Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 15 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोशीत महिलेचा निर्घृण खून, चेहरा विद्रूप करून ओळख लपवण्याचा प्रयत्न; पोलिसांनी २४ तासांत उकलले खुनाचे गूढ

मोशीतील बोऱ्हाडेवाडी परिसरात धारदार शस्त्राने वार करून एका महिलेचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तिची ओळख पटू नये म्हणून चेहराही विद्रूप करण्यात आला होता.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 15, 2026 | 11:45 AM
मोशीत महिलेचा निर्घृण खून, चेहरा विद्रूप करून ओळख लपवण्याचा प्रयत्न; पोलिसांनी २४ तासांत उकलले खुनाचे गूढ

मोशीत महिलेचा निर्घृण खून, चेहरा विद्रूप करून ओळख लपवण्याचा प्रयत्न; पोलिसांनी २४ तासांत उकलले खुनाचे गूढ

Follow Us
Follow Us:
  • मोशीतील बोऱ्हाडेवाडीत महिलेची निर्घृण हत्या
  • चेहरा विद्रूप करून ओळख लपवली
  • पोलिसांनी २४ तासांत उकलले खुनाचे गूढ
पिंपरी : मोशीतील बोऱ्हाडेवाडी परिसरात धारदार शस्त्राने वार करून एका महिलेचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तिची ओळख पटू नये म्हणून चेहराही विद्रूप करण्यात आला होता. मात्र, गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे एमआयडीसी भोसरी पोलिसांनी मृत महिलेची ओळख पटवून खुनाच्या गुन्ह्याचा अवघ्या २४ तासांत उलगडा केला आहे. याप्रकरणी चार संशयितांना मंगळवारी (दि. १३ ऑक्टोबर) अटक करण्यात आली आहे.

 

प्रियंका आकाश कांबळे (वय ३०, रा. मोरे वस्ती, टॉवर लाइन, चिखली) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. आकाश ऊर्फ घाऱ्या रमेश कांबळे (वय २८, रा. बोऱ्हाडेवाडी, मोशी), प्रथम बालाजी कांबळे (२२, रा. गव्हाणे वस्ती, भोसरी), रोहित दिनेश शिंदे (वय १९) आणि दिनेश मधुकर वाघमारे (वय १९, दोघे रा. बोऱ्हाडेवाडी, मोशी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

पोलिस उपायुक्त मारुती जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार, बोऱ्हाडेवाडी येथे सोमवारी (दि. १२ ऑक्टोबर) पहाटे अडीचच्या सुमारास एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला. तिच्या मानेवर आणि चेहऱ्यावर धारदार शस्त्राने वार केले होते. चेहरा विद्रूप केल्यामुळे मृत महिलेची ओळख पटविण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी विशेष तपास पथक नेमले. गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपासाची दिशा निश्चित केली. त्यातून मृत महिला प्रियंका कांबळे असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर संशयितांचा माग काढून चार संशयितांना अटक केली. संशयितांना न्यायालयात हजर केले असता १६ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा : धक्कादायक ! सरकारी नोकरीचे आमिष दाखवून अत्याचार, ‘तो’ व्हिडिओ व्हायरल

पोलिस उपायुक्त रोहिदास पवार, मारुती जगताप, सहायक आयुक्त सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक गणेश जामदार, पोलिस निरीक्षक भोजराज मिसाळ, उपनिरीक्षक बालाजी जोनापल्ले, पोलिस अंमलदार प्रशांत सोरटे, संजय जरे, चंद्रकांत गवारी, गणेश बोऱ्हाडे, स्वप्नील शेलार, राहुल लोखंडे, सुनील चौधरी, बाजीराव सानप, नितीन खेसे, भागवत शेप, गजानन आढे, आशिष गोपी, स्वप्नील झनकर, पवन कोंडेदेशमुख, प्रवीण मुळुक, अमोल दातार, राजू जाधव व अरुणा खंदारे यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे.

पती- पत्नीमध्ये कौटुंबिक वाद होते. यातून पती आकाश कांबळे याने साथीदारांच्या मदतीने प्रियंक कांबळेचा खून केल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे. यात सखोल चौकशी आणि तपास करण्यात येत आहे. – सुधाकर यादव, सहायक पोलिस आयुक्त.
💡

Frequently Asked Questions

  • Que: मोशीतील महिलेच्या खून प्रकरणाचा उलगडा किती वेळात झाला?

    Ans: मोशीतील बोऱ्हाडेवाडी परिसरातील महिलेच्या खून प्रकरणाचा उलगडा एमआयडीसी भोसरी पोलिसांनी अवघ्या २४ तासांत केला. गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी मृत महिलेची ओळख पटवून या प्रकरणी चार संशयितांना अटक केली.

  • Que: मृत महिलेची ओळख पटू नये म्हणून आरोपींनी काय केले होते?

    Ans: मृत महिलेची ओळख पटू नये यासाठी आरोपींनी धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्यानंतर तिचा चेहरा विद्रूप केला होता.

  • Que: मोशीतील बोऱ्हाडेवाडीत महिलेची हत्या कशी करण्यात आली?

    Ans: मोशीतील बोऱ्हाडेवाडी परिसरात एका महिलेची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली. मृत महिलेची ओळख पटू नये म्हणून तिचा चेहराही विद्रूप करण्यात आला होता.

Web Title: A woman has been murdered in the borhadewadi area of moshi nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 15, 2026 | 11:45 AM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Murder Case

संबंधित बातम्या

धक्कादायक ! सरकारी नोकरीचे आमिष दाखवून अत्याचार, ‘तो’ व्हिडिओ व्हायरल
1

धक्कादायक ! सरकारी नोकरीचे आमिष दाखवून अत्याचार, ‘तो’ व्हिडिओ व्हायरल

Crime News: ठाण्यात हत्यासत्र सुरूच? राजकीय नेत्याच्या हत्येनंतर युट्यूबरवर गोळीबार
2

Crime News: ठाण्यात हत्यासत्र सुरूच? राजकीय नेत्याच्या हत्येनंतर युट्यूबरवर गोळीबार

बारामतीत बंद घर चोरट्यांच्या निशाण्यावर! पत्रकाराचे घर फोडले; सोनं, चांदीसह पावणे चार लाखांचा ऐवज लंपास
3

बारामतीत बंद घर चोरट्यांच्या निशाण्यावर! पत्रकाराचे घर फोडले; सोनं, चांदीसह पावणे चार लाखांचा ऐवज लंपास

Nalasopara News: मैत्री, प्रेमाचं आमिष अन् धर्मांतरासाठी दबाव; नालासोपाऱ्यात तरुणीचा गंभीर आरोप
4

Nalasopara News: मैत्री, प्रेमाचं आमिष अन् धर्मांतरासाठी दबाव; नालासोपाऱ्यात तरुणीचा गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.