Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navi Mumbai Accident: भरधाव कारचा तळोज्यात कहर! 8 ते 10 जणांना उडवलं; दोघांचा मृत्यू, चालक फरार

नवी मुंबईतील तळोजा सेक्टर-10 येथे भरधाव कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात झाला. कारने 8 ते 10 जणांना उडवले. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून 8 जण जखमी झाले आहेत. अपघातानंतर चालक कार जागीच सोडून फरार झाला असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 07, 2026 | 03:05 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • तळोजा सेक्टर-10 येथे भरधाव कारने 8 ते 10 जणांना धडक दिल्याने भीषण अपघात झाला.
  • या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून 8 जण जखमी आहेत. जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
  • अपघातानंतर चालक कार सोडून फरार झाला असून पोलिसांनी तपास आणि शोधमोहीम सुरू केली आहे.
नवी मुंबई: नवी मुंबई येथून एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. तळोजा सेकटोर १० मध्ये भीषण अपघात झाला असून कार चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कारचालकाने 8 ते 10 जणांना उडवले. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून 8 जण जखमी आहेत. जखमींना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून काहींची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.

काय घडलं नेमकं?

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, तळोजा सेक्टर १० परिसरातून जात असताना अचानक कार चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं. नियंत्रण सुटलेली ही सुसाट कार रस्त्यावरून जाणाऱ्या आणि बाजूला उभ्या असलेल्या लोकांच्या अंगावर गेली. वेग जास्त असल्याने कारने तब्बल ८ ते १० जणांना हवेत उडवलं. ही धडक इतकी भीषण होती की यामध्ये दोघांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.

Chhatrapati Sambhajinagar Crime: दारू पाजून मित्रा ची हत्या केली, नंतर मध्य प्रदेशात पळाला; पण ‘या’ एका चुकीमुळे पकडला गेला!

जखमींवर उपचार सुरू

स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतीसाठी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या तातडीने उपचारासाठी जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरु आहे. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

चालक फरार

अपघातानंतर कारचालक गाडी सोडून घटनास्थळावरुन फरार झाल्याची माहिती आहे. याप्रकरणी, पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास सुरू आहे.

खारघरच्या पांडवकडा धबधब्यावर दोन तरुण वाहून गेले; शोधमोहीम सुरू

 प्रशासनाने वारंवार इशारे दिले, धबधब्यांवर जाण्यास बंदी घातली, तरीही काही जणांनी त्या सूचनांकडे दुर्लक्ष केले… आणि काही क्षणांतच आनंदाची सहल भीषण दुर्घटनेत बदलली. खारघरच्या पांडवकडा धबधब्यावर गेलेल्या दोन तरुणांना पाण्याच्या प्रचंड प्रवाहाने वाहून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुसळधार पावसामुळे बचावकार्यालाही अडथळे येत असून, दोघांचा शोध अद्याप सुरू आहे.

तळोजा फेज 1 सागरविहार बिल्डिंग, जनता गॅरेजजवळ मोहम्मद मोबशीर मोहम्मद शाहिद हा राहत होता. त्याचे वय वीस वर्षे होते. हा तरूण पांडवकडा परिसरात पाण्याच्या प्रवाहात बुडाला आहे. तर दुसरा तरुणा हा मुंबईतल्या सांताक्रुझचा आहे. त्याचे वय 19 वर्ष आहे. शेण्णोन गॅस्पर किनी असं या तरुणाचं नाव आहे. तो ही धबधब्याच्या पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहून गेला आहे.

Maharashtra Rajbhavan: राजभवनात SRPF जवानाची आत्महत्या; सुसाईड नोट, प्रेमसंबंध आणि मानसिक तणावाचा तपास, धक्कादायक माहिती समोर

💡

Frequently Asked Questions

  • Que: हा अपघात नेमका कुठे घडला?

    Ans: नवी मुंबईतील तळोजा सेक्टर-10 येथे हा भीषण अपघात घडला.

  • Que: अपघातात किती जणांचा मृत्यू झाला?

    Ans: या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून 8 जण जखमी झाले आहेत.

  • Que: अपघातानंतर कार चालकाने काय केले?

    Ans: अपघातानंतर चालक कार घटनास्थळी सोडून फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

Web Title: Navi mumbai accident speeding car wreaks havoc in taloja hits 8 to 10 peopletwo dead driver absconding

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 07, 2026 | 03:05 PM

Topics:  

  • Accident
  • crime
  • Navi Mumbai
  • Navi Mumbai Crime

संबंधित बातम्या

MSRTC News: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची कनेक्टिव्हिटी वाढणार; दादर, बोरिवली अन् स्वारगेटहून ST बससेवा
1

MSRTC News: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची कनेक्टिव्हिटी वाढणार; दादर, बोरिवली अन् स्वारगेटहून ST बससेवा

नवजात बाळाच्या मृत्यूवरून वाशी मनपा रुग्णालयात गोंधळ; कुटुंबीयांचा डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप
2

नवजात बाळाच्या मृत्यूवरून वाशी मनपा रुग्णालयात गोंधळ; कुटुंबीयांचा डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप

Navi Mumbai News: ६ ऑक्टोबरला नवी मुंबईत १६ तास पाणीपुरवठा बंद; जाणून घ्या कोणत्या भागांना फटका
3

Navi Mumbai News: ६ ऑक्टोबरला नवी मुंबईत १६ तास पाणीपुरवठा बंद; जाणून घ्या कोणत्या भागांना फटका

Navi Mumbai News: वाशी एपीएमसीतील केळी पिकवण्याच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह; नियमांचे उल्लंघन झाल्याची चौकशी
4

Navi Mumbai News: वाशी एपीएमसीतील केळी पिकवण्याच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह; नियमांचे उल्लंघन झाल्याची चौकशी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.