Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 21 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Hit and Run: भरधाव टँकरची डिलिव्हरी बॉयला धडक; जागीच मृत्यू, चालकाला नागरिकांनी पकडलं

मुंबईतील जोगेश्वरी येथे मध्यरात्री भरधाव टँकरने एका डिलिव्हरी बॉयच्या दुचाकीला धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर चालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र स्थानिक नागरिकांनी त्याचा पाठलाग करून पकडले. ओशिवरा पोलिसांनी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 04, 2026 | 10:11 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • जोगेश्वरीत भरधाव टँकरच्या धडकेत डिलिव्हरी बॉयचा जागीच मृत्यू झाला.
  • अपघातानंतर पळून जाणाऱ्या टँकर चालकाला स्थानिक नागरिकांनी पाठलाग करून पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
  • ओशिवरा पोलिसांनी चालकाविरुद्ध निष्काळजीपणे व मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे
मुंबई: मुंबई येथून एक हिट अँड रनची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका भरधाव टँकर चालकाने दुचाकीवरून जाणाऱ्या डिलिव्हरी बॉयला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की डिलिव्हरी बॉयचा जागीच मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर टँकर चालक पळवून जाण्याच्या प्रयत्नात होता, मात्र स्थानिक नागरिकांनी पाठलाग करून त्याला पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. ही घटना रात्री सुमारे १:२० वाजण्याच्या सुमारास जोगेश्वरी पश्चिमेकडील अमृत नगर भागातील अजित ग्लास गार्डन गेटसमोर घडली.

Ketan Agrawal Murder Case: सिया-चेतनला मोठा दिलासा! पोलीस कोठडी वाढवण्यास कोर्टाचा नकार; न्यायालयीन कोठडीत रवानगी

काय घडलं नेमकं?

अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव हर्ष असे आहे. तो डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होता. भरधाव टँकरने हर्षच्या दुचाकीला भीषण धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की हर्षचा जागीच मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर टँकर चालकाने तिथे थांबण्याऐवजी टँकरसह घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, रात्रीच्या वेळी तिथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी प्रसंगावधान राखत टँकरचा पाठलाग केला आणि चालकाला रंगेहाथ पकडले. टँकर चालक पूर्णपणे मद्यधुंद (दारूच्या नशेत) असल्याचा प्राथमिक दावा प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. त्यांनतर संतप्त नागरिकांनी त्याला पोलिसांच्या हवाली केले.

गुन्हा दाखल

या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच ओशिवरा पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी हर्षचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला असून अपघातग्रस्त वाहने ताब्यात घेतली आहेत. या प्रकरणी ओशिवरा पोलिसांनी निष्काळजीपणे आणि मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी टँकर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील सखोल तपास पोलीस करत आहे.

मोबाईलवर अश्लील मेसेज, भेटीसाठी दबाव अन् धमकी; अल्पवयीन दिराने वहिनीविरोधात केली तक्रार

मुंबई येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अल्पवयीन दिराने आपल्या १७ वर्षीय वहिनीविरोधात तक्रार दाखल केल्याचे समोर आले आहे. वाहिनीने अल्पवयीन दिरावर खोटी अत्याचाराची केस टाकण्याची धाकी देऊन लैंगिक संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी 32 वर्षीय वाहिनीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घडलेली घटना पवई येथील आहे.

मुलीचे फोटो व्हायरल झाले अन् कुटुंबात रक्तरंजित थरार; मामानेच संपवला भाच्याचा जीव, पेट्रोलने मृतदेहाला टाकलं जाळून…

💡

Frequently Asked Questions

  • Que: जोगेश्वरीतील अपघातात काय घडले?

    Ans: भरधाव टँकरने एका डिलिव्हरी बॉयच्या दुचाकीला धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

  • Que: अपघातानंतर टँकर चालकासोबत काय झाले?

    Ans: चालकाने घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र स्थानिक नागरिकांनी त्याचा पाठलाग करून पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले.

  • Que: या प्रकरणात पोलिसांनी कोणती कारवाई केली?

    Ans: ओशिवरा पोलिसांनी चालकाविरुद्ध निष्काळजीपणे आणि मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

Web Title: Mumbai hit and run speeding tanker hits delivery boy he dies on the spot citizens catch the driver

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 04, 2026 | 10:11 AM

Topics:  

  • Accident
  • crime
  • Hit and Run
  • Mumbai accident

संबंधित बातम्या

KDMC Crime: घातपाताचा कट होता का? कल्याणजवळ कारमधून पिस्तूल-काडतुसे जप्त; रोशन गोंधळीला अटक
1

KDMC Crime: घातपाताचा कट होता का? कल्याणजवळ कारमधून पिस्तूल-काडतुसे जप्त; रोशन गोंधळीला अटक

Washim crime: अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध, आंतरजातीय विवाहाला घरच्यांचा विरोध; प्रेमीयुगलाने मोर्णा तलावात उडी घेत संपवलं जीवन
2

Washim crime: अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध, आंतरजातीय विवाहाला घरच्यांचा विरोध; प्रेमीयुगलाने मोर्णा तलावात उडी घेत संपवलं जीवन

Navi Mumbai Crime: ‘आम्ही पोलीस आहोत’ म्हणत ६३ वर्षीय महिलेला गंडा; ३.८५ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास
3

Navi Mumbai Crime: ‘आम्ही पोलीस आहोत’ म्हणत ६३ वर्षीय महिलेला गंडा; ३.८५ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

Navi Mumbai Crane Accident: ऐरोली माईंडस्पेसमध्ये क्रेनचा हुक तुटला; एकाचा जागीच मृत्यू, दुसऱ्याने उपचारादरम्यान जीव गमावला
4

Navi Mumbai Crane Accident: ऐरोली माईंडस्पेसमध्ये क्रेनचा हुक तुटला; एकाचा जागीच मृत्यू, दुसऱ्याने उपचारादरम्यान जीव गमावला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.