Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Akola News: NEET पेपरफुटीच्या तणावातून होतकरू विद्यार्थिनीचं टोकाचं पाऊल; अकोल्यातील घटना

अकोल्यातील जीएनएम नर्सिंग शिकणाऱ्या एका होतकरू विद्यार्थिनीने आर्थिक विवंचना, वाढत्या फीचा ताण आणि NEET पेपरफुटीमुळे निर्माण झालेल्या मानसिक दबावातून आत्महत्या केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या या विद्यार्थिनीच्या मृत्यूने शिक्षण व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 09, 2026 | 09:51 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • NEET पेपरफुटी आणि शिक्षणाच्या वाढत्या खर्चामुळे विद्यार्थिनी तणावात होती.
  • गरीब कुटुंबातील विद्यार्थिनी नर्सिंगचे शिक्षण घेत होती.
  • फी वाढ आणि आर्थिक अडचणींमुळे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप.
अकोला: अकोला येथून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. उच्च शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून डॉक्टर बनू पाहणाऱ्या एका तरुण आणि होतकरू विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. देशभरात वैधकीय प्रवेशासाठी होणाऱ्या नीट परीक्षेतील पेपर फुटीमुळे आणि आर्थिक विवंचनेचा कंटाळून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

Hingoli Crime: निर्दयी कृत्य! पाच दिवसांच्या बाळाला झुडपात टाकून पळ काढला; पोलिसांचा तपास सुरू

काय घडलं नेमकं?

आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थिनींचे नाव भूमिका धबडघाव असे आहे. ही जीएनएम नर्सिंगच्या द्वितीय वर्षात शिकत होती. अत्यंत हुशार असलेल्या भूमिकाला वैद्यकीय क्षेत्रात आपले नाव कमवायचे होते आणि तिने त्यासाठी नीटची परीक्षाही दिली होती. नीट परीक्षेनंतर पुन्हा एकदा चांगला अभ्यास करून डॉक्टर होण्याचे मोठे स्वप्न तिच्या डोळ्यांत होते. मात्र सध्या नीट पेपरफुटीच्या गोंधळामुळे आणि आर्थिक विवंचनेतून तिने आत्महत्या केली.

अहोरात्र कष्ट

भूमिकाचे कुटुंब अत्यंत गरीब असून तिचे वडील एका ठिकाणी चौकीदार म्हणून काम करतात, तर तिची आई लोकांकडे धुणीभांडी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवते. अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही आपल्या मुलीचे शिक्षणाचे स्वप्न भंगू नये म्हणून तिचे आई-वडील अहोरात्र कष्ट उपसत होते. घराच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे भूमिकाने नर्सिंग शिक्षणाचा मार्ग स्वीकारला होता, जेणेकरून ती लवकर पायावर उभी राहून कुटुंबाला मदत करेल. मात्र एका बाजूला नीट परीक्षेतील गोंधळामुळे डॉक्टर होण्याच्या वाटा बंद झाल्या आणि दुसऱ्या बाजूला घेतलेल्या नर्सिंग शिक्षणाचा खर्चही पेलवेनासा झाला. शिक्षणासाठी लागणाऱ्या अवाढव्य खर्चामुळे भूमिका गेल्या काही दिवसांपासून प्रचंड मानसिक दडपणाखाली वावरत होती, असा दावा तिच्या वडिलांनी केला आहे. याच तणावातून तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.

वडिलांनाच गंभीर आरोप

भूमिकाने नर्सिंगला प्रवेश घेतला तेव्हा सुरुवातीला महाविद्यालयाकडून कमी फी सांगण्यात आली होती. मात्र, प्रवेश घेतल्यानंतर नंतरच्या काळात या शुल्कात सातत्याने वाढ करण्यात येत गेल्याचा गंभीर आरोप तिच्या वडिलांनी केला आहे. खासगी शिक्षण संस्थांमधील हा मनमानी कारभार आणि वाढता खर्च पाहून भूमिका प्रचंड तणावाखाली आली होती.

Pune Crime: जेवायला जातो’ म्हणत घराबाहेर पडला, अटल सेतूवरून घेतली समुद्रात उडी; कारण अद्याप अस्पष्ट

💡

Frequently Asked Questions

  • Que: मृत विद्यार्थिनी कोणते शिक्षण घेत होती?

    Ans: ती जीएनएम नर्सिंगच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत होती.

  • Que: विद्यार्थिनीच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती कशी होती?

    Ans: तिचे वडील चौकीदार होते, तर आई धुणीभांडी करून कुटुंब चालवत होती.

  • Que: कुटुंबीयांनी आत्महत्येमागे कोणते कारण सांगितले?

    Ans: वाढती फी, आर्थिक विवंचना आणि NEET पेपरफुटीमुळे आलेला मानसिक ताण हे कारण असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Web Title: Akola news promising female student takes extreme step due to stress over neet paper leak incident in akola

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 09, 2026 | 09:51 AM

Topics:  

  • Akola crime
  • akola news
  • crime

संबंधित बातम्या

Pune MBBS Student Suicide: पुण्यात 21 वर्षीय MBBS विद्यार्थिनीची आत्महत्या; दहाव्या मजल्यावरून उडी, परीक्षा तणावाचा संशय
1

Pune MBBS Student Suicide: पुण्यात 21 वर्षीय MBBS विद्यार्थिनीची आत्महत्या; दहाव्या मजल्यावरून उडी, परीक्षा तणावाचा संशय

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला
2

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला

अकोल्यात जलजन्य आजारांनी वाढवली चिंता; उपाययोजनेच्या नावाखाली केवळ ब्लिचिंग पावडरचा वापर
3

अकोल्यात जलजन्य आजारांनी वाढवली चिंता; उपाययोजनेच्या नावाखाली केवळ ब्लिचिंग पावडरचा वापर

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई
4

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.