
शेतजमिनीचा वाद विकोपाला, पुतण्याचा काकावर कुऱ्हाडीने हल्ला; समुद्रपूर तालुक्यातील घटनेनं खळबळ
दिलीप वैरागडे (रा. कोरा) हे कुटुंबीयांसह राहतात. त्यांचे शेजारी मोठा भाऊ गुलाब वैरागडे, पत्नी जिजा वैरागडे व मुलगा चेतन वैरागडे राहतात. लहान भाऊ देविदास वैरागडे हे नागपूर जिल्ह्याच्या गुमगाव येथे राहतात. तिन्ही भावंडांना वडिलोपार्जित शेतीची वाटणी करण्यात आली आहे. देविदास वैरागडे हे शेती स्वतःच करीत असल्याने ते कधी कधी कोरा येथे येतात. घटनेच्या दिवशी दिलीप बाजारातून येत असताना लहान भाऊ देविदास हे भेटले. घराजवळ आल्यानंतर त्यांचा पुतण्या चेतन याने देविदास यांना शिवीगाळ केली. याचे कारण विचारले असता चेतनने काकावर कुऱ्हाडीने हल्ला केला. यात ते जखमी झाले.
जखमीवर उपचार सुरू
दिलीप हे वाद सोडवायला गेले असता चेतनने त्यांचा गळा आवळला. त्याची पत्नी वाद सोडविण्यासाठी आली असता त्यांना देखील मारहाण करण्यात आली. त्याला धक्का देत दिलीप हे घटनास्थळावरून पळून गेले. याच झटापटीत त्यांचा मोबाइल देखील पडला. शेजारच्या घरी जाऊन संपर्क केल्यानंतर पोलिस व गावातील नागरिक घटनास्थळी पोहोचले. यानंतर त्यांनी लहान भाऊ देविदास यांना सेवाग्राम रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
अनैतिक संबंधातून वाद, महिलेचा भरदिवसा खून
काखे (ता. पन्हाळा) येथे अनैतिक संबंधांच्या वादातून एका विवाहीत महिलेचा तिच्याच घराच्या अंगणात धारदार चाकूने सपासप वार करून निघृण खून करण्यात आल्याची थरारक घटना बुधवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. पूजा अविनाश दाभाडे (वय ३३, रा. काखे) असे मृत महिलेचे नाव असून, सुरेश मधुकर दाभाडे (वय ३५) याने हा हल्ला केला आहे. भरदिवसा घडलेल्या या रक्तरंजित प्रकारामुळे काखे परिसरासह संपूर्ण पन्हाळा तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. बुधवारी दुपारी पूजा दाभाडे या घरात एकट्याच असताना आरोपी सुरेश दाभाडे तिथे आला. जुन्या अनैतिक संबंधांच्या कारणावरून दोघांमध्ये तीव्र वाद झाला. संतापाच्या भरात सुरेशने सोबत आणलेल्या धारदार चाकूने पूजा यांच्यावर अंगणातच अंधाधुंद वार केले. पूजा यांचा आरडाओरडा ऐकून शेजारी धावून आले असता, आरोपी सुरेश घटनास्थळावरून तातडीने पसार झाला.