Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यात भीषण अपघात; भरधाव दुचाकी घसरून तरुणाचा मृत्यू

वारजे माळवाडी परिसरात भरधाव दुचाकी घसरून सहप्रवासी तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर घडली आहे. याप्रकरणी दुचाकीस्वारावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 01, 2025 | 06:40 PM
पुण्यात भीषण अपघात; भरधाव दुचाकी घसरून तरुणाचा मृत्यू

पुण्यात भीषण अपघात; भरधाव दुचाकी घसरून तरुणाचा मृत्यू

Follow Us
Follow Us:

पुणे : वारजे माळवाडी परिसरात भरधाव दुचाकी घसरून सहप्रवासी तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर घडली आहे. याप्रकरणी दुचाकीस्वारावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. जय भगवान अवघड (वय २२, सध्या रा. अक्षरा पीजी. लक्ष्मी चौक, हिंजवडी फेज एक) असे मृत्यू झालेल्या सहप्रवासी तरुणाचे नाव आहे. अपघातात दुचाकीस्वार शुभम भाऊसाहेब काकडे (वय २४, सध्या रा. अक्षरा पीजी. लक्ष्मी चौक, हिंजवडी, फेज एक) जखमी झाला आहे. याबाबत जय याचे वडील भगवान सुखदेव अवघड (वय ४८,रा. वाकळुनी, ता. बदनापुर, जि. जालना) यांनी वारजे माळवाडी पोलिसांत तक्रार दिली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, जय मूळचा जालना जिल्ह्यातील वाकळुनी गावचा रहिवासी आहे. रविवारी (३० मार्च) दुपारी साडेबाराच्या सुमारास दुचाकीस्वार शुभम आणि त्याचा मित्र जय हे मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावरुन निघाले होते. वारजेतील स्वीट कॉर्नर दुकानाजवळ भरधाव दुचाकीस्वार शुभमचे नियंत्रण सुटले. दुचाकी घसरल्याने सहप्रवासी जय याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, तसेच दुचाकीस्वार शुभम जखमी झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी येथे धाव घेतली. दोघांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपचारांदरम्यान जयचा मृत्यू झाला. अधिक तपास उपनिरीक्षक नाईकवाडे करत आहेत.

भरधाव वाहनाच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

भरधाव वाहनाच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याची घटना डेक्कन जिमखाना भागात घडली आहे. अरुण शंकर जोशी (वय ६०, रा. विवेकश्री बिल्डींग, राजेंद्रनगर, सदाशिव पेठ) असे मृत्यू झालेल्या ज्येष्ठाचे नाव आहे. अपघातानंतर पसार झालेल्या वाहनचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अंकिता अनिल जोशी (वय २१, रा. विवेकश्री बिल्डींग, राजेंद्रनगर, सदाशिव पेठ) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

हायड्राक्रेनच्या धडकेने वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

हायड्राक्रेन वाहनाच्या धडकेने एका ८० वर्षांच्या वयोवृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच विलेपार्ले परिसरात घडली आहे. बिना अनिल मथुरे असे या मृत वयोवृद्ध महिलेचे नाव आहे. महिलेच्या मृत्यूप्रकरणी क्रेन चालक अरविंद कमलेश यादव याच्याविरुद्ध जुहू पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अपघातानंतर अरविंद हा घटनास्थळाहून पळून गेला होता. रात्री शुक्रवारी उशिरा त्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचे बोलले जात आहे. हा अपघात गुरुवारी दुपारी दोन वाजता विलेपार्ले येथील इर्ला मार्केट, तानाजी मालुसरे मार्ग, प्राईम मॉलसमोर झाला आहे. बिना मथुरे या महिला विलेपार्ले येथील पोस्ट ऑफिसजवळील गणेश मूर्ती गार्डन शोरुमजवळ राहते. गुरुवारी दुपारी त्या इर्ला मार्केटमध्ये गेल्या होत्या. प्राईम म शोरुमसमोरुन जात असताना एका हायड्राक्रेन चालकाने हलगर्जीपणाने गाडी चालवून बिना यांना जोरात धडक दिली होती. या अपघातात त्या गंभीररीत्या जखमी झाल्या होत्या. अपघातानंतर क्रेनचालकाने जखमी महिलेस कुठलीही वैद्यकीय मदत केली नाही.

Web Title: A young man has died after falling off a speeding bike in pune nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 01, 2025 | 06:40 PM

Topics:  

  • Accident News
  • crime news
  • Death
  • maharashtra
  • Pune Accident
  • Pune Crime
  • Pune Police

संबंधित बातम्या

डेक्कन जिमखाना भागातील हॉटेलसमोर तरुणाच्या खुनाचा प्रयत्न, तरुणींसह तिघे अटकेत; नेमकं काय घडलं?
1

डेक्कन जिमखाना भागातील हॉटेलसमोर तरुणाच्या खुनाचा प्रयत्न, तरुणींसह तिघे अटकेत; नेमकं काय घडलं?

Viral News :अमेरिकेत कुत्र्याच्या जीवासाठी सर्वोच्च न्यायालयात लढा; अखेर ‘ब्रूस’ला देण्यात आला मृत्यू
2

Viral News :अमेरिकेत कुत्र्याच्या जीवासाठी सर्वोच्च न्यायालयात लढा; अखेर ‘ब्रूस’ला देण्यात आला मृत्यू

व्यवसायासाठी पैसे न दिल्याने चुलतीवर चाकूने हल्ला; खडक पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या
3

व्यवसायासाठी पैसे न दिल्याने चुलतीवर चाकूने हल्ला; खडक पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या

Ananya Raj Death: धक्कादायक! बॉलिवूड अभिनेत्रीचं २७व्या वर्षी निधन; मृत्यूचं कारण समोर, चाहत्यांना मोठा धक्का
4

Ananya Raj Death: धक्कादायक! बॉलिवूड अभिनेत्रीचं २७व्या वर्षी निधन; मृत्यूचं कारण समोर, चाहत्यांना मोठा धक्का

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.