नेमकं काय घडलं?
समर्थ यल्लाप्पा कास्ता असे मृत्यू झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे. तर आरोपी काकाचे नाव अंकुश परसप्पा कास्तार असे आहे. समर्थचे आई-वडील दोघेही ऊसतोड कामगार आहेत. पोटाची खळगी भरण्यासाठी ते सतत बाहेरगावी असतात. त्यामुळे समर्थ हा दक्षिण सोलापूर तालुक्यातील बरूर येथील आपल्या आजीजवळ राहत होता. 4 जूनला दुपारी १ वाजताच्या सुमारास समर्थ हा मी खेळायला जातो असे सांगून घरातून बाहेर गेला. काहीवेळाने समर्थचे काका अंकुशने समर्थने बेशुद्धावस्थेत घरी आणले. त्याने समर्थ खेळताना पत्र्यावरून खाली पडला आणि त्यामुळे तो बेशुद्ध झाला आहे, असे सांगितले.
नातेवाईकांनी तातडीने त्याला तात्काळ एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला उपचारापूर्वीच मृत घोषित केले. समर्थच मृतदेह पाहिल्यानंतर त्याच्या डोळ्याला, गळ्यावर आणि हनुवटीवर काही संशयास्पद दुखापतीच्या खुणा दिसून आल्या. त्यामुळे पोलिसांच्या उपस्थितीत मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. या शवविच्छेदन अहवालात समर्थचा मृत्यू पत्र्यावरून पडल्याने नाही, तर त्याला गळा दाबून हत्या करण्यात आल्याचे समोर आले.
पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता संशयित आरोपी काका अंकुश कास्तार याला अटक केली आहे. त्याने समर्थची हत्या का केली? या मागेच कारण काय? याचा तपास पोलीस करत आहे. मंद्रूप पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
Ans: मृत चिमुकल्याचे नाव समर्थ यल्लाप्पा कास्तार होते.
Ans: समर्थ पत्र्यावरून पडल्याने बेशुद्ध झाल्याचा बनाव आरोपीने केला होता.
Ans: शवविच्छेदन अहवालात हत्या स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली.






