Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्कादायक! ‘डोक्यावर हात ठेवला अन् लिंबू कापला….’, सोने चोरीच्या संशयातून घरकाम करणाऱ्या महिलेवर ‘अघोरी विद्या’!

Chhatrapati Sambhajinagar News: सोने चोरीच्या संशयावरून घरकाम करणाऱ्या महिलेवर अघोरी विद्येचा प्रयोग करत डोक्यावर लिंबू कापण्यात आला. पोलिसांनी विरोधी कायद्यासह ॲट्रॉसिटीनुसार गुन्हा दाखल केला आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Dec 12, 2025 | 02:12 PM
सोने चोरीच्या संशयातून घरकाम करणाऱ्या महिलेवर ‘अघोरी विद्या’! (Photo Credit - AI)

सोने चोरीच्या संशयातून घरकाम करणाऱ्या महिलेवर ‘अघोरी विद्या’! (Photo Credit - AI)

Follow Us
Close
Follow Us:

 

 

  • सोने चोरीच्या संशयातून घरकाम करणाऱ्या महिलेवर ‘अघोरी विद्या’!
  • डोक्यावर लिंबू कापला
  • सासू-सुनेवर जिन्सी पोलिसांत गुन्हा दाखल
Chhatrapati Sambhajinagar Aghori Vidya Marathi News: घरातील एक तोळे सोने चोरीस गेल्याच्या संशयावरून घरकाम करणाऱ्या एका महिलेवर अघोरी आणि अमानुष तंत्रविद्येचा प्रयोग केल्याची धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगरमधील सुराणानगर येथे उघडकीस आली आहे. या प्रकरणी लिंबू कापून तंत्रमंत्राचा प्रयोग करणाऱ्या सासू आणि सुनेविरोधात जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डोक्यावर हात ठेवून ‘लिंबू कापला’

घटनेबाबत फिर्यादी ४२ वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. फिर्यादीची पत्नी मागील चार-पाच महिन्यांपासून सुराणानगर येथील रूपाली अमोल भाटिया यांच्या घरी स्वयंपाक आणि धुणीभांडी करण्याचे काम करत होती. तब्येत बिघडल्याने तिने ५ नोव्हेंबरपासून काम सोडले होते. १६ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता श्रीनिवास अपार्टमेंटमध्ये हा प्रकार घडला.

घटनेचा क्रम

१५ नोव्हेंबर रोजी रूपाली भाटिया यांनी फिर्यादीच्या पत्नीला फोन करून घरी बोलावले. त्यानंतर रूपालीने घरातून लिंबू आणला. रूपालीची सासू सविता भाटिया हिने पीडितेच्या डोक्यावर हात ठेवून तंत्रमंत्राचे उच्चार करत लिंबू कापला. “या प्रकाराचा फोटो महाराजाला पाठवतो. महाराज ज्याचे नाव सांगतील, त्याच्याविरोधात सोने चोरीचा गुन्हा दाखल करणार,” असेही सांगण्यात आले.

हे देखील वाचा: लग्नाच्या आमिषाने तरुणाची फसवणूक; राजस्थानहून संभाजीनगरमध्ये बोलावलं अन् नंतर…

पीडितेची प्रकृती बिघडली

या अघोरी प्रकारामुळे आणि खोट्या आरोपांच्या भीतीपोटी पीडित महिला मानसिकरीत्या खचल्या. सायंकाळी घरी गेल्यावर त्यांनी पतीला घडलेली घटना सांगितली. त्यानंतर त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना तत्काळ दवाखान्यात दाखल करावे लागले.

सासू-सुनेविरोधात गुन्हा दाखल

घटनेनंतर फिर्यादीने जिन्सी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार, रुपाली अमोल भाटिया आणि तिची सासू सविता भाटिया (दोघी रा. श्रीनिवास अपार्टमेंट, सुरणानगर) या दोघींविरोधात खालील कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनुसूचित जाती, जमाती प्रतिबंधक कायदा (Atrocity Act) महाराष्ट्र नरबळी आणि अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा प्रतिबंधक कायदा (जादूटोणा विरोधी कायदा) पुढील तपास सहायक आयुक्त मनोज पगारे करीत आहेत.

हे देखील वाचा: घटना घडल्यावरच प्रशासन जागे होणार का? खंडपीठाने पाोलिसांचे कान पिळले! काय आहे नेमकं कारण

Web Title: Aghori attack on housemaid suspected of stealing gold

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 12, 2025 | 02:11 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • crime news
  • Women

संबंधित बातम्या

लग्नाच्या आमिषाने तरुणाची फसवणूक; राजस्थानहून संभाजीनगरमध्ये बोलावलं अन् नंतर…
1

लग्नाच्या आमिषाने तरुणाची फसवणूक; राजस्थानहून संभाजीनगरमध्ये बोलावलं अन् नंतर…

धक्कादायक ! NEET परीक्षेचे गुण वाढवून देतो म्हणत 1.10 कोटींचा गंडा; आधी विश्वास संपादन केला अन् नंतर…
2

धक्कादायक ! NEET परीक्षेचे गुण वाढवून देतो म्हणत 1.10 कोटींचा गंडा; आधी विश्वास संपादन केला अन् नंतर…

मोठी बातमी! Sheetal Tejwani ला दिलासा नाहीच; कोर्टाने सुनावली 4 दिवसांची कोठडी
3

मोठी बातमी! Sheetal Tejwani ला दिलासा नाहीच; कोर्टाने सुनावली 4 दिवसांची कोठडी

दरोड्याच्या प्रयत्नातील परप्रांतीय टोळी जेरबंद; रांजणगाव एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई
4

दरोड्याच्या प्रयत्नातील परप्रांतीय टोळी जेरबंद; रांजणगाव एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.