Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बिजलीनगर झोपडपट्टीत तरुणाची हत्या; उजवा हात धारदार हत्याराने तोडला अन्…

बिजलीनगरच्या नागसेन झोपडपट्टीत सोमवारी दुपारी धारदार हत्याराने हल्ला करून २५ वर्षीय तरुणाची हत्या केली आहे. वैभव भागवत थोरात असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 23, 2025 | 02:05 PM
बिजलीनगर झोपडपट्टीत तरुणाची हत्या; उजवा हात धारदार हत्याराने तोडला अन्...

बिजलीनगर झोपडपट्टीत तरुणाची हत्या; उजवा हात धारदार हत्याराने तोडला अन्...

Follow Us
Close
Follow Us:

पिंपरी : राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली आहे. दररोज वेगवेगळ्या भागातून खून, खुनाचा प्रयत्न, हाणामाऱ्या, दरोडे, लुटमार यासारख्या घटना उघडकीस येत असतात. गुन्हेगारांमुळे नागरिकांमध्ये भिती पसरत आहे. अशातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. बिजलीनगरच्या नागसेन झोपडपट्टीत सोमवारी दुपारी धारदार हत्याराने हल्ला करून २५ वर्षीय तरुणाची हत्या केली आहे. वैभव भागवत थोरात असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. हल्ल्यात त्याच्या डोक्यावर, छातीवर, दोन्ही हातांवर आणि पायांवर वार केले आहेत. भीषण हल्ल्यामुळे त्याचा उजवा हात कोपऱ्यापासून वेगळा झाला, तर डाव्या हातावरही अनेक वार झाले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्या झालेला वैभव थोरात आरोपी योगेश अनंत गायकवाडचा मेहुणा होता. वैभव आणि योगेश यांच्यात पूर्वी अनेकदा वाद झाले होते. तसेच वैभवने योगेशच्या बहिणीला माहेरी येऊ न दिल्यामुळे योगेश संतप्त होता. या रागातून त्याने काही साथीदारांसह वैभववर जीवघेणा हल्ला केला. या प्रकरणी आरोपी योगेश अनंत गायकवाड (वय २५), अनिल आनंद बनसोडे (वय १९), महेश आप्पालाल कोळी (वय १९) आणि शिवम मधुकर वालुंज (वय १६) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

घटना वैभव काही मित्रांसोबत पत्राशेडमध्ये बसला असताना अचानक घडली. आरोपींनी धाड टाकून त्याच्या हात, छाती आणि डोक्यावर कोयत्याने वार केले. गंभीर जखमी झाल्यानंतर वैभव जागीच ठार झाला. घटनेची माहिती मिळताच चिंचवड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंकुश बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाचे काम वेगाने सुरू करण्यात आले. अवघ्या काही तासांत आरोपींना अटक करण्यात आली. “पूर्ववैमनस्यातून ही हत्या केली गेली. घटनेनंतर आरोपींना काही तासांत ताब्यात घेतले,” असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंकुश बांगर यांनी सांगितले.

भररस्त्यात एकावर कोयत्याने सपासप वार

स्वारगेट भागात दुधानी गँगने दहशत माजवली आहे. मोक्का रिर्टन आणि सराईतांनी दहशत माजवून एकावर कोयत्याने वार केले आहेत. कोयत्याने वार करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्नही केला आहे. नंतर परिसरात हवेत हत्यारे फिरवून दहशत माजवत गोंधळ घातला. शनिवारी रात्री साडे नऊच्या सुमारास डायसप्लॉट येथे ही घटना घडली. त्यामुळे शहरातील गुन्हेगारांची दहशत कायम असल्याचेही दिसत आहे. याप्रकरणी स्वारगेट पोलिस ठाण्यात भक्तीसिंग दुधानी, शक्तीसिंग दुधानी, गोविंदसिंग टाक, आकाशसिंग दुधानी याच्यासह सात जणांविरोधात भारतीय न्याय संहिता १०९, १८९, १८९(२), १९१(२), १९१(३), आर्म ४ (२५), मपोका ३७, (३) सह १३५, क्रिमीनल लॉ अमेंडमेंट ७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत आबा सरोदे (वय ३९) यांनी तक्रार दाखल केली आहे.

Web Title: A young man has been murdered in punes bijlinagar slum

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 23, 2025 | 02:04 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Murder Case
  • Pimpri Crime

संबंधित बातम्या

Raigad Crime News : एक खोटी स्कीम, कोट्यावधींचा फ्रॉड ; गुंतवणूकीचं आमीष अन् नागरिकांचे संसार उध्वस्त
1

Raigad Crime News : एक खोटी स्कीम, कोट्यावधींचा फ्रॉड ; गुंतवणूकीचं आमीष अन् नागरिकांचे संसार उध्वस्त

घायवळनंतर आता ‘दुधानी’ गँगची दहशत! भररस्त्यात एकावर कोयत्याने सपासप वार
2

घायवळनंतर आता ‘दुधानी’ गँगची दहशत! भररस्त्यात एकावर कोयत्याने सपासप वार

Andekar Gang : आंदेकर टोळीची दहशत? तपासातून धक्कादायक माहिती उघड; गेल्या 12 वर्षात तब्बल…
3

Andekar Gang : आंदेकर टोळीची दहशत? तपासातून धक्कादायक माहिती उघड; गेल्या 12 वर्षात तब्बल…

संभाजीनगरात मध्यरात्री गोळीबाराचा थरार; कारचा टायर फुटला, दोन तरुण…
4

संभाजीनगरात मध्यरात्री गोळीबाराचा थरार; कारचा टायर फुटला, दोन तरुण…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.