Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पोक्सोच्या गुन्ह्यातील आरोपीची पोलीस कोठडीत आत्महत्या; बारामती तालुक्यात खळबळ

बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल असलेल्या आरोपीने पोलिस कोठडीत गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 28, 2026 | 06:05 PM
पोक्सोच्या गुन्ह्यातील आरोपीची पोलीस कोठडीत आत्महत्या; बारामती तालुक्यात खळबळ

पोक्सोच्या गुन्ह्यातील आरोपीची पोलीस कोठडीत आत्महत्या; बारामती तालुक्यात खळबळ

Follow Us
Follow Us:

सोमेश्वरनगर : राज्यात आत्महत्येच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून, बारामती तालुक्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल असलेल्या आरोपीने पोलिस कोठडीत गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. रवींद्र व्यंकट गार्डी (वय. ४८ रा. चव्हाण वस्ती, कोऱ्हाळे खुर्द ता. बारामती) असे या आरोपीचे नाव आहे.

 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मयत आरोपीने आपल्याच नात्यातील अल्पवयीन मुलीवर वारंवार अमानुषपणे लैंगिक अत्याचार केले. यातून मुलीला गर्भधारणा झाल्याचे आणि फलटण तालुक्यातील डॉ. नरुटे हॉस्पिटल येथे बेकायदेशीरपणे तिचा गर्भपात केल्याचे समोर आले. या घटनेची माहिती स्थानिक ग्रामस्थांना मिळताच त्यांनी सदर आरोपीला चोप देत पोलिसांच्या हवाली केले होते.

चादर फाडून घेतला गळफास

यासंदर्भात २४ एप्रिल रोजी रवींद्र गार्डी याच्याविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याला ३० एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. मंगळवारी सकाळी आठच्या दरम्यान गार्ड फ्रेश होण्यासाठी गेले असता आरोपीने पांघरण्यासाठी दिलेल्या चादरीची किनार फाडत गळफास घेत आत्महत्या केली आहे. आरोपीने फाशी घेतल्याचे लक्षात येताच त्याला तात्काळ होळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले; मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले.

वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी

घटनेची माहिती मिळताच बारामतीचे अप्पर पोलिस अधीक्षक गणेश बिरादार व उपविभागीय अधिकारी सुदर्शन राठोड यांनी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक श्रीशैल्य चिवडशेट्टी करत आहेत. हा गुन्हा उद्या गुन्हे अन्वेषण पथकाकडे वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी दिली.

हे सुद्धा वाचा : तू माझी नाही झालीस, तर कुणाचीच होऊ देणार नाही; कोंढव्यात तरुणीचा पाठलाग करून मारहाण

उच्चशिक्षित डॉक्टरांचा सहभाग दुर्दैवी

या घटनेतील पीडित मुलगी अल्पवयीन आहे. तिचे वय अवघे तेरा वर्षे आहे. असे असताना ज्यांना देवमाणूस म्हणून संबोधले जाते, त्या डॉक्टरांनी अल्पवयीन मुलीचा गर्भपात केलाच कसा, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. वास्तविक डॉक्टरांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ पोलिस प्रशासनाला माहिती देणे बंधनकारक आहे. या प्रकरणात डॉक्टरांचे मौनही वेगळीच कहाणी सांगते.

Web Title: An accused committed suicide in police custody in baramati

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 28, 2026 | 06:04 PM

Topics:  

  • Baramati Crime
  • Baramati Police
  • crime news
  • Sucide News

संबंधित बातम्या

बेपत्ता अल्पवयीनाचा नदीपात्रात आढळला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिसांच्या तपासावर आक्षेप
1

बेपत्ता अल्पवयीनाचा नदीपात्रात आढळला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिसांच्या तपासावर आक्षेप

Police Destroy Seized Drugs: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ३४३ किलोहून अधिक गांजाची विल्हेवाट
2

Police Destroy Seized Drugs: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ३४३ किलोहून अधिक गांजाची विल्हेवाट

Crime News: मेरठच्या ‘ब्लू ड्रम’ हत्याकांडाचा आज निकाल; मुस्कान-साहिलच्या शिक्षेचा मार्ग मोकळा होणार?
3

Crime News: मेरठच्या ‘ब्लू ड्रम’ हत्याकांडाचा आज निकाल; मुस्कान-साहिलच्या शिक्षेचा मार्ग मोकळा होणार?

कसायाचा भयंकर प्रकार! महिलेचा गळा चिरला अन् तुकडे करून कालव्यात फेकले; टॅटूवरुन झाला खुलासा
4

कसायाचा भयंकर प्रकार! महिलेचा गळा चिरला अन् तुकडे करून कालव्यात फेकले; टॅटूवरुन झाला खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.