Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 27 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Accident: मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात! वऱ्हाडाच्या ट्रकला कंटेनरची धडक; 12 जणांचा मृत्यू

पालघर जिल्ह्यात मुंबई-अहमदाबाद महामार्गावर वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या ट्रकला कंटेनरची भीषण धडक बसून 12 जणांचा मृत्यू झाला. या अपघातात 20 ते 25 जण गंभीर जखमी झाले असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 19, 2026 | 09:02 AM
crime(फोटो सौजन्य-social media)

crime(फोटो सौजन्य-social media)

Follow Us
Follow Us:
  • वऱ्हाडाच्या ट्रकला कंटेनरची जोरदार धडक; 12 जणांचा मृत्यू
  • अपघातात 20 ते 25 जण गंभीर जखमी; रुग्णालयात उपचार सुरू
  • साखरपुड्यासाठी जात असलेल्या वऱ्हाडी मंडळींवर काळाचा घाला
पालघर: मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर एक भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात तब्बल 12 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची दुर्दैवी बातमी समोर आली आहे. तर 20 ते 25 जण गंभीरपणे जखमी झाले. वऱ्हाडाच्या ट्रकला कंटेनर ने धडक दिल्याने हा भीषण अपघात घडला. या भीषण अपघाताची घटना पालघर जिल्ह्यात घडली.

कसं झाला अपघात?

पालघरच्या धानिवारी येथून वऱ्हाडाचा ट्रक येत होता. तेव्हा त्याच्याच विरुद्ध दिशेने येणारा कंटेनर ट्रक त्याला आढळला. यामुळे भीषण अपघात झाला. कंटेनरचा मागील डब्बा निसटला, त्यानंतर ट्रक वर तो आढळला. कंटेनर धडकल्याने होत्याचं नव्हतं झालं. कंटेनरच्या या धडकेत वऱ्हाडाचा ट्रक लांब फेकला गेला.

Pune Crime: संतापजनक! चालत्या कारमध्ये महिलेवर अत्याचार; ‘घरी सोडतो’ म्हणत कारमध्ये नेलं अन् अत्याचार;

यावेळी ट्रकमध्ये 100 हून अधिक वऱ्हाडी असल्याची माहिती समोर आली आहे. बालाराम दांडेकर नावाच्या तरुणाचा साखरपुडा होता यात साखरपुड्यासाठी वऱ्हाडी मंडळी ट्रक मधून जात होते. यावेळी घडलेल्या या अपघाताने परिसर हादरून गेला. तब्बल 12 जणांचा दुर्दैवी मृत्यू आणि 20 ते 25 जण गंभीर जखमी या अपघातात झाले. जखमींना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मृतांच्या आकड्यात वाढ होण्याची अधिक शक्यता वर्तवली जात आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण आहे.

पुण्यात भीषण अपघात! रिक्षा-फॉर्च्यूनरच्या जोरदार धडकेत चालकाचा जागीच मृत्यू

पुण्यातून एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. रिक्षा आणि फॉर्च्यूनर गाडीची धडक झाली. ही धडक एवढी भीषण होती की रिक्षा चालकाचा जागीच दुर्देवी मृत्यू झाला. तर फॉर्च्युनर कार मध्ये असलेले तिघे जण गंभीर जखमी झाले. यात ठाकरेंच्या शिवसेनेचे पुणे जिल्हाप्रमुख प्रकाश भेंगडे हे देखील होते. यांच्या देखील डोक्याला दुखापत झाली आहे.

विकास अर्जुन पारखे असं मृत्यू झालेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे. पुण्याच्या मुळशी तालुक्यातील चंदू मुलखेड रस्त्यावर रिक्षा आणि फॉर्च्यूनर गाडीची भीषण धडक झाली. ही धडक एवढी जोरदार होती की रिक्षा चालकाचा घटनास्थळी दुर्देवी मृत्यू झाला. तर फॉर्च्यूनर मधील तिघेजण जखमी झाले. या अपघातात दोन्ही गाड्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य करायला सुरुवात केली. जखमींना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर अपघातानंतर अभिमन्यू अर्जुन पारखी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून फॉर्च्यून चालकावर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी रिक्षा चालकाचा मृतदेह ताब्यात घेतले असून या प्रकरणाचा पौड पोलीस तपास करत आहेत.

Rishikesh Train Accident: ऋषिकेशमध्ये मोठा रेल्वे अपघात! तीन डबे रुळावरून घसरले; एक डबा 20 फूट हवेत लटकला

💡

Frequently Asked Questions

  • Que: हा अपघात कुठे घडला?

    Ans: हा भीषण अपघात पालघर जिल्ह्यातील मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर घडला.

  • Que: अपघातात किती जणांचा मृत्यू झाला?

    Ans: या अपघातात 12 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

  • Que: वऱ्हाडी मंडळी कुठे जात होती?

    Ans: वऱ्हाडी मंडळी बालाराम दांडेकर यांच्या साखरपुड्यासाठी जात होती.

Web Title: Accident horrific accident on mumbai ahmedabad highway container collides with wedding procession truck 12 dead

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 19, 2026 | 09:02 AM

Topics:  

  • Accident
  • Mumbai-Ahmedabad highway
  • palghar

संबंधित बातम्या

Vasai News: धर्मांतरविरोधी कायदा लागू होण्याआधी चर्चमध्ये नवा नियम; भाविकांनी दिले स्वघोषणापत्र
1

Vasai News: धर्मांतरविरोधी कायदा लागू होण्याआधी चर्चमध्ये नवा नियम; भाविकांनी दिले स्वघोषणापत्र

Dahisar Accident: शाळेतून वडिलांसोबत घरी निघाला अन् काळाचा घाला! सिमेंट मिक्सरच्या धडकेत १४ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू
2

Dahisar Accident: शाळेतून वडिलांसोबत घरी निघाला अन् काळाचा घाला! सिमेंट मिक्सरच्या धडकेत १४ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू

विमा कंपनी-ह्युंदाईच्या वादात कार मालकाचा खोळंबा; दीड महिन्यांपासून कार सर्व्हिस सेंटरमध्ये
3

विमा कंपनी-ह्युंदाईच्या वादात कार मालकाचा खोळंबा; दीड महिन्यांपासून कार सर्व्हिस सेंटरमध्ये

Vasai Building Collapse : अचानक भिंतींना तडे गेले अन्… वसईत ऐनपावसाळ्यात 23 कुटुंबे बेघर; महापालिकेकडून बांधकाम जमीनदोस्त
4

Vasai Building Collapse : अचानक भिंतींना तडे गेले अन्… वसईत ऐनपावसाळ्यात 23 कुटुंबे बेघर; महापालिकेकडून बांधकाम जमीनदोस्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.