काय घडलं नेमकं?
मध्यरात्री एका हॉटेलमध्ये पार्टीसाठी पीडित महिला गेली होती. तिथे तिची ओळख आरोपी पुरुषाशी झाली. त्याने घरी सोडतो म्हणून कार मध्ये नेलं आणि तिच्यावरती अत्याचार केला. धावत्या कार मध्ये त्या व्यक्तीने महिलांवर अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातल्या कोरेगाव पार्क परिसरातील एका हॉटेल मधून पीडित महिला आणि पुरुष सोबतच बाहेर पडले होते. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
या घटनेमुळे तीव्र संताप व्यक्त केला जात असून पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. अशा घटना राज्यात शहरात वारंवार घडत आहेत. यामुळे आता कायदा सुव्यवस्थेचा धाक राहिला नाही का असा सवाल नागरिक विचारत आहेत.
कात्रज-नवले ब्रिजवर रिक्षाचालकावर धारदार शस्त्राने हल्ला; आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना
राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली असून, दररोज खून, खुनाचा प्रयत्न यासारख्या घटना घडत आहेत. वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भिती पसरत आहे. अशातच आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. कात्रज ते नवले ब्रिजदरम्यान असलेल्या राजमाता भुयारी मार्गाजवळ एका रिक्षाचालकावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
सुरज माणिक काळे (वय ३०, रा. जैन मंदिराजवळ, कात्रज, पुणे) असे जखमी रिक्षाचालकाचे नाव असून, ते व्यवसायाने रिक्षाचालक आहेत. आंबेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत दत्तनगर चौक येथे सोमवारी सकाळी सव्वा दहाच्या सुमारास हा प्रकार घडला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दोन ते तीन वर्षांपूर्वी प्रवासी भरण्याच्या कारणावरून झालेल्या जुन्या वादाच्या रागातून हा हल्ला करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तीन आरोपींनी त्यांच्यावर धारदार हत्याराने हल्ला करून मारहाण केली. हल्ल्यात ते जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
घटनेची माहिती मिळताच आंबेगाव पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. परिसरातील नागरिकांनीही मोठी गर्दी केली होती. पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, आरोपींचा शोध घेण्यासाठी पथक रवाना करण्यात आले आहे. आरोपींच्या शोधासाठी भोर आणि वेल्हा परिसरातही पोलिसांची पथके पाठविण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. याप्रकरणाचा अधिक तपास आंबेगाव पोलीस करत आहेत.
Karanatak Crime: प्रेमसंबंधांचा राग अन् बाप बनला हैवान! पोटच्या मुलीची हत्या करून जमिनीत गाडलं
Ans: ही घटना पुण्यातील मुंडवा-कोरेगाव पार्क रस्त्यावर घडली.
Ans: मध्यरात्री हॉटेलमध्ये झालेल्या पार्टीदरम्यान आरोपीची महिलेशी ओळख झाली होती.
Ans: कोरेगाव पार्क पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.






