Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 21 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यातील स्वारगेट भागात तरुणावर कोयत्याने हल्ला; सपासप वार केले अन्…

स्वारगेट भागातील मुकूंदनगर परिसरात किरकोळ वादातून तरुणावर कोयत्याने वार करण्यात आल्याची घटना घडली. याप्रकरणी दोघांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 22, 2024 | 12:30 AM
पुण्यातील स्वारगेट भागात तरुणावर कोयत्याने हल्ला; सपासप वार केले अन्...

पुण्यातील स्वारगेट भागात तरुणावर कोयत्याने हल्ला; सपासप वार केले अन्...

Follow Us
Follow Us:

पुणे : स्वारगेट भागातील मुकूंदनगर परिसरात किरकोळ वादातून तरुणावर कोयत्याने वार करण्यात आल्याची घटना घडली. याप्रकरणी दोघांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. यश अनिल कुंभार (रा. मीनाताई ठाकरे वसाहत, गुलटेकडी) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी अक्षय आबासाहेब सरोदे, भुत्या ऊर्फ रोहित बाबासाहेब काते (दोघ रा. डायस प्लाॅट, गुलटेकडी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत यश याची आई मंजू अनिल कुंभार यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, यशचा अक्षय आणि रोहित यांच्याशी वाद झाला होता. यश, त्याचे मित्र निखिल भिसोरे, कैलास बनसोडे हे सोमवारी गुलटेकडीतील कटारिया शाळेसमोर मोबाइलवर गेम खेळत होते. त्यावेळी अक्षय व रोहित तेथे आले. त्यांनी यश आणि त्याच्याबरोबर असलेल्या मित्रांना शिवीगाळ केली. यशच्या पाठीवर कोयत्याने वार करून आरोपी पसार झाले. पोलीस उपनिरीक्षक अशोक पाटील अधिक तपास करत आहेत.

हे सुद्धा वाचा : ओव्हरलोड वाहतुकीमुळे अपघाताचा धोका; जीवावर बेतणाऱ्या ऊस वाहतुकीतून पैसा मिळवायचा की मृत्यू?

दोन तरुणांवर कोयत्याने वार

गेल्या काही दिवसाखाली भरदुपारी कर्वे रस्त्यावरील प्रसिद्ध महाविद्यालय परिसरात फिल्मीस्टाईल टोळक्याने हातात कोयते घेऊन पाठलाग करत दोन तरुणांवर कोयत्याने वार केले. यात एका तरुणाची प्रकृती चिंताजनक असून, त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तर, दुसऱ्याला डोक्यात वार करून जखमी केले आहे. भरदुपारी घडलेल्या याघटनेमुळे महाविद्यालय परिसरात चांगलाच गोंधळ निर्माण झाला होता. धक्कादायक म्हणजे, मैत्रिणीबद्दल अफवा पसरवतोय या संशयावरून टोळक्याने वार केले आहेत. घटनेची माहिती मिळताच परिमंडळ एकचे उपायुक्त संदिपसिंह गिल्ल व डेक्कन पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जखमी असलेल्या तरुणांकडे चौकशी केली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, पसार झालेल्या तरुणांचा शोध घेतला जात आहे.

राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले

राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. दरम्यान गेल्या काही दिवसाखाली छत्रपती संभाजीनगरमध्ये जुन्या भांडणाच्या कारणातून 26 वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला. ही घटना सोमवारी (दि.2) सायंकाळी हसूल परिसरातील कारागृहाच्या बाजूच्या मैदानावर घडली. दिनेश उर्फ बबलू परमानंद मोरे (वय 26, रा. चेतनानगर, हसूल) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी आरोपी अनिकेत गायकवाड व गणेश सोनवणे यांची नावे समोर आली असून, शोधासाठी चार पथके रवाना झाली. या हत्येप्रकरणामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Web Title: A young man was attacked by a coyote in punes swargate area nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 22, 2024 | 12:30 AM

Topics:  

  • cmomaharashtra
  • devendra fadanvis
  • maharashtra
  • pune news

संबंधित बातम्या

‘मराठी येत नाही? मग घ्या नोटीस!’ पहिल्याच दिवशी १,२६८ टॅक्सी-रिक्षा चालकांवर कारवाई; शिकण्यासाठी महिनाभराची मुदत
1

‘मराठी येत नाही? मग घ्या नोटीस!’ पहिल्याच दिवशी १,२६८ टॅक्सी-रिक्षा चालकांवर कारवाई; शिकण्यासाठी महिनाभराची मुदत

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा ७.९७ लाखांचा साठा जप्त, दोघांना अटक; अन्न व औषध प्रशासनाची मध्यरात्री धडक कारवाई
2

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा ७.९७ लाखांचा साठा जप्त, दोघांना अटक; अन्न व औषध प्रशासनाची मध्यरात्री धडक कारवाई

Nashik News: खड्ड्यांवरून महासभेत रणकंदन! दिनकर पाटील-बोरस्तेंमध्ये शाब्दिक वाद; अधिकाऱ्यांच्या बदलीची मागणी
3

Nashik News: खड्ड्यांवरून महासभेत रणकंदन! दिनकर पाटील-बोरस्तेंमध्ये शाब्दिक वाद; अधिकाऱ्यांच्या बदलीची मागणी

पुण्यातील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी महापालिका प्रशासन ‘अ‍ॅक्शन मोड’वर; डांबरीकरणाचे केले जात आहे पॅचवर्क
4

पुण्यातील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी महापालिका प्रशासन ‘अ‍ॅक्शन मोड’वर; डांबरीकरणाचे केले जात आहे पॅचवर्क

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.