Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 2 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा संताप अनावर, पतीवर चाकूने हल्ला; मुकुंदवाडीतील घटनेनं खळबळ

पतीच्या चारित्र्यावर संशय घेऊन वारंवार वाद घालणाऱ्या पत्नीने चक्क पतीवरच चाकूने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात पतीच्या उजव्या हाताच्या मनगटावर आणि अंगठ्याजवळील बोटाला दुखापत झाली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 02, 2026 | 12:10 PM
चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा संताप अनावर, पतीवर चाकूने हल्ला; मुकुंदवाडीतील घटनेनं खळबळ

चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा संताप अनावर, पतीवर चाकूने हल्ला; मुकुंदवाडीतील घटनेनं खळबळ

Follow Us
Follow Us:
  • चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा संताप अनावर
  • पतीवर केला चाकूने हल्ला
  • मुकुंदवाडीतील घटनेनं खळबळ
छत्रपती संभाजीनगर : पतीच्या चारित्र्यावर संशय घेऊन वारंवार वाद घालणाऱ्या पत्नीने चक्क पतीवरच चाकूने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात पतीच्या उजव्या हाताच्या मनगटावर आणि अंगठ्याजवळील बोटाला दुखापत झाली आहे. ही घटना ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ ते ८.३० वाजेच्या दरम्यान मुकुंदवाडीतील संघर्षनगर येथे घडली आहे. विद्या शैलेंद्र पगारे (रा. गल्ली क्रं.१५, मुकुंदवाडी) असे पतीवर चाकू हल्ला करणाऱ्या पत्नीचे नाव असून तिच्याविरोधात मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

या प्रकरणात शैलेंद्र प्रल्हाद पगारे (वय ४९, रा. संजयनगर, मुकुंदवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, फिर्यादी हे सध्या संघर्षनगर येथे राहतात. त्यांच्या पहिल्या पत्नीचे निधन झाले आहे. पहिल्या पत्नीपासून त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे.

तीन महिन्यापूर्वी केले होते दुसरे लग्न

तीन महिन्यांपूर्वी त्यांनी विद्या मोकळे हिच्याशी दुसरा विवाह केला. सुरुवातीचे १५ दिवस संसार सुरळीत सुरू होता. मात्र, त्यानंतर पत्नीने त्यांच्या चारित्र्यावर संशय घेण्यास सुरुवात केली. यावरून दोघांमध्ये वारंवार वाद होत होते. ३० ऑक्टोबर रोजी शैलेंद्र घरी नसताना पत्नीने त्यांच्या भावाला, भावजयीला आणि दोन्ही मुलांना शिवीगाळ केली. घरी परतल्यानंतर शैलेंद्र यांच्याशीही तिने वाद घातला. या सततच्या भांडणाला कंटाळून ते संजयनगर येथील जुन्या घरी निघून गेले.

हे सुद्धा वाचा : वैजापुरात जुन्या भांडणातून दोन गटांत राडा, कोयते अन् लोखंडी रॉडने एकमेकांवर हल्ले; नेमकं काय घडलं

दुसऱ्या दिवशी, ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ ते ८.३० वाजेदरम्यान ते संघर्षनगर येथील घरी अंघोळ करण्यासाठी आले. त्यावेळी पत्नीने रात्री कुठे गेले होते? अशी विचारणा करीत पुन्हा चारित्र्यावर संशय घेतला. यावरून शिवीगाळ सुरू करून तिने त्यांना मारहाण केली. शैलेंद्र समजावून सांगत असतानाच पत्नीने हातातील चाकूने त्यांच्या उजव्या मनगटावर आणि अंगठ्याजवळील बोटावर वार केला. यात त्यांच्या हाताला दुखापत झाली. पत्नीच्या वर्तनामुळे स्वतः सह मुलांच्या जीविताला धोका असल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणात मुकुंदवाडी पोलिस ठण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार सुशिल रत्नपारखे करित आहेत.

हे सुद्धा वाचा : पुण्याच्या भवानी पेठेत रक्तरंजित थरार! जुन्या वादातून रिक्षाचालकाच्या डोक्यात दगड घातला

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे आणि कधी घडली?

    Ans: ही घटना ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ ते ८.३० वाजेदरम्यान छत्रपती संभाजीनगरमधील मुकुंदवाडी परिसरातील संघर्षनगर येथे घडली.

  • Que: पतीवर चाकूने हल्ला करणाऱ्या महिलेचे नाव काय आहे?

    Ans: विद्या शैलेंद्र पगारे असे हल्ला करणाऱ्या महिलेचे नाव आहे.

  • Que: शैलेंद्र पगारे यांनी दुसरे लग्न किती महिन्यांपूर्वी केले होते?

    Ans: शैलेंद्र पगारे यांनी विद्या मोकळे यांच्याशी तीन महिन्यांपूर्वी दुसरे लग्न केले होते.

Web Title: An incident has occurred in mukundwadi where a wife assaulted her husband nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 02, 2026 | 12:10 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Knife attack

संबंधित बातम्या

Wardha Murder Case: “काही तासांपूर्वी वाद, अन् मध्यरात्री काटा काढला…” इंदिरानगरात ४-५ युवकांनी केला गजानन पाटणकरचा खून!
1

Wardha Murder Case: “काही तासांपूर्वी वाद, अन् मध्यरात्री काटा काढला…” इंदिरानगरात ४-५ युवकांनी केला गजानन पाटणकरचा खून!

वैजापुरात जुन्या भांडणातून दोन गटांत राडा, कोयते अन् लोखंडी रॉडने एकमेकांवर हल्ले; नेमकं काय घडलं
2

वैजापुरात जुन्या भांडणातून दोन गटांत राडा, कोयते अन् लोखंडी रॉडने एकमेकांवर हल्ले; नेमकं काय घडलं

पुण्याच्या भवानी पेठेत रक्तरंजित थरार! जुन्या वादातून रिक्षाचालकाच्या डोक्यात दगड घातला
3

पुण्याच्या भवानी पेठेत रक्तरंजित थरार! जुन्या वादातून रिक्षाचालकाच्या डोक्यात दगड घातला

खंडणीसाठी व्यावसायिकाच्या मुलाचे अपहरण; फरार गुंड तुषार हंबीर अखेर पोलिसांच्या ताब्यात
4

खंडणीसाठी व्यावसायिकाच्या मुलाचे अपहरण; फरार गुंड तुषार हंबीर अखेर पोलिसांच्या ताब्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.