Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 28 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रवाशाचा धक्कादायक कारनामा! धावत्या एसटी बसचे स्टेअरिंग ओढले अन्…; लातुरातील घटना

लातूर-औसा रोडवरील पेठ परिसरात सोमवारी दुपारी एका धक्कादायक अपघाताची घटना घडली आहे. निलंगा आगाराची एसटी बस रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दोन स्कूलबसवर जाऊन धडकली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 28, 2026 | 01:15 PM
प्रवाशाचा धक्कादायक कारनामा! धावत्या एसटी बसचे स्टेअरिंग ओढले अन्...; लातुरातील घटना

प्रवाशाचा धक्कादायक कारनामा! धावत्या एसटी बसचे स्टेअरिंग ओढले अन्...; लातुरातील घटना

Follow Us
Follow Us:

लातूर : लातूर-औसा रोडवरील पेठ परिसरात सोमवारी दुपारी एका धक्कादायक अपघाताची घटना घडली आहे. निलंगा आगाराची एसटी बस रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दोन स्कूलबसवर जाऊन धडकली आहे. या अपघातात बसमधील अनेक प्रवासी जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चालकाने प्रसंगावधान राखून बस मोकळ्या जागेत नेल्यामुळे संभाव्य मोठी जीवितहानी टळल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.

 

मिळालेल्या माहितीनुसार, निलंगा आगाराची एमएच-२० बीएल-२५७० क्रमांकाची एसटी बस दुपारी सुमारे दीड वाजता लातूर बसस्थानकातून औसाकडे निघाली होती. पेठ परिसरातील कि शाळेजवळ बस पोहोचताच बसमधील एका प्रवाशाने अचानक चालकाच्या पाठीमागे जाऊन स्टेअरिंगला हात घालत ते वळविल्याचा आरोप प्रत्यक्षदर्शी व बसमधील प्रवाशांनी केला आहे. त्यामुळे चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि बस रस्त्याच्या कडेला विद्यार्थ्यांच्या प्रतीक्षेत उभ्या असलेल्या दोन स्कूल बसवर जाऊन धडकली. या अपघातात एमएच-२६ एन-९१४३ व एमएच-२५ टी-०५८६ क्रमांकाच्या दोन्ही स्कूल बसचे मोठे नुकसान झाले. एसटी बसच्या पुढील भागाचेही मोठे नुकसान झाले आहे.

घटना घडताच बसमधील प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. अचानक झालेल्या धडकेमुळे अनेक प्रवासी जखमी झाले. त्यांना तातडीने विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्रत्यक्षदर्शीच्या मते, बसने दोन स्कूल बसना धडक दिल्यानंतरही चालकाने धैर्य न गमावता बस सुमारे शंभर फूट पुढे मोकळ्या जागेत नेऊन थांबविली. त्यामुळे बस अनियंत्रित होऊन आणखी मोठा अपघात होण्याची शक्यता टळली. त्या वेळी स्कूलबस विद्यार्थ्यांच्या प्रतीक्षेत उभ्या होत्या. सुदैवाने विद्यार्थ्यांची मोठी गर्दी नसल्याने मोठी जीवितहानी टळली. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली होती. मात्र, अपघातानंतर सुमारे अर्धा तास उलटूनही पोलीस घटनास्थळी पोहोचले नसल्याची माहिती उपस्थितांनी दिली.

हे सुद्धा वाचा : तक्रार मागे न घेतल्याचा राग अनावर, रिक्षाचालकाच्या पोटावर चाकूने सपासप वार; लाथाबुक्क्यांनीही बेदम मारहाण

चालकाच्या सतर्कतेने संकटावर मात

या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून, स्टेअरिंग ओढल्याचा आरोप असलेल्या प्रवाशाबाबतही चौकशी केली जात आहे. या अपघातामुळे लातूर-औसा मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. अपघाताचे नेमके कारण, संबंधित प्रवाशाची भूमिका आणि त्याच्याविरुद्ध कोणती कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: An incident has occurred in latur where an st bus collided with a school bus

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 28, 2026 | 01:12 PM

Topics:  

  • Accident News
  • Latur news
  • maharashtra

संबंधित बातम्या

Hit and Run Video: ‘हिट अँड रन’चा धक्कादायक प्रकार; काशीमीरा पोलिसांनी चालकाला वाहनासह घेतले ताब्यात
1

Hit and Run Video: ‘हिट अँड रन’चा धक्कादायक प्रकार; काशीमीरा पोलिसांनी चालकाला वाहनासह घेतले ताब्यात

Sindhudurg News: कुडाळचे तत्कालीन पोलीस निरीक्षक मगदूम यांना ५० हजारांचा दंड; बाबल पावस्कर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगात जाणार
2

Sindhudurg News: कुडाळचे तत्कालीन पोलीस निरीक्षक मगदूम यांना ५० हजारांचा दंड; बाबल पावस्कर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगात जाणार

Navarashtra Impact: करंजी घाटातील धोकादायक रस्त्याची दखल; ‘नवराष्ट्र’च्या पाठपुराव्यानंतर प्रशासनाची तातडीची कारवाई
3

Navarashtra Impact: करंजी घाटातील धोकादायक रस्त्याची दखल; ‘नवराष्ट्र’च्या पाठपुराव्यानंतर प्रशासनाची तातडीची कारवाई

Yavatmal News: दररोज होते ३६ हजार लिटर दुधाचे उत्पादन! सात टक्क्याने आवक घटली; खाजगी दूध विक्रेत्यांची संख्या मोठी
4

Yavatmal News: दररोज होते ३६ हजार लिटर दुधाचे उत्पादन! सात टक्क्याने आवक घटली; खाजगी दूध विक्रेत्यांची संख्या मोठी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.