Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 26 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पॉलिग्राफ चाचणी दरम्यान आफताबला विचारले ४० प्रश्न; ‘या’ रहस्यांचा झाला उलगडा

पोलिसांना आफताबच्या भाड्याच्या घरातून ५ सुरे सापडले आहेत. पण, श्रद्धाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्यानं वापरलेलं हत्यार मात्र अजूनही सापडू शरलेलं नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सध्याच्या घडीला घरातून सापडलेले सुरे पुढील तपासणीसाठी FSL कडे पाठवण्यात आले आहेत.

  • By Pooja Pawar
Updated On: Nov 26, 2022 | 11:04 AM
पॉलिग्राफ चाचणी दरम्यान आफताबला विचारले ४० प्रश्न; ‘या’ रहस्यांचा झाला उलगडा
Follow Us
Follow Us:

श्रद्धा वालकर हत्या प्रकरणानंतर संपूर्ण देश हादरला असून या प्रकरणी नवनवीन खुलासे समोर येत आहेत. अतिशय क्रूरतेनं श्रद्दाचा जीव घेत तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करणाऱ्या आफताब पूनावाला याची नुकतीच  पॉलिग्राफ चाचणी करण्यात आली. शुक्रवारी तब्बल ८ तासांसाठी फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (FSL) नवी दिल्ली यांच्यातर्फे ही चाचणी करण्यात आली असून यावेळी आफताबवर प्रश्नांचा भडीमार करण्यात आला. श्रद्धाशी प्रस्थापित झालेल्या प्रेम संबंधांपासून ते तिच्या हत्येपर्यंत इत्यादींशी निगडित तब्बल ४० प्रश्न त्याला विचारण्यात आले.

FSL शी संलग्न सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आफताबला त्या एका क्षणाबाबतही प्रश्न करण्यात आला, जेव्हा श्रद्धाला जीवे मारण्याचा विचार त्याच्या मनात आला. श्रद्धाची हत्या करण्याचा कट पूर्वनियोजित होता, की हत्येच्याच वेळी मनात असणाऱ्या क्रूर भावनेतून हे कृत्य केलं? असे प्रश्न त्याला विचारण्यात आला. तपास यंत्रणांना या चाचणीतून बरीच माहिती मिळाल्याचं कळत आहे. यावेळी श्रद्धा वालकर प्रकरणामध्ये आफताबला घटनाक्रमही विचारण्यात आला.

श्रद्धाशी ओळख झाल्यापासून रिलेशनशिपमध्ये येईपर्यंत आणि त्यानंतरच्या दिवसांपर्यंतचे सर्व संबंधित प्रश्न त्याला विचारण्यात आले. हत्या करण्यासाठी वापरण्यात आलेली हत्यारं आणि त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यालाठी केलेल्या कृत्यासंबंधीच्या प्रश्नांचा भडीमार त्याच्यावर करण्यात आला. डेटिंगच्या दिवसापासून मृतदेहाची विल्हेवाट लावण्याच्या दिवसापर्यंत सर्व माहिती आफताबकडून काढण्यासाठी यावेळी यंत्रणेनं सापळा रचला होता.

दरम्यान, पोलिसांना आफताबच्या भाड्याच्या घरातून ५ सुरे सापडले आहेत. पण, श्रद्धाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्यानं वापरलेलं हत्यार मात्र अजूनही सापडू शरलेलं नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सध्याच्या घडीला घरातून सापडलेले सुरे पुढील तपासणीसाठी FSL कडे पाठवण्यात आले आहेत.

Web Title: Aftab was asked 40 questions during the polygraph test these secrets have been revealed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 26, 2022 | 11:04 AM

Topics:  

  • crime news
  • delhi
  • Murder Case
  • Shradha Walkar

संबंधित बातम्या

Pune Crime: पैशांमुळे दुरावलेली मैत्री १० वर्षांनी पुन्हा जुळली; ४.८५ लाखांच्या वादावर अडीच लाखांत तडजोड
1

Pune Crime: पैशांमुळे दुरावलेली मैत्री १० वर्षांनी पुन्हा जुळली; ४.८५ लाखांच्या वादावर अडीच लाखांत तडजोड

COEP राडाप्रकरणी महत्त्वाची अपडेट; काँग्रेस-एनएसयूआय कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल, मीडियाविरोधातही तक्रार
2

COEP राडाप्रकरणी महत्त्वाची अपडेट; काँग्रेस-एनएसयूआय कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल, मीडियाविरोधातही तक्रार

जन्माला घातलं, पण सांभाळलं नाही! आई-वडिलांनीच केला ५४.५० लाखांत पोटच्या बाळाचा सौदा!
3

जन्माला घातलं, पण सांभाळलं नाही! आई-वडिलांनीच केला ५४.५० लाखांत पोटच्या बाळाचा सौदा!

संतापजनक ! वेळेत उपचार न मिळाल्याने वाटेतच झाली महिलेची प्रसूती; ग्रामीण रुग्णालयाचा कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर
4

संतापजनक ! वेळेत उपचार न मिळाल्याने वाटेतच झाली महिलेची प्रसूती; ग्रामीण रुग्णालयाचा कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.