Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Beed: चोरीनंतर तलावाकाठी केली दागिन्यांची वाटणी; पुरावे पाण्यात, मात्र पोलिसांच्या हाती लागला डीव्हीआर

दागिने वाटून चोरट्यांनी सीसीटीव्हीचा डीव्हीआर तलावात फेकला; मात्र पोलिसांनी तो शोधून काढत घरफोडीचा छडा लावला. ५३ तोळे सोने, पावणेदोन किलो चांदीच्या चोरीप्रकरणी दोघे जेरबंद; तिसऱ्याचा शोध सुरू.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Sep 27, 2026 | 10:19 AM
Beed: चोरीनंतर तलावाकाठी केली दागिन्यांची वाटणी; पुरावे पाण्यात, मात्र पोलिसांच्या हाती लागला डीव्हीआर

Beed: चोरीनंतर तलावाकाठी केली दागिन्यांची वाटणी; पुरावे पाण्यात, मात्र पोलिसांच्या हाती लागला डीव्हीआर

Follow Us
Follow Us:
  • ५३ तोळे सोने, पावणेदोन किलो चांदीची चोरी
  • तलावात फेकलेला डीव्हीआर पोलिसांच्या हाती
  • दोन आरोपी जेरबंद; तिसऱ्याचा शोध सुरू 
 

बीड : अंबाजोगाई शहरातील व्यापाऱ्याचे बंद घर फोडून ५३ तोळे सोने, पावणेदोन किलो चांदी आणि साडेपाच लाखांची रोकड लंपास करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने छडा लावला आहे. पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून २७ तोळे सोने आणि ८५८ ग्रॅम चांदी जप्त केली आहे. या प्रकरणातील तिसरा आरोपी फरार आहे. विशेष म्हणजे चोरीनंतर सीसीटीव्हीचा डीव्हीआर तलावात फेकून दिला होता. पोलिसांनी तो शोधून काढल्याने तपासाला महत्त्वाची दिशा मिळाली.

हेही वाचा: रिल्समधून दागिन्यांची माहिती देणे पडले महागात; सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरच्या घरातून ११८ तोळे सोने लंपास

५० हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले

अंबाजोगाईतील व्यापारी सारडा यांच्या बंद घरात २० सप्टेंबर रोजी चोरी झाली होती. घरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोकड चोरीला गेल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने परिसरातील ५० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. त्यातून तीन संशयित दुचाकीवरून फिरताना दिसून आले. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी परळी परिसरात सापळा रचून अमर काकासाहेब थोरात आणि जगजितसिंग अचलसिंग दुधानी यांना ताब्यात घेतले. चौकशीत चोरीनंतर तिघांनी तलावाजवळ दागिन्यांची वाटणी केल्याचे समोर आले.

पुरावे तलावात फेकले

चोरी केल्यानंतर आरोपींनी वापरलेले हातमोजे, जॅकेट, कपडे तसेच सीसीटीव्हीचा डीव्हीआर तलावात फेकून दिला होता. पोलिसांनी तलावात शोधमोहीम राबवून डीव्हीआर हस्तगत केला. हा पुरावा तपासासाठी महत्त्वाचा ठरला. पोलिसांच्या माहितीनुसार, अमर थोरात रिक्षाचालक असून त्याने व्यापाऱ्याचे घर हेरले होते. त्यानंतर साथीदारांच्या मदतीने चोरीचा कट रचण्यात आला. कौटुंबिक आर्थिक गरजेतून त्याने हा गुन्हा केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

हेही वाचा: वृंदावनमध्ये चौथ्या मजल्यावरून पडल्याने २५ वर्षीय रसिक दुलारीचा मृत्यू; खोलीत रक्ताचे डाग असलेले ग्राइंडर, सीसीटीव्ही फुटेज पोलिसा

तिसरा आरोपी फरार

या प्रकरणातील मंगलसिंग बावरी हा तिसरा आरोपी अद्याप फरार आहे. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके कार्यरत आहेत. चोरीची सुमारे साडेपाच लाख रुपयांची रोकडही अद्याप हस्तगत झालेली नाही. अटक आरोपी जगजितसिंग दुधानी याच्यावर यापूर्वी दरोडा, चोरी आणि घरफोडीसह दहा हून अधिक गंभीर गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. तो परभणी आणि लातूर जिल्ह्यांतील चोरीच्या काही प्रकरणांतही फरार होता. या टोळीविरुद्ध मकोका, हद्दपारी तसेच इतर लागू कायद्यांनुसार कारवाई केली जाणार असल्याची माहिती बीडचे पोलिस अधीक्षक नवनीत कावत यांनी दिली. पुढील तपास सुरू आहे.

 

Web Title: Ambajogai house break in 53 tola gold theft

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 27, 2026 | 10:19 AM

Topics:  

  • Beed Case
  • Gold Jewellery
  • Gold Theft

संबंधित बातम्या

रिल्समधून दागिन्यांची माहिती देणे पडले महागात; सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरच्या घरातून ११८ तोळे सोने लंपास
1

रिल्समधून दागिन्यांची माहिती देणे पडले महागात; सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरच्या घरातून ११८ तोळे सोने लंपास

Crime News: काही तासांत तीन महिलांना लुटले; गोल्ड लोनच्या माध्यमातून चार लाखांची उचल, सहा गुन्हे उघडकीस
2

Crime News: काही तासांत तीन महिलांना लुटले; गोल्ड लोनच्या माध्यमातून चार लाखांची उचल, सहा गुन्हे उघडकीस

Beed Crime: बिंदुसरा नदीपात्रात तीन महिन्यांच्या चिमुकलीचा मृतदेह; पुलावरून फेकले की नदीत नेऊन ठेवले?
3

Beed Crime: बिंदुसरा नदीपात्रात तीन महिन्यांच्या चिमुकलीचा मृतदेह; पुलावरून फेकले की नदीत नेऊन ठेवले?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.