Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Akola Crime: रक्षकच ठरला भक्षक! लग्नाचे आमिष अन्… पोलिस कर्मचाऱ्याच्या अत्याचाराला कंटाळून अल्पवयीन मुलीची आत्महत्या

अकोल्यातील बाळापूर येथे भाड्याने राहणाऱ्या एका पोलिस कर्मचाऱ्यावर अल्पवयीन मुलीवर लग्नाचे आमिष दाखवत वारंवार अत्याचार केल्याचा आरोप आहे. या मानसिक त्रासातून पीडितेने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. आरोपी अद्याप फरार असून त्याच्या अटकेसह निष्पक्ष तपासाची मागणी जोर धरत आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 26, 2026 | 11:47 AM
खंडाळा तालुक्यातील शिंदेवाडीत मध्यरात्री राडा; रॉड-विटांनी जीवघेणा हल्ला, तीन राऊंड गोळीबार; एक गंभीर जखमी

खंडाळा तालुक्यातील शिंदेवाडीत मध्यरात्री राडा; रॉड-विटांनी जीवघेणा हल्ला, तीन राऊंड गोळीबार; एक गंभीर जखमी

Follow Us
Follow Us:
  • पोलिस कर्मचाऱ्यावर अल्पवयीन मुलीवर लग्नाचे आमिष दाखवत अत्याचार केल्याचा आरोप.
  • आत्महत्येच्या प्रयत्नानंतर उपचारादरम्यान पीडित मुलीचा मृत्यू.
  • आरोपी अद्याप फरार; POCSO अंतर्गत कारवाई आणि वरिष्ठ पातळीवर तपासाची मागणी.
अकोला: अकोल्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भाड्याच्या घरात राहणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याने घरमालकाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर पीडित मुलीने गळफास घेत आत्महत्याचा प्रयत्न केला. मुलगी काही दिवस कोमात होती, मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आलं आहे. संबंधित पोलीस कर्मचारी सध्या फरार आहे.

काय घडलं नेमकं?

या प्रकरणातील गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव पवन वडगावे असं आहे. भाड्याने राहणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याने घरमालकाच्या अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार केला. लग्नाचे आमिष दाखवत त्याने हे भयंकर कृत्य केले. या घटनेनंतर पीडित मुलीने गळफास घेत आत्महत्येचा प्रयत्न केला होता. गंभीर अवस्थेत तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. आरोपी पोलिस कर्मचारी अटक नाहीये. त्यामुळं संबंधित ठाणेदार आणि आरोपी पोलिसाला मदत करणाऱ्या पोलिसांवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.

कौटुंबिक वादातून विवाहितेची आत्महत्या; गळफास घेऊन संपवलं जीवन

ठिय्या आंदोलन

या मागणीसाठी शेडको समाज बांधव आणि नातेवाईकांचा पोलिस उपविभागीय कार्यलयासमोर ठिय्या आंदोलन चाललं आहे. या प्रकरणात बाळापुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून तो तिथेच कार्यरत होता. त्यामुळे येथील पोलीसांनी पवन वडगावे’ला फरार होण्यास मदत केल्याचा आरोप पीडित मुलीच्या नातेवाईकांनी केला आहे. दुसरीकडे हा तपास स्थानिक पोलिसांकडून वरिष्ठ पातळीवर वर्ग करण्याची मागणी होतीये. मुलगी अल्पवयीन होती तेव्हापासून तिच्यावर आरोपी अत्याचार करत असल्याने त्याच्यावर पॉस्को लावण्याची मागणी होतीये.

१३ दिवसांच्या चिमुकलीची वडिलांकडून हत्या; पाण्याच्या टाकीत फेकून संपवलं, आईच्या तक्रारीवर आरोपीला अटक

तिचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अकोला जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आलाय. दरम्यान, आरोपी पोलीस कर्मचारी अद्याप फरार असून, त्याच्या तातडीने अटकेची मागणी अधिक तीव्र झाली आहे. आरोपी अद्याप फरार असल्याने पोलिसांच्या भूमिकेवरही गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

💡

Frequently Asked Questions

  • Que: आरोपीवर कोणता आरोप आहे?

    Ans: अल्पवयीन मुलीवर लग्नाचे आमिष दाखवत वारंवार अत्याचार केल्याचा.

  • Que: पीडित मुलीचा मृत्यू कसा झाला?

    Ans: आत्महत्येच्या प्रयत्नानंतर उपचारादरम्यान.

  • Que: या प्रकरणात नागरिकांची प्रमुख मागणी काय आहे?

    Ans: आरोपीची तातडीने अटक आणि निष्पक्ष, वरिष्ठ पातळीवर तपास.

Web Title: Akola crime the protector turned predator lured by the promise of marriage minor girl commits suicide driven to the edge by a police employees abuse

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 26, 2026 | 11:47 AM

Topics:  

  • Akola
  • Akola crime
  • crime

संबंधित बातम्या

Pune MBBS Student Suicide: पुण्यात 21 वर्षीय MBBS विद्यार्थिनीची आत्महत्या; दहाव्या मजल्यावरून उडी, परीक्षा तणावाचा संशय
1

Pune MBBS Student Suicide: पुण्यात 21 वर्षीय MBBS विद्यार्थिनीची आत्महत्या; दहाव्या मजल्यावरून उडी, परीक्षा तणावाचा संशय

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला
2

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई
3

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा
4

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.