Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अपघातातील नुकसान भरपाईच्या नावाखाली तरुणीकडून 50 हजार उकळले, नंतर…; पुण्यातील प्रकार

अपघाताच्या भरपाईच्या नावाखाली २१ वर्षीय तरुणीला करिअरचे नुकसान करण्याची धमकी देत तिच्याकडून ऑनलाइन ५० हजार रुपये जबरदस्तीने घेतल्याचा प्रकार समोर आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 18, 2026 | 06:35 PM
अपघातातील नुकसान भरपाईच्या नावाखाली तरुणीकडून 50 हजार उकळले, नंतर...; पुण्यातील प्रकार

अपघातातील नुकसान भरपाईच्या नावाखाली तरुणीकडून 50 हजार उकळले, नंतर...; पुण्यातील प्रकार

Follow Us
Follow Us:
  • तरुणीकडून 50 हजार उकळले
  • करिअरच्या नुकसानाची धमकीही दिली
  •  स्वारगेट पोलिसांत गुन्हा दाखल
पुणे : चारचाकी गाडीचा टायर फुटल्याने झालेल्या अपघातानंतर मागून आलेल्या दुसऱ्या कारने धडक दिल्याचा प्रकार घडला आहे. त्यानंतर अपघाताच्या भरपाईच्या नावाखाली २१ वर्षीय तरुणीला करिअरचे नुकसान करण्याची धमकी देत तिच्याकडून ऑनलाइन ५० हजार रुपये जबरदस्तीने घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. स्वारगेट मेट्रो स्टेशनजवळ हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी मयुर राजेंद्र रंगदळे (रा. नांदेड सिटी, सिंहगड रस्ता) याच्याविरुद्ध स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणी १५ ऑक्टोबर रोजी रात्री सव्वाअकराच्या सुमारास अमेझ कारमधून घरी जात होती. निलायम पुलाच्या आधी स्वामी समर्थ मंदिरासमोर तिच्या कारचा पुढील उजव्या बाजूचा टायर अचानक फुटला. त्यामुळे कारवरील तिचे नियंत्रण सुटले. त्याचवेळी मागून येणाऱ्या लाल रंगाच्या मारुती सुझुकी व्हिक्टोरिस कारने तरुणीच्या कारला पाठीमागून घासले. संबंधित कारचालकाने वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून दोन वाहनांमध्ये सुरक्षित अंतर न ठेवल्याचा आरोप आहे.

या अपघातानंतर १६ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास स्वारगेट मेट्रो स्टेशनजवळ तरुणीला तिच्या करिअरचे नुकसान करण्याची धमकी देण्यात आली. अपघाताच्या भरपाईच्या नावाखाली तिच्यावर पैसे देण्यासाठी दबाव आणण्यात आला. त्यातून तरुणीकडून ऑनलाइन ५० हजार रुपये घेतल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी १७ ऑक्टोबर रोजी स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करीत आहेत.

हे सुद्धा वाचा : ड्रेनेजच्या खड्ड्यात पडून ५५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, येरवड्यातील दुर्घटनेने खळबळ; नागरिकांचा संताप

कथड्याला पीकअप धडकून चार मजूरांचा मृत्यू

नाशिक-पुणे महामार्गावरील गोंदे ते दातली अंडरब्रिजदरम्यान, दोडी शिवारात शनिवारी (दि. १७) पहाटे तीनच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. काँक्रीटीकरणाचे काम आटोपून सिन्नरच्या दिशेने निघालेल्या मजुरांची पिकअप गाडी उड्डाणपुलाच्या कठड्याला धडकली. या अपघातात चार मजुरांचा मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. मयतातील तीन मजूर हे पश्चिम बंगाल तर एक जण बिहार राज्यातील रहिवासी आहे. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

💡

Frequently Asked Questions

  • Que: तरुणीकडून ५० हजार रुपये कुठे आणि कसे घेतले?

    Ans: स्वारगेट मेट्रो स्टेशनजवळ अपघातानंतर भरपाईच्या नावाखाली करिअरचे नुकसान करण्याची धमकी देऊन तरुणीकडून ऑनलाइन ५० हजार रुपये घेतल्याचा आरोप आहे.

  • Que: या प्रकरणात कोणाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे?

    Ans: मयुर राजेंद्र रंगदळे (रा. नांदेड सिटी, सिंहगड रस्ता) याच्याविरुद्ध स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • Que: तरुणीला कोणती धमकी देण्यात आली?

    Ans: अपघाताच्या भरपाईच्या नावाखाली पैसे देण्यास भाग पाडण्यासाठी तरुणीचे करिअर उद्ध्वस्त करण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे.

Web Title: An incident has occurred in pune where money was extorted from a young woman nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 18, 2026 | 06:35 PM

Topics:  

  • crime news
  • maharashtra
  • Pune Police

संबंधित बातम्या

ड्रेनेजच्या खड्ड्यात पडून ५५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, येरवड्यातील दुर्घटनेने खळबळ; नागरिकांचा संताप
1

ड्रेनेजच्या खड्ड्यात पडून ५५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, येरवड्यातील दुर्घटनेने खळबळ; नागरिकांचा संताप

Jalgaon Dal Price Hike: सणासुदीत खिशाला मोठी कात्री! डाळी महागल्या, मठानेही गाठले १८० रुपये
2

Jalgaon Dal Price Hike: सणासुदीत खिशाला मोठी कात्री! डाळी महागल्या, मठानेही गाठले १८० रुपये

गोपीचंद पडळकरांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा! सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा
3

गोपीचंद पडळकरांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा! सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा

Kolkata Devi Pandal Tragedy News: दुर्गापूजेच्या मंडपात मृत्यूचे तांडव! १९ भाविकांचा मृत्यू, ७ जणांना अटक
4

Kolkata Devi Pandal Tragedy News: दुर्गापूजेच्या मंडपात मृत्यूचे तांडव! १९ भाविकांचा मृत्यू, ७ जणांना अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.