Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाटस पोलिस ॲक्शन मोडवर; गोळीबार प्रकरणातील आरोपींची काढली धिंड

यवत पोलीस आणि पाटस पोलीस चौकीने संयुक्त कारवाई करत ऊसाच्या शेतातून आणि लपून बसलेल्या ठिकाणांहून १० आरोपींना जेरबंद केले. अटक केल्यानंतर पोलिसांनी आरोपींना हातकड्या घालून पाटसच्या मुख्य चौक, गरदडे कॉम्प्लेक्स परिसरातून धिंड काढली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 07, 2026 | 02:07 PM
पाटस गोळीबार प्रकरणातील आरोपींची पोलिसांनी काढली धिंड; पाटस पोलीस ॲक्शन मोडवर!

पाटस गोळीबार प्रकरणातील आरोपींची पोलिसांनी काढली धिंड; पाटस पोलीस ॲक्शन मोडवर!

Follow Us
Follow Us:

पाटस : भरदिवसा गोळीबार करून गावात दहशत पसरवणाऱ्या आरोपींना यवत-पाटस पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला आहे. सिमेंट वाहतुकीवरून झालेल्या गोळीबार प्रकरणातील १० अटक आरोपींची पोलिसांनी शनिवारी (दि.६) सायंकाळी पाटस पोलीस चौकी ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, राजामाता अहिल्याबाई होळकर चौक अशी गावातून धिंड काढत जनतेसमोर आणले. त्यामुळे पाटस पोलीस आता ॲक्शन मोडवर असल्याचा संदेश गावभर गेला आहे.

गजबजलेल्या सार्वजनिक ठिकाणी असलेल्या लक्ष्मी बापू गरदडे कॉम्प्लेक्स समोर शुक्रवारी (दि. ५) झालेल्या गोळीबारानंतर पाटसमध्ये भयाचे वातावरण होते. यवत पोलीस आणि पाटस पोलीस चौकीने संयुक्त कारवाई करत ऊसाच्या शेतातून आणि लपून बसलेल्या ठिकाणांहून १० आरोपींना जेरबंद केले. अटक केल्यानंतर पोलिसांनी आरोपींना हातकड्या घालून पाटसच्या मुख्य चौक, गरदडे कॉम्प्लेक्स परिसरातून धिंड काढली. भरदिवसा गोळीबार करणारे हेच लोक आहेत, असा संदेश देत पोलिसांनी जनतेचा विश्वास परत मिळवण्याचा प्रयत्न केला. नागरिकांनीही घटनास्थळी गर्दी करून या कारवाईचे स्वागत केले.

पाटस पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई झाली. पोलिसांनी स्पष्ट केले की, “गुन्हेगारी करून कोणीही मोकाट फिरू शकत नाही. कायद्याचा धाक दाखवण्यासाठी आणि गावात शांतता प्रस्थापित करण्यासाठी ही धिंड काढण्यात आली. गोळीबार, दगडफेक, दहशत पसरवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईही केली जाईल.”

तातडीच्या ॲक्शनमुळे पाटसकरांना दिलासा

या प्रकरणी एकूण १८ जणांवर गुन्हे दाखल आहेत. १० जणांना अटक झाली असून, उर्वरित ८ अनोळखी आरोपींचा शोध पोलिसांचे पथक घेत आहे. तसेच गावठी कट्टा कोणी पुरवला, श्रीगोंद्याची टोळी कोणी बोलावली, ट्रान्सपोर्ट ठेकेदाराचा यात सहभाग आहे का? याचा तपासही वेगात सुरू आहे. पोलिसांच्या या तातडीच्या ॲक्शनमुळे पाटसकरांना दिलासा मिळाला आहे. “गुन्हेगारांना मोकाट सोडले तर गावात दहशत वाढते. पोलीसांनी वेळीच कडक पाऊल उचलल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

Solapur Crime : ‘खेळताना पडला’ म्हणणाऱ्या काकाचाच निघाला खुनी चेहरा; 5 वर्षीय चिमुकल्याची गळा दाबून हत्या

Web Title: Accused in the patas firing case paraded publicly

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 07, 2026 | 02:07 PM

Topics:  

  • crime news

संबंधित बातम्या

कचरा वेचताना घरांवर नजर; आळेफाट्यात चोरट्या महिलांच्या टोळीचा पर्दाफाश
1

कचरा वेचताना घरांवर नजर; आळेफाट्यात चोरट्या महिलांच्या टोळीचा पर्दाफाश

हायवा टिपर चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; वडगाव निंबाळकर पोलिसांनी दोघांना पकडले
2

हायवा टिपर चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; वडगाव निंबाळकर पोलिसांनी दोघांना पकडले

एसटी बँकेच्या संचालकाला लाचं घेणं भोवलं; बारामती बसस्थानकासमोरच एसीबीने रंगेहात पकडलं
3

एसटी बँकेच्या संचालकाला लाचं घेणं भोवलं; बारामती बसस्थानकासमोरच एसीबीने रंगेहात पकडलं

‘…तर तुम्हाला मारून टाकेन’; रांजणगावात जावयाकडून सासर्‍याला चाकू दाखवून धमकी
4

‘…तर तुम्हाला मारून टाकेन’; रांजणगावात जावयाकडून सासर्‍याला चाकू दाखवून धमकी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.