारांमध्ये दारु पिल्यानंतर वादावादी होऊन झालेल्या हाणामारीत एकाचा खून झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. जगन्नाथ दगडू पवार असे खून झालेल्या कामगाराचे नाव आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 05, 2025 | 04:15 PM
६० वर्षीय पत्नीचा संशयावरून खून

६० वर्षीय पत्नीचा संशयावरून खून

Follow Us
Close
Follow Us:

सातारा : राज्यात गुन्हेगारी वाढली आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून खून, मारामाऱ्या, दरोडे यासारख्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता साताऱ्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. खेड (ता. सातारा) येथे भंगार दुकानात काम करणार्‍या दोन कामगारांमध्ये दारु पिल्यानंतर वादावादी होऊन झालेल्या हाणामारीत एकाचा खून झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. जगन्नाथ दगडू पवार (वय ६०, रा. केसरकर पेठ, सातारा) असे खून झालेल्या कामगाराचे नाव आहे.

संशयित जखमी झाल्याने त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तुकाराम वैजनाथ पवार (वय ४०, सध्या रा. खेड, सातारा मूळ रा. बामणेवाडी, जि. धाराशिव) असे संशयिताचे नाव आहे. या प्रकरणी प्रशांत नानाजी कांबळे (वय ३२, रा. गडकर आळी, शाहूपुरी) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ते भंगार दुकान मालक आहेत. गुरुवारी मध्यरात्री ही घटना घडली असून शुक्रवारी पहाटे ती समोर आली आहे.

जगन्नाथ पवार व तुकाराम पवार हे भंगार दुकानात काम करत होते. तेथेच भंगार दुकानाबाहेरील शेडमध्येच स्वत: स्वयंपाक करुन राहत होते. दोघांना दारु पिण्याची सवय आहे. दिवसभर काम केल्यानंतर रात्री दोघेजण दारु पित होते. दिनांक ३ जून रोजी रात्री भंगार दुकान मालकाने दुकान बंद केल्यानंतर दोन्ही कामगार नेहमीप्रमाणे रात्री शेडमध्ये दारु पिण्यास बसले. कमी दारु दिल्यावरुन वादावादी झाली. आणि हाणामारीही झाली. त्यातूनचं चिडलेल्या तुकाराम याने जगन्नाथ पवार यांच्या डोक्यात सिमेंटचा ब्लॉक टाकला. यात जगन्नाथ पवार यांचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा : कराडमध्ये दोघांना लाकडी दांडक्याने बेदम मारहाण; कारणही आलं समोर

पुण्यात पत्नीने केला पतीचा खून

चारित्र्याच्या संशयावरून वारंवार मारहाण करणार्‍या पतीचा पत्नीने डोक्यात व शरिरावर ठिकठिकाणी मारहाण करून खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तब्बल एक वर्षानंतर याप्रकरणात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. रुग्णालयाकडून अंतिम अहवाल आल्यानंतर हा गुन्हा नोंदवल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. अभिषेक अजेंट (वय २३, रा. साहिल हाईटस, चिंधेनगर, जांभुळवाडी) असे खून झालेल्या पतीचे नाव आहे पोलिसांनी आरोपी पत्नी वृषाली अजेंटराव (वय 24, रा. साहील हाईटस, जांभुळवाडी, आंबेगाव खुर्द) हिला अटक केली आहे. ही घटना १० जुलै २०२४ रोजी दुपारी एकच्या सुमारास साहील हाईट्स चिंधेनगर आंबेगावखुर्द येथे घडली होती. याप्रकरणी उपनिरीक्षक मोहन कळमकर यांनी आंबेगाव पोलिसांत तक्रार दिली आहे.

Web Title: A worker killed a man by hitting him on the head with a cement block after an argument in satara

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 05, 2025 | 04:13 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • crime news
  • Murder Case
  • Satara Crime
  • Satara Police

संबंधित बातम्या

Satara Doctor Death Case: डॉक्टरांकडून हॅशटॅगवर ‘ट्विटर वादळ’; आत्महत्या प्रकरणात केली मोठी मागणी
1

Satara Doctor Death Case: डॉक्टरांकडून हॅशटॅगवर ‘ट्विटर वादळ’; आत्महत्या प्रकरणात केली मोठी मागणी

Mumbai Amdabad Crime : मुंबई-अहमदाबाद मार्गावर ड्रग्सचा कारखाना, १४ कोटींचा मुद्देमाल जप्त
2

Mumbai Amdabad Crime : मुंबई-अहमदाबाद मार्गावर ड्रग्सचा कारखाना, १४ कोटींचा मुद्देमाल जप्त

अकलूज बसस्थानकात अभूतपूर्व गर्दी; मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमासाठी गाड्या पाठविल्याने प्रवाशांची गैरसाेय
3

अकलूज बसस्थानकात अभूतपूर्व गर्दी; मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमासाठी गाड्या पाठविल्याने प्रवाशांची गैरसाेय

सगळं सत्य बाहेर येत आहे, रणजितसिंह चिंता करु नका, आम्ही…; फलटणमधून मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितल
4

सगळं सत्य बाहेर येत आहे, रणजितसिंह चिंता करु नका, आम्ही…; फलटणमधून मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.