Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 27 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

400 गुऱ्हाळे बंद, हजारो टन ऊस गाळप ठप्प; तुकाराम मुंढेंच्या कारवाईने दौंडमध्ये खळबळ

अन्न व औषध प्रशासन विभागाचे धडाकेबाज अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या एका धडक कारवाईनं दौंड तालुक्यात खळबळ उडाली आहे. हजारो टन ऊस गाळपाअभावी वाळत पडला असून शेतकरी, गुऱ्हाळ मालक आणि कामगारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 12, 2026 | 05:23 PM
400 गुऱ्हाळे बंद, हजारो टन ऊस गाळप ठप्प; तुकाराम मुंढेंच्या कारवाईने दौंडमध्ये खळबळ

400 गुऱ्हाळे बंद, हजारो टन ऊस गाळप ठप्प; तुकाराम मुंढेंच्या कारवाईने दौंडमध्ये खळबळ

Follow Us
Follow Us:

पाटस : अन्न व औषध प्रशासन विभागाचे धडाकेबाज अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या एका धडक कारवाईनं दौंड तालुक्यात खळबळ उडाली आहे. भेसळयुक्त गूळ निर्मितीवर अंकुश ठेवण्यासाठी केलेल्या कारवाईनंतर तालुक्यातील तब्बल ४०० गुऱ्हाळघरे गेल्या २ दिवसांपासून बंद आहेत. हजारो टन ऊस गाळपाअभावी वाळत पडला असून शेतकरी, गुऱ्हाळ मालक आणि कामगारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

 

दौंड तालुक्यात ऊस गाळप हंगाम जोरात सुरू असतानाच एफडीएची कारवाई झाली. परिणामी गाळप ठप्प झाले आहे. गुऱ्हाळांवर आणलेला ऊस आता वाळत पडला आहे. वेळेत गाळप न झाल्यास शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची भीती आहे. गुऱ्हाळावर अवलंबून असलेले हजारो मजूर कामाशिवाय बसले आहेत. तर भेसळीचा गूळ बंद झाल्यामुळेच हा व्यवसाय अडचणीत आला का, असा प्रश्न संपूर्ण तालुक्यात चर्चिला जातोय.

मुंढे यांची भेसळविरोधी धडक मोहीम

तुकाराम मुंढे यांनी गेल्या काही दिवसांपासून राज्यभर भेसळयुक्त पदार्थांविरुद्ध मोहीम तीव्र केली आहे. नकली पनीर, रंग लावलेली फळे, केमिकलयुक्त तेलानंतर आता गुळावरही त्यांचा बडगा उगारला आहे. दौंड तालुक्यातील अनेक गुऱ्हाळांमध्ये गुळाला पांढरा रंग यावा म्हणून युरिया, सोडा, हायड्रोस, इंडस्ट्रियल कलर यांसारखी घातक रसायने मिसळली जात असल्याची माहिती एफडीएला मिळाली होती. तसेच साखरेची भेसळ करून गुळाचे वजन वाढवले जात होते. याच माहितीच्या आधारावर धाडी टाकताच अनेक गुऱ्हाळचालकांनी स्वतःहून गाळप बंद केले आहेत. आता खरी चर्चा ही आहे ४०० गुऱ्हाळे एकदम बंद पडणे याचा अर्थ काय?

हे सुद्धा वाचा : आर्थिक संकट असतानाही ‘सल्लागार’ नियुक्तीचा घाट; पिंपरी- चिंचवड महापालिकेत स्थायी समितीचा आयुक्तांच्या आदेशाला हरताळ

कारवाई होणार असल्याचे स्पष्ट संकेत

भेसळीमुळे किडनी, लिव्हर आणि कॅन्सरचा धोका वाढतो. आरोग्य महत्त्वाचे की धंदा? भेसळ करताना सापडणाऱ्या गुऱ्हाळांवर गुन्हे दाखल, गुऱ्हाळ सील, दंडाची कारवाई होणार असल्याचे स्पष्ट संकेत एफडीए ने दिले आहेत. बंद गुऱ्हाळांमधून सॅम्पल घेऊन प्रयोगशाळेत तपासणी सुरू आहे. जे शुद्ध गूळ बनवतात. त्यांना लवकर परवानगी मिळण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांची मात्र अडचण झाली आहे. साखर कारखान्यांना ऊस नेण्याचा पर्याय आहे, पण गाळपाचा दर आणि वाहतूक खर्चाचा प्रश्न शेतकऱ्यांच्या समोर आहे. दरम्यान, तुकाराम मुंढे यांच्या या कारवाईमुळे दौंड तालुक्यात “भेसळखोरांची बैठक” घ्यावी लागते, हे सिद्ध झाले. आता दौंडचा गूळ “शुद्ध” होणार की शेतकरी अडचणीत येणार, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल.

💡

Frequently Asked Questions

  • Que:

    Ans:

Web Title: Action taken by food and drug administration official tukaram mundhe has caused a stir in daund

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 12, 2026 | 05:22 PM

Topics:  

  • Daund
  • Patas
  • Tukaram Munde

संबंधित बातम्या

दुधासह ब्रँडेड पनीरला वाढती पसंती, FDA च्या धडक कारवाईचा परिणाम; हॉटेलांमध्येही शुद्ध पनीरलाच मागणी
1

दुधासह ब्रँडेड पनीरला वाढती पसंती, FDA च्या धडक कारवाईचा परिणाम; हॉटेलांमध्येही शुद्ध पनीरलाच मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.