Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चक्क कारवाईच्या नावाखाली ‘वसुली’? दंडात्मक कारवाई टाळून पैशांची देवाणघेवाण; सोशल मीडियावर संताप

क्रांतीचौक सिग्नलवर वाहतूक पोलिसांनी नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्याऐवजी त्यांच्याकडून वसुली केल्याचा कथित व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 14, 2026 | 12:44 PM
चक्क कारवाईच्या नावाखाली 'वसुली'? दंडात्मक कारवाई टाळून पैशांची देवाणघेवाण; सोशल मीडियावर संताप

चक्क कारवाईच्या नावाखाली 'वसुली'? दंडात्मक कारवाई टाळून पैशांची देवाणघेवाण; सोशल मीडियावर संताप

Follow Us
Follow Us:

छत्रपती संभाजीनगर : नियमभंग करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी दररोज विशेष तपासणी मोहीम राबविली जात आहे. मात्र, अशाच एका मोहिमे दरम्यान छत्रपती संमभाजीनगर शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या क्रांतीचौक सिग्नलवर वाहतूक पोलिसांनी नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्याऐवजी त्यांच्याकडून वसुली केल्याचा कथित व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमुळे वाहतूक शाखेच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

 

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या सुमारे २० आणि ३२ सेकंदांच्या कथित दोन व्हिडिओंमध्ये वाहतूक पोलिस कर्मचारी वाहनचालकांकडून पैसे स्वीकारत असल्याचे दिसत असल्याचा दावा केला जात आहे. त्यानंतर संबंधित वाहनचालकांवर वाहतूक नियमभंगाबाबत कोणतीही दंडात्मक कारवाई न करता त्यांना पुढे जाण्याची परवानगी दिल्याचे देखील व्हिडिओत स्पष्ट दिसत आहे. क्रांतीचौक हा शहरातील सर्वाधिक रहदारीचा चौक असल्याने येथे वाहतूक पोलिसांकडून सातत्याने वाहन तपासणी आणि नियमभंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाते. अपघातांना आळा बसावा आणि वाहतूक नियमांचे काटेकोर पालन व्हावे, या उद्देशाने ही मोहीम राबविली जाते. मात्र, अशाच कारवाईच्या नावाखाली पैशांची कथित वसुली होत असल्याचा आरोप समोर आल्याने संपूर्ण यंत्रणेच्या पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.

हे सुद्धा वाचा : धडक दिली… कार मागे घेतली… आणि जखमीच्या अंगावरून पुन्हा घातली; उल्हासनगरातील घटना हादरवणारी

यंत्रणेच्या पारदर्शकतेवर प्रश्न

सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, संबंधित प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याची जबाबदारी असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यावरच पैशांची कथित देवाणघेवाण केल्याचा आरोप झाल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. व्हायरल व्हिडिओची सखोल चौकशी करून संबंधित कर्मचारी दोषी आढळल्यास त्याच्यावर कठोर शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. तसेच वाहन तपासणी प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणण्यासाठी बॉडी कॅमेरे, सीसीटीव्ही आणि डिजिटल दंड प्रणालीचा प्रभावी वापर करण्याची अपेक्षाही नागरिकांनी व्यक्त केली आहे.

पैसे घेणाऱ्या कर्मचाऱ्यांचा कसूरी अहवाल पाठवला असून, त्याला हेडकॉर्टरला अटॅच करण्यात आले आहे. त्याची संपूर्ण चौकशी करुन पुढील कारवाई करण्यात येणार आहे. – सुभाष भुजंग, सहाय्यक आयुक्त, वाहतुक शाखा.

Web Title: Allegations are being made that traffic police are accepting money from motorists

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2026 | 12:44 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Police News
  • Traffic Police

संबंधित बातम्या

दुष्काळाच्या झळा, शेतकऱ्यांना मदतीची आशा; दौंड तालुक्यात पीक नुकसानीचे पंचनामे सुरू
1

दुष्काळाच्या झळा, शेतकऱ्यांना मदतीची आशा; दौंड तालुक्यात पीक नुकसानीचे पंचनामे सुरू

Maharashtra Drought : महाराष्ट्रात दुष्काळाचं संकट गडद! दुष्काळी परिस्थितीवर फडणवीसांची केंद्रीय पथकासोबत महत्त्वाची बैठक
2

Maharashtra Drought : महाराष्ट्रात दुष्काळाचं संकट गडद! दुष्काळी परिस्थितीवर फडणवीसांची केंद्रीय पथकासोबत महत्त्वाची बैठक

विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडल्यास उद्याचे आंदोलन महागात पडेल; आमदार रोहित पवारांचा सरकारला निर्वाणीचा इशारा
3

विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडल्यास उद्याचे आंदोलन महागात पडेल; आमदार रोहित पवारांचा सरकारला निर्वाणीचा इशारा

विद्यार्थ्यांवर नाही, माझ्यावर गुन्हे दाखल करा! रोहित पवार आक्रमक; फडणवीसांवरही साधला निशाणा
4

विद्यार्थ्यांवर नाही, माझ्यावर गुन्हे दाखल करा! रोहित पवार आक्रमक; फडणवीसांवरही साधला निशाणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.