Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 15 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रशिक्षणार्थी PSI पतीकडून विवाहितेचा छळ, पिस्तूल दाखवून धमकावल्याचा आरोप; नेमकं प्रकरण काय?

प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षक पतीने सर्व्हिस वेपन दाखवून धमकावल्याचा आरोपही विवाहितेने केला आहे. याप्रकरणी सहकारनगर पोलिस ठाण्यात ३१ वर्षीय विवाहीतेने तक्रार दिली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 15, 2026 | 02:43 PM
प्रशिक्षणार्थी PSI पतीकडून विवाहितेचा छळ, पिस्तूल दाखवून धमकावल्याचा आरोप; नेमकं प्रकरण काय?

प्रशिक्षणार्थी PSI पतीकडून विवाहितेचा छळ, पिस्तूल दाखवून धमकावल्याचा आरोप; नेमकं प्रकरण काय?

Follow Us
Follow Us:
  • प्रशिक्षणार्थी PSI पतीकडून विवाहितेचा छळ
  • पिस्तूल दाखवून धमकावल्याचा आरोप
  • सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
पुणे : स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना झालेली ओळख, नंतर प्रेमसंबंध आणि विवाह; मात्र लग्नानंतर ४० लाख रुपये, फ्लॅट आणि चारचाकी गाडीच्या मागणीवरून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षक पतीने सर्व्हिस वेपन दाखवून धमकावल्याचा आरोपही विवाहितेने केला आहे. याप्रकरणी सहकारनगर पोलिस ठाण्यात ३१ वर्षीय विवाहीतेने तक्रार दिली आहे. त्यानुसार पीएसआय पती राहुल शेषेराव राठोड (वय २९, रा. जयराम तांडा, पाचेगाव सर्कल, ता. गेवराई, जि. बीड) आणि राजू पवार (वय ४०, रा. बीड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

 

पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार आणि राहुल राठोड यांची २०२२-२३ मध्ये ओळख झाली होती. दोघेही स्पर्धा परिक्षेची तयारी करत होते. दरम्यान, ओळखीनंतर त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. विवाह करण्याचे ठरविले होते. त्यादरम्यान पोलिस उपनिरीक्षक पदावर निवड झाली. नंतर लग्न करण्याचे आश्वासन देत राहुल याने संमतीने शरीरसंबंध ठेवल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्याच्या अभ्यासाचा खर्च, वैद्यकीय उपचार आणि इतर कारणांसाठी फिर्यादीने २ लाख ४० हजार रुपयांची आर्थिक मदत केल्याचेही तक्रारीत नमूद आहे. १ ऑगस्ट २०२४ रोजी राहुलची पीएसआय पदावर निवड झाल्यानंतर त्याच्या वर्तनात बदल झाला. नातेवाइकांच्या सांगण्यावरून त्याने आपल्याशी अंतर ठेवून अपमानास्पद वागणूक देण्यास सुरुवात केली, असा आरोप केला आहे.

राहुलने लग्नास नकार दिल्यानंतर तक्रारदाराने स्वारगेट येथील सहायक पोलिस आयुक्त यांच्यांकडे तक्रार केली होती. तसेच त्यांनी भरोसा सेलकडे तक्रार अर्ज दिला होता. नंतर सप्टेंबर २०२५ मध्ये दोन्ही बाजूंच्या संमतीने आळंदी येथे विवाह झाला. विवाहानंतर राहुल प्रशिक्षणासाठी नाशिक येथे गेला. मात्र, प्रशिक्षणादरम्यान व त्यानंतरही त्याने पत्नीला सासरी नेण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप आहे.

हे सुद्धा वाचा : पोलिसावर अधिकाऱ्यावर तलवार अन् दगडाने जीवघेणा हल्ला; फरार मुख्य आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात

लग्नानंतर चारचाकी गाडी आणण्यासाठी पती व नातेवाइकांकडून तगादा लावल्याचे तक्रारीत म्हटले आहे. मागण्या पूर्ण न झाल्याने राहुलने अपमानास्पद बोलून घरखर्च देण्यासही नकार दिल्याचा आरोप आहे. सततच्या छळामुळे दोन ते तीन वेळा आत्महत्येचा प्रयत्न केल्याचेही विवाहितेने तक्रारीत म्हटले आहे. एका प्रसंगी शिवीगाळ करून पिस्तूल दाखवत धमकी दिल्याचा आरोपही तिने केला आहे. याप्रकारानंतर विवाहितेने तक्रार दाखल केली. निरीक्षक राजेश खांडवे पुढील तपास करीत आहेत.

पत्नीने दिलेल्या तक्रारीनुसार प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षक असलेल्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल राठोड असे त्याचे नाव आहे. मागील चार महिन्यापासून त्याची नेमणूक सहकारगर पोलिस ठाण्यात आहे. -विठ्ठल पवार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सहकारनगर पोलिस ठाणे.
💡

Frequently Asked Questions

  • Que: प्रशिक्षणार्थी PSI पतीवर विवाहितेने काय आरोप केले आहेत?

    Ans: प्रशिक्षणार्थी PSI पती राहुल शेषेराव राठोड याने लग्नानंतर ४० लाख रुपये, फ्लॅट आणि चारचाकी गाडीची मागणी करून शारीरिक व मानसिक छळ केल्याचा आरोप विवाहितेने केला आहे. तसेच सर्व्हिस वेपन दाखवून धमकावल्याचेही तिने तक्रारीत म्हटले आहे.

  • Que: प्रशिक्षणार्थी PSI पतीने विवाहितेला कशाची मागणी केली होती?

    Ans: विवाहितेने दिलेल्या तक्रारीनुसार, लग्नानंतर तिच्याकडे ४० लाख रुपये, फ्लॅट आणि चारचाकी गाडीची मागणी करण्यात आली होती. या मागण्यांवरून तिचा शारीरिक व मानसिक छळ केल्याचा आरोप आहे.

  • Que: विवाहितेच्या तक्रारीनंतर कोणाविरुद्ध गुन्हा दाखल झाला?

    Ans: या प्रकरणी सहकारनगर पोलिस ठाण्यात ३१ वर्षीय विवाहितेने तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार प्रशिक्षणार्थी PSI पती राहुल शेषेराव राठोड (वय २९) आणि राजू पवार (वय ४०) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Web Title: An incident has occurred in which a trainee psi husband harassed his wife nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 15, 2026 | 02:43 PM

Topics:  

  • crime news
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

पोलिसावर अधिकाऱ्यावर तलवार अन् दगडाने जीवघेणा हल्ला; फरार मुख्य आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात
1

पोलिसावर अधिकाऱ्यावर तलवार अन् दगडाने जीवघेणा हल्ला; फरार मुख्य आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात

केज तालुक्यात खळबळ! प्रियकराच्या मुलानेच केली महिलेची हत्या; मृतदेह पुरला अन्…
2

केज तालुक्यात खळबळ! प्रियकराच्या मुलानेच केली महिलेची हत्या; मृतदेह पुरला अन्…

मोशीत महिलेचा निर्घृण खून, चेहरा विद्रूप करून ओळख लपवण्याचा प्रयत्न; पोलिसांनी २४ तासांत उकलले खुनाचे गूढ
3

मोशीत महिलेचा निर्घृण खून, चेहरा विद्रूप करून ओळख लपवण्याचा प्रयत्न; पोलिसांनी २४ तासांत उकलले खुनाचे गूढ

धक्कादायक ! सरकारी नोकरीचे आमिष दाखवून अत्याचार, ‘तो’ व्हिडिओ व्हायरल
4

धक्कादायक ! सरकारी नोकरीचे आमिष दाखवून अत्याचार, ‘तो’ व्हिडिओ व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.