Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar News: जे विश्वासू त्यांनीच एक कोटीचे सोनं केलं लंपास! सहा जणांवर गुन्हा दाखल

एकीकडे सोन्याचे भाव कमी जास्त होत असतानाच अहिल्यानगर मधील सहा बंगाली कारागिरांनी सराफ बाजारातील सोनं लंपास केले आहे. या सोन्याची एकूण किंमत एक कोटींपेक्षा जास्त आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Oct 29, 2025 | 04:30 PM
फोटो सौजन्य: iStock

फोटो सौजन्य: iStock

Follow Us
Close
Follow Us:
  • अहिल्यानगरमध्ये 1 कोटींचे सोनं लंपास
  • सहा बंगाली कारागिरांनी सराफ बाजारातील सोन्यावर मारला डल्ला
  • एकाचवेळी आठ सोनारांना घातला गंडा
आहिल्यानगर येथील लोकप्रिय सराफ बाजारात अनेक वर्षांपासून विश्वास संपादन करून काम करणाऱ्या सहा बंगाली कारागिरांनी सराफ बाजारातील सोनारांना एक कोटी एक लाख पाच हजार रुपयांचा गंडा घातला आहे. दागिने बनवण्यासाठी व दुरुस्तीसाठी दिलेले सुमारे 2011 ग्रॅम वजनाचे सोने घेऊन हे सर्व कारागीर कुटुंबासह फरार झाले आहेत. याप्रकरणी सोनार व्यावसायिक कृष्णा जगदीश देडगावकर (वय ३२. रा. गायकवाड कॉलनी, सावेडी) यांनी कोतवाली पोलिसात फिर्याद दिली आहे.

नेमकं घडलं काय?

पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णा देडगावकर यांचे सराफ बाजारात ‘जगदीश लक्ष्मण देडगावकर’ व त्यांचे भाऊ प्रतीक यांचे ‘ए जे देडगावकर’ नावाने दुकान आहे. त्यांच्या दुकानाच्या तळमजल्यावर दिपनकर माजी, सोमीन बेरा (उर्फ कार्तिक), सत्तू बेरा, स्नेहा बेरा हे कारागीर काम करत होते. तसेच, त्यांच्या दुकानासमोर विजय जगदाळे यांच्याकडे सोमनाथ सामंता व अन्मेश दुलाई हे काम करत होते.

Chhatrapati Sambhajinagar Water Crisis: छत्रपती संभाजीनगरमध्ये पाणी संकट गडद! महावितरणच्या ‘झटका’मुळे ५० तास पाणीपुरवठा बंद

रविवारी (दि. २६) सायंकाळी सव्वासात वाजता कृष्णा देडगावकर हे कारागीर दिपनकर माजी याच्याकडून तयार दागिने (४ गंठण, बांगड्या, राणी हार) घेण्यासाठी तळमजल्यावर गेले. मात्र, दिपनकर तेथे नव्हता. त्याला फोन केला असता, ‘दहा मिनिटांत येतो’ असे सांगून त्याने मोबाईल बंद केला. यानंतर देडगावकर यांनी सोमीन बेरा व इतरांना फोन केले सर्वांचेच मोबाईल बंद लागले. बराच्चा वेळ होऊनही कोणीच परत न आल्याने व इतर कारागिरांनी उडवाउडवीची उत्त दिल्याने देडगावकर यांना शंका आली. त्यांनी सोमनाथ सामंता याच्या रामचंद्र खुंट येथील घरी जाऊन पाहिले असता घराला कुलूप आढळले,

तपासासाठी पोलिसांची तीन पथके रवाना

कोतवाली पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली दोन आणि स्थानिक गुन्हे शाखेचे एक असे तीन पथक या घटनेचा तपास करत आहे. पोलिस अधीक्षक सोमनाथ धार्ग यांनीही या घटनेची गंभीर दखल घेतली आहे.

संगमनमत करून रचलेला कट

घटनेनंतर हे सहा मुख्य कारागीर, त्यांच्या ठेकेदाराची पत्नी व तिचा भाऊ असे एकूण 11 ते 12 जण पळून गेल्याची माहिती समोर येत आहे. सर्वांनी संगनमत करून हा कट रचल्याचा संशय आहे. याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी दिपनकर माजी, सोमीन बेरा (कार्तिक), सोमनाथ सामंता, अन्मेश दुलोई, सतु बैरा व स्नेहा बेरा यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

Pune News: दिवाळीत RTO ची नियमभंग करणाऱ्या १९८ बसवर धडक कारवाई; 17 लाखांपेक्षा जास्त…

एकाचवेळी आठ सोनारांना घातला गंडा

या कारागिरांनी केवळ देडगावकर बंधूंचेच नव्हे, तर विजय राजाराम जगदाळे, सागर संजय गुरव, भरत दगडुशेठ शिराळकर, बरजहान सुलेमान शेख, प्रमोद आबासाहेब गाडगे, इम्रान आशरफ अली अशा एकूण आठ सोनारांचे सोने पळवले आहे. यात एकूण 2011 ग्रॅम सोन्याचे दागिने, सोने व लगड यांचा समावेश आहे.

Web Title: Ahilyanagar news 6 six bengali artisans steal gold worth rupess 1 crore

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 29, 2025 | 04:28 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • crime news
  • Gold Jewellery
  • Marathi News

संबंधित बातम्या

Ahilyanagar News: राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाले शुभसंकेत; दोन उमेदवारांची बिनविरोध निवड
1

Ahilyanagar News: राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाले शुभसंकेत; दोन उमेदवारांची बिनविरोध निवड

Fake Gutkha Factory: बनावट गुटख्याचा घरगुती कारखाना उद्ध्वस्त! ३.७७ लाखांचा मुद्देमाल जप्त
2

Fake Gutkha Factory: बनावट गुटख्याचा घरगुती कारखाना उद्ध्वस्त! ३.७७ लाखांचा मुद्देमाल जप्त

“मराठी भाषेला अभिजात….”; Akhil Bhartiya Marathi Sahitya संमेलनाचे स्वागताध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसलेंचे भाष्य
3

“मराठी भाषेला अभिजात….”; Akhil Bhartiya Marathi Sahitya संमेलनाचे स्वागताध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसलेंचे भाष्य

Kolhapur News : पाणीपुरवठा योजनेत भष्टाचार; उद्घाटनापूर्वीच पाण्याच्या टाकीचे तीनतेरा
4

Kolhapur News : पाणीपुरवठा योजनेत भष्टाचार; उद्घाटनापूर्वीच पाण्याच्या टाकीचे तीनतेरा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.