Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 7 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Akola News: अपघात की घातपात? शिंदे गटाच्या जिल्हाध्यक्षाच्या मृत्यूनंतर राजकीय खळबळ; माजी जिल्हाप्रमुखावर गंभीर आरोप

अकोल्यातील शिवसेना (शिंदे गट) अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हाध्यक्ष शेख मोहसीन यांच्या मृत्यू प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. कुटुंबीयांनी हा अपघात नसून सुनियोजित घातपात असल्याचा आरोप करत माजी जिल्हाप्रमुख मंगेश काळे यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. पोलिसांकडून सीसीटीव्हीसह सर्व बाजूंनी तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 26, 2026 | 10:09 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • शेख मोहसीन यांच्या मृत्यूला अपघात नसून घातपात असल्याचा कुटुंबीयांचा आरोप.
  • माजी जिल्हाप्रमुख मंगेश काळे यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी.
  • पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज जप्त करून सर्व बाजूंनी तपास सुरू केला.
Akola News: अकोल्यात शिंदे गटाच्या शिवसेनेचे अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हाध्यक्ष शेख मोहसीन शेख समद यांच्या मृत्यू प्रकरणाला मोठे आणि धक्कादायक वळण मिळाले आहे. सुरुवातीला अपघात मानल्या गेलेल्या या घटनेत आता सुनियोजित घातपाताचा संशय व्यक्त करण्यात येत असून, मृताच्या कुटुंबीयांनी थेट पक्षाचे माजी जिल्हाप्रमुख मंगेश काळे यांच्यावर हत्येच्या कटाचा गंभीर आरोप केला आहे. या आरोपांनंतर अकोल्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, निष्पक्ष तपास आणि आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

काय घडलं नेमक?

२३ जुलै रोजी संध्याकाळी अकोल्यातील नेहरू पार्क परिसरात शिंदेंच्या शिवसेनेचे अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष शेख मोहसीन यांच्या दुचाकीला मागून आलेल्या एका चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिली होती. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या मोहसीन यांचा रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला. मात्र हा अपघात नसून सुनियोजित घातपात असल्याचा गंभीर आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. हा आरोप त्यांनी शिंदे गटाचे माजी जिल्हाप्रमुख मंगेश काळे यांच्यावर करण्यात आला आहे. मंगेश काळे यांनीच वाहनाने धडक देत मोहसीन यांची हत्या केल्याचा थेट आरोप कुटुंबीयांनी केला आहे. यामुळे आता या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले आहे.

Crime News: LLB परीक्षेसाठी घराबाहेर पडली अन् कायमची बेपत्ता! पत्नीने भेट दिलेल्या थारमध्येच गोळी झाडून हत्या

…अन्यथा आंदोलन तीव्र

मंगेश काळे हे पक्षाचे माजी जिल्हाप्रमुख असून माजी नगरसेवक आहे. सध्या त्यांच्या पत्नी सुरेखा काळे या महापालिकेत नगरसेविका आहेत. जिल्हाध्यक्ष शेख मोहसीन शेख समद यांच्या संशयास्पद मृत्यूमुळे नातेवाईक, समर्थक आणि नागरिक हे संतप्त झाले आहे. संतप्त नागरिकांनी पोलीस ठाण्यासमोर मोठी गर्दी करत निष्पक्ष तपासाची मागणी केली असून आरोपींवर आणि माजी जिल्हाप्रमुख मंगेश काळे यांच्यावर थेट आरोप करत हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा त्यांनी दिली आहे.

सखोल तपास सुरु

पोलिसांनी या घटनेचा सखोल तपास करत आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्यात आले आहे. हा अपघात होता की पूर्वनियोजित घातपात, याचा उलगडा तपासनंतरच होणार आहे. या घटनेमुळे सध्या अकोला जिल्ह्यात तणावाचे वातावरण आहे.

कौटुंबिक वादातून विवाहितेची आत्महत्या; गळफास घेऊन संपवलं जीवन

💡

Frequently Asked Questions

  • Que: शेख मोहसीन यांच्या मृत्यूप्रकरणी कुटुंबीयांनी कोणावर आरोप केला आहे?

    Ans: माजी जिल्हाप्रमुख मंगेश काळे यांच्यावर.

  • Que: कुटुंबीयांची मुख्य मागणी काय आहे?

    Ans: मंगेश काळे यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करावा.

  • Que: या प्रकरणात पोलिसांकडून काय तपास सुरू आहे?

    Ans: सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांच्या आधारे सर्व बाजूंनी तपास सुरू आहे.

Web Title: Akola news accident or foul play political stir following the death of the shinde factions district president serious allegations against the former district chief

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 26, 2026 | 10:09 AM

Topics:  

  • Akola crime
  • akola news
  • crime

संबंधित बातम्या

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला
1

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला

अकोल्यात जलजन्य आजारांनी वाढवली चिंता; उपाययोजनेच्या नावाखाली केवळ ब्लिचिंग पावडरचा वापर
2

अकोल्यात जलजन्य आजारांनी वाढवली चिंता; उपाययोजनेच्या नावाखाली केवळ ब्लिचिंग पावडरचा वापर

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई
3

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई

शेतकऱ्यांचा सरकारविरोधात एल्गार; कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी
4

शेतकऱ्यांचा सरकारविरोधात एल्गार; कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.