Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

YouTube वर बघून घरफोडीचा प्लॅन, घरात गेला अन्…; सोलापुरातील घटनेनं खळबळ; आरोपीला ठोकल्या बेड्या

एक मोठी बातमी समोर आली आहे. कर्जाच्या प्रचंड आहारी गेल्यामुळे निर्माण झालेल्या आर्थिक विवंचनेतून युट्यूबवर घरफोडीच्या नवनवीन क्लृप्त्या पाहून वृद्धाचा निघृण खून करणाऱ्या आरोपीला अटक केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 06, 2026 | 02:17 PM
YouTube वर बघून घरफोडीचा प्लॅन, घरात गेला अन्...; सोलापुरातील घटनेनं खळबळ; आरोपीला ठोकल्या बेड्या

YouTube वर बघून घरफोडीचा प्लॅन, घरात गेला अन्...; सोलापुरातील घटनेनं खळबळ; आरोपीला ठोकल्या बेड्या

Follow Us
Follow Us:

सोलापूर : राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली आहे. दररोज वेगवेगळ्या भागातून खून, खुनाचा प्रयत्न, मारहाण यासारख्या घटना घडत आहेत. वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भिती निर्माण होत आहे. अशातच आता सोलापुरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. कर्जाच्या प्रचंड आहारी गेल्यामुळे निर्माण झालेल्या आर्थिक विवंचनेतून युट्यूबवर घरफोडीच्या नवनवीन क्लृप्त्या पाहून वृद्धाचा निघृण खून करणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. सोलापूर ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने कर्नाटकातील कलबुर्गी येथून शिताफीने आरोपीला जेरबंद केले आहे.

अजयकुमार गौतम चव्हाण (वय ३१, मूळ रा. जामगाव, सध्या रा. लऊळ, ता. माढा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. जामगाव (ता. माढा) येथे २५ ऑगस्टच्या रात्री घरफोडीच्या उद्देशाने आलेल्या आरोपीने घरमालक अशोक मुळे हे जागे झाल्याने आणि ओळखल्याच्या भितीने त्यांच्या डोक्यात जबर मारहाण करून त्यांचा खून केला. त्यानंतर घरातील कपाट उचकटून २ लाख ४० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले होते. याप्रकरणी विजयकुमार मुळे यांनी माढा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.

गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलिस अधीक्षकांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजय जगताप यांनी तपासासाठी ४ पोलिस निरीक्षक विजय शिंदे आणि त्यांच्या पथकाने गावात ३ दिवस तळ ठोकून तपास केला. गोपनीय माहितीदार आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी अजयकुमार चव्हाण याच्यावर संशय बळावला. आरोपी मोबाईल बंद करून कलबुर्गी येथे पसार झाला होता. पोलिस पथकाने तत्काळ कलबुर्गी येथे धाव घेत वाडी रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरून आरोपीला वाडी रेल्वे पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतले.

हे सुद्धा वाचा : दहीहंडीच्या जल्लोषाला गालबोट; १६८ गोविंदा जखमी, थरावरून पडून एका गोविंदाचा मृत्यू, तर खांब कोसळून चिमुकल्याचा अंत

महिलेचा भरदिवसा खून

काखे (ता. पन्हाळा) येथे अनैतिक संबंधांच्या वादातून एका विवाहीत महिलेचा तिच्याच घराच्या अंगणात धारदार चाकूने सपासप वार करून निघृण खून करण्यात आल्याची थरारक घटना बुधवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. पूजा अविनाश दाभाडे (वय ३३, रा. काखे) असे मृत महिलेचे नाव असून, सुरेश मधुकर दाभाडे (वय ३५) याने हा हल्ला केला आहे. भरदिवसा घडलेल्या या रक्तरंजित प्रकारामुळे काखे परिसरासह संपूर्ण पन्हाळा तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.

Web Title: An incident has occurred in solapur district where a thief murdered a person

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 06, 2026 | 02:15 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Murder Case

संबंधित बातम्या

प्रेयसीसोबत बोलल्यावरून वाद, मित्रानेच केली मित्राची हत्या; यवतमाळमधील घटनेनं खळबळ
1

प्रेयसीसोबत बोलल्यावरून वाद, मित्रानेच केली मित्राची हत्या; यवतमाळमधील घटनेनं खळबळ

कर्जवसुलीसाठी महिलेचे थेट अपहरणच केले; नंतर विवस्त्र करून व्हिडिओही बनवला अन्…
2

कर्जवसुलीसाठी महिलेचे थेट अपहरणच केले; नंतर विवस्त्र करून व्हिडिओही बनवला अन्…

बनावट व्यक्ती उभी करून प्लॉट केला नावावर; न्यायालयाच्या आदेशानंतर तीन जणांविरोधात गुन्हा दाखल
3

बनावट व्यक्ती उभी करून प्लॉट केला नावावर; न्यायालयाच्या आदेशानंतर तीन जणांविरोधात गुन्हा दाखल

डोके मुंडवले, निर्वस्त्र करून फिरवले; राजस्थानमध्ये आदिवासी महिला अत्याचार प्रकरणी पतीसह ७ आरोपींना अटक
4

डोके मुंडवले, निर्वस्त्र करून फिरवले; राजस्थानमध्ये आदिवासी महिला अत्याचार प्रकरणी पतीसह ७ आरोपींना अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.