Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Akola Crime: नववर्षाच्या पहिल्याच दिवशी रक्तपात! अकोल्यात तंबाखू न दिल्याच्या रागातून व्यक्तीची हत्या

अकोल्यात नववर्षाच्या पहिल्याच दिवशी तंबाखू न दिल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून संतोष घावडे यांची लोखंडी पाईपने हत्या करण्यात आली. आरोपी राम गिरामला पोलिसांनी अटक केली असून परिसरात भीतीचं वातावरण आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jan 01, 2026 | 02:09 PM
विवाहित महिलेला इन्स्टाग्रामवर 'तो' व्हिडिओ पाठवला अन् नंतर...

विवाहित महिलेला इन्स्टाग्रामवर 'तो' व्हिडिओ पाठवला अन् नंतर...

Follow Us
Close
Follow Us:
  • अकोल्यातील कृषीनगर परिसरात घटना
  • तंबाखू खायला न दिल्यामुळे वाद
  • आरोपीने लोखंडी पाईपने डोक्यात वार
अकोला: अकोला शहरातून नववर्षाच्या पहिल्याच दिवशी धक्कदायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. केवळ तंबाखू खायला न दिल्याच्या कारणातून एका व्यक्तीची हत्या केल्याची घटना घडली आहे. सुरुवातीला शाब्दिक वादाने सुरुवात झाली नंतर काही वेळातच हा वाद विकोपाला गेला आणि हत्या करण्यात आली. हत्या करण्यात आलेल्या संतोष भगवंतराव घावडे असे नाव आहे. तर आरोपीचे नाव राम कैलाश गिराम असे आहे. ही घटना अकोला शहरातील कृषीनगर परिसरात घडली. या घटनेने खळबळ उडाली आहे.

Accident News: बोलेरोची दुचाकीला जोरदार धडक; अपघातात वृद्धाचा गंभीर दुखापतीमुळे मृत्यू

काय नेमकं घडल?

मिळालेल्या माहितीनुसार, संतोष घावडे आणि राम गिराम यांच्यात तंबाखूच्या कारणावरून वाद झाला होता. सुरुवातीला शाब्दिक वादाने सुरुवात झाली मात्र काही वेळातच हा वाद विकोपाला गेला. वाद एवढा वाढला की दोघांमध्ये हाणामारी झाली. यादरम्यान आरोपी राम गिराम याने लोखंडी पाईपने संतोष घावडे यांच्या डोक्यावर हल्ला केला. या हल्यात संतोष घावडे गंभीर जखमी झाले. नागरिकांनी तात्काळ मदत करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.

आरोपी अटकेत

या घटनेची माहिती मिळताच अकोला पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन करण्यासाठी पाठवण्यात आला आहे. आरोपी राम गिराम याला अटक करण्यात आली असून, त्याच्याविरोधात हत्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरु आहे.

Akola Crime: अकोल्यातून तीन अल्पवयीन मुले गायब; रात्री घराबाहेर पडले आणि…

अकोला शहरातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. सोमवारी रात्रीपासून तीन मुले गायब झाल्याची घटना समोर आली आहे. सोमवारी सायंकाळी हे तिघेही घराबाहेर पडले परंतु रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्याने कुटुंबियांच्या चिंतेत भर पडली. नातेवाईक, मित्र आणि शेजाऱ्यांकडे विचारपूस केल्यानंतरही त्यांचा काहीच ठावठिकाणा लागला नाही. शेवटी पालकांनी पोलिसात तक्रार दाखल केली. पोलीस त्यांचा शोध घेत आहे.

पोलीस तपास सुरु

आशिष सतीश मुरई, आदित्य सदानंद सुगंधी आणि दर्शन राजू रंधिरे तिघेही १५ वर्षांचे आणि एकमेकांचे मित्र आहेत. पोलिसांनी शोधमोहीम सुरु केली आहे. मुलांचे मोबाईल लोकेशन, सीसीटीव्ही फुटेजचा तपास करत आहे. पोलिसांनी तिन्ही मुलांची शेवटची हालचाल नेमकी कुठे होती. शहरातील प्रमुख चौक, बाजारपेठा, सार्वजनिक ठिकाणे, तसेच जवळच्या बसस्थानक आणि रेल्वे स्टेशन परिसरात शोधमोहीम वाढवण्यात आली आहे.

Nanded Crime: “आई-बाबा खूप आठवण…” अशी पोस्ट केल्यानंतर अवघ्या दोन तासांत तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

💡

Frequently Asked Questions

  • Que: हत्या नेमकी कशामुळे झाली?

    Ans: तंबाखू खायला न दिल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून हत्या झाली.

  • Que: मृत व्यक्ती आणि आरोपी कोण आहेत?

    Ans: मृत व्यक्ती संतोष भगवंतराव घावडे असून आरोपी राम कैलाश गिराम आहे.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: आरोपीला अटक करून हत्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.

Web Title: Akola crime bloodshed on the very first day of the new year a man was murdered in akola out of anger for not being given tobacco

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 01, 2026 | 02:09 PM

Topics:  

  • Akola
  • Akola crime
  • crime

संबंधित बातम्या

Mumbai Crime: 500 सीसीटीव्ही, महिलेचा मृतदेह आणि पडलेल्या दुचाकीच्या नंबरवरून काढला खुनी पतीचा शोध! वसईतली धक्कादायक घटना
1

Mumbai Crime: 500 सीसीटीव्ही, महिलेचा मृतदेह आणि पडलेल्या दुचाकीच्या नंबरवरून काढला खुनी पतीचा शोध! वसईतली धक्कादायक घटना

Nagpur Crime: संतापजनक! इंस्टाग्रामवर मैत्री आणि…; शाळेतून हॉटेलवर नेत अल्पवयीन मुलीच लैंगिक शोषण
2

Nagpur Crime: संतापजनक! इंस्टाग्रामवर मैत्री आणि…; शाळेतून हॉटेलवर नेत अल्पवयीन मुलीच लैंगिक शोषण

Mumbai Crime: वसईत संतापजनक प्रकार! वडिलांशी वादाचा राग 4 वर्षांच्या चिमुकल्यावर काढला; अमानुष मारहाणीनंतर मुलगा ICU मध्ये
3

Mumbai Crime: वसईत संतापजनक प्रकार! वडिलांशी वादाचा राग 4 वर्षांच्या चिमुकल्यावर काढला; अमानुष मारहाणीनंतर मुलगा ICU मध्ये

Pune Crime: हुंड्यासाठी सुनेचा छळ; पिस्तुलाचा धाक दाखवत अमानवीय अत्याचार; पुण्यातील बड्या कुटुंबातील प्रकार
4

Pune Crime: हुंड्यासाठी सुनेचा छळ; पिस्तुलाचा धाक दाखवत अमानवीय अत्याचार; पुण्यातील बड्या कुटुंबातील प्रकार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.