Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तरुणीने थोबाडीत मारल्यामुळे तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; गळफास लावून संपवले जिवन

हा माझा शेवटचा फोन आहे, वडिलांना असे म्हणत तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 18, 2026 | 12:54 PM
तरुणीने थोबाडीत मारल्यामुळे तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; गळफास लावून संपवले जिवन

तरुणीने थोबाडीत मारल्यामुळे तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; गळफास लावून संपवले जिवन

Follow Us
Follow Us:

परळी वैद्यनाथ : हा माझा शेवटचा फोन आहे, वडिलांना असे म्हणत तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील मोहा येथे ही घटना घडली आहे. एका तरुणीने भररस्त्यात जाहीरपणे थोबाडीत मारल्याने झालेल्या तीव्र अपमानामुळे या तरुणाने लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली असल्याचे त्याच्या वडिलांनी फिर्यादीत नमूद केले आहे. या प्रकरणी सिरसाळा पोलीस ठाण्यात आरोपी तरुणीविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

राजेभाऊ रामभाऊ शिंदे (रा. मोहा) यांनी या प्रकरणी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांचा मुलगा चंद्रहार राजेभाऊ शिंदे याला गावातीलच एका तरुणीने १३ मे रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास करेवाडी रोडवरील लाल माती परिसरात सर्वांसमक्ष थोबाडीत मारले होते. या मारहाणीमुळे आणि झालेल्या जाहीर अपमानामुळे चंद्रहार अत्यंत नैराश्यात होता. हा मानसिक छळ सहन न झाल्याने त्याने १४ मे रोजीसायंकाळी आपल्या वडिलांना फोन केला आणि ‘हा माझा शेवटचा फोन आहे, यापुढे माझा फोन येणार नाही’ असे सांगून फोन बंद केला.

दरम्यान त्यानंतर चंद्रहारने मौजे करेवाडी शिवारातील मुंगळ्याचा माळ येथे जाऊन लिंबाच्या झाडाला सुती पांढऱ्या दोरीने गळफास घेऊन आपले जीवन संपवले. मुलाचा शोध घेत असताना वडिलांना तो गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. याप्रकरणी संबंधित तरुणीवर सिरसाळा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक गोरखनाथ दहीफळे पुढील तपास करत आहेत.

हे सुद्धा वाचा : मुलांची आठवण आली, वडील भेटायला सासरवाडीत गेले अन्…; पुण्यातील घटनेनं खळबळ

राज्यात आत्महत्येच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून, गेल्या काही दिवसाखाली आईसोबत झालेल्या आर्थिक वादाच्या रागातून एका ३८ वर्षीय ट्रॅव्हल्स व्यावसायिकाने घराच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना पंचवटीतील ढिकलेनगर परिसरात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. देवेंद्र संजय थोरात (वय ३८, रा. निर्माण उपवन, ढिकलेनगर, पंचवटी) असे आत्महत्या केलेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि. २८) रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास देवेंद्र थोरात यांचे त्यांच्या आईसोबत पैशांच्या कारणावरून कडाक्याचे भांडण झाले होते. हा वाद विकोपाला गेल्याने देवेंद्र प्रचंड नैराश्येत होते. याच नैराश्येतून मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास त्यांनी राहत्या घराच्या पाचव्या मजल्यावरील गॅलरीतून थेट खाली उडी मारली. पाचव्या मजल्यावरून खाली पडल्याने देवेंद्र यांच्या डोक्याला आणि डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली.

Web Title: A young man committed suicide in parli taluka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 18, 2026 | 12:54 PM

Topics:  

  • crime news
  • parali
  • Sucide News

संबंधित बातम्या

Pune Crime : सायबर चोरट्यांकडून तीन ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक; तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा
1

Pune Crime : सायबर चोरट्यांकडून तीन ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक; तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा

खुटबाव येथील दुहेरी हत्याकांडप्रकरणी मोठी अपडेट; आरोपीला सुनावली जन्मठेपेची शिक्षा
2

खुटबाव येथील दुहेरी हत्याकांडप्रकरणी मोठी अपडेट; आरोपीला सुनावली जन्मठेपेची शिक्षा

12 वर्षांनंतर ‘विश्वास खरे’ खून प्रकरणाचा निकाल; न्यायालयाने आरोपींना सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा
3

12 वर्षांनंतर ‘विश्वास खरे’ खून प्रकरणाचा निकाल; न्यायालयाने आरोपींना सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा

Crime News : पत्नीला घरी आणण्यावरून झाला वाद; चौघांकडून घरात घुसून मारहाण
4

Crime News : पत्नीला घरी आणण्यावरून झाला वाद; चौघांकडून घरात घुसून मारहाण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.