Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 15 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पोलिसावर अधिकाऱ्यावर तलवार अन् दगडाने जीवघेणा हल्ला; फरार मुख्य आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात

उमरखेड शहरातील नागचौक येथे पोलिस अधिकाऱ्यांवर तलवार व दगडाने जीवघेणा हल्ला करून गेल्या १० महिन्यापासून फसार असलेल्या मुख्य आरोपीला अटक करण्यात उमरखेड पोलिसांच्या डी. बी. पथकाला अखेर यश आले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 15, 2026 | 01:07 PM
पोलिसावर अधिकाऱ्यावर तलवार अन् दगडाने जीवघेणा हल्ला; फरार मुख्य आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात

पोलिसावर अधिकाऱ्यावर तलवार अन् दगडाने जीवघेणा हल्ला; फरार मुख्य आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Follow Us
Follow Us:
  • पोलिसावर तलवार आणि दगडाने जीवघेणा हल्ला
  • मुख्य आरोपी गेल्या १० महिन्यांपासून फरार होता
  • नांदेड रोडवर सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले
उमरखेड : राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली असून, वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण होत आहे. अशातच आता उमरखेड शहरातील नागचौक येथे पोलिस अधिकाऱ्यांवर तलवार व दगडाने जीवघेणा हल्ला करून गेल्या १० महिन्यापासून फसार असलेल्या मुख्य आरोपीला अटक करण्यात उमरखेड पोलिसांच्या डी. बी. पथकाला अखेर यश आले आहे. शेख अन्सार शेख इस्माईल (वय ३२, रा. उमरखेड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे आहे. त्याला नांदेड रोडवरून सापळा रचून ताब्यात घेण्यात आले.

 

मिळालेल्या माहितीनुसार, चालू वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच १४ जानेवारी रोजी सायंकाळी उमरखेड येथील नागचौक भागात दोन गटात वाद सुरू होता. हा वाद सोडवण्यासाठी गेलेल्या उमरखेड पोलिस स्टेशनच्या पोलिस अधिकाऱ्यांवर काही ज्ञात व अज्ञात आरोपींनी तलवार आणि दगडांनी भीषण हल्ला केला होता. या गुन्ह्यातील काही आरोपींना पोलिसांनी यापूर्वीच अटक केली होती. मात्र, घटनेच्या दिवसापासूनच मुख्य आरोपी शेख अन्सार हा पोलिसांना चकमा देऊन फरार झाला होता.

डी. बी. पथक गेल्या काही दिवसांपासून तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे या आरोपीवर पाळत ठेवून होते. अखेर सोमवारी आरोपी उमरखेड येथील नांदेड रोड परिसरात आल्याची खात्रीशीर माहिती पथकाला मिळताच पोलिसांनी तातडीने सापळा रचून त्याला शिताफीने अटक केली. या आरोपीला मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता त्याला पोलिस कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक गंगलवाड करीत आहेत. आरोपीला पकडण्यासाठी निर्देश दिले होते. ही कारवाई उमरखेड पोलिस ठाण्याचे ठाणेदार शंकर पांचाळ यांच्या मार्गदर्शनात स.पो.नि. व्यंकट गंगलवाड, डी.बी. प्रमुख पोलिस उपनिरीक्षक शरद लोहकरे, सहायक फौजदार पतंगे आदींनी केली.

हे सुद्धा वाचा : ‘मी आणखी किती सहन करू?’ पोस्टनंतर यूट्यूबर बेपत्ता; १.७५ कोटींच्या खंडणीप्रकरणी गुन्हा

💡

Frequently Asked Questions

  • Que: पोलिसांवर हल्ला करणारा आरोपी किती महिन्यांपासून फरार होता?

    Ans: शेख अन्सार शेख इस्माईल हा गेल्या १० महिन्यांपासून फरार होता. अखेर उमरखेड पोलिसांच्या डी.बी. पथकाने त्याला अटक केली.

  • Que: उमरखेड पोलिसांनी फरार आरोपीला कुठून आणि कसे पकडले?

    Ans: उमरखेड पोलिसांच्या डी.बी. पथकाने नांदेड रोडवर सापळा रचून शेख अन्सार शेख इस्माईल याला ताब्यात घेतले. १० महिन्यांपासून फरार असलेल्या मुख्य आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले.

  • Que: उमरखेडमध्ये पोलिस अधिकाऱ्यावर हल्ला कसा करण्यात आला होता?

    Ans: उमरखेड शहरातील नागचौक परिसरात पोलिस अधिकाऱ्यांवर तलवार आणि दगडाने जीवघेणा हल्ला करण्यात आला होता.

Web Title: The police have arrested the accused who attacked a police officer nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 15, 2026 | 01:07 PM

Topics:  

  • Arrested News
  • CM Devedra Fadnavis
  • crime news

संबंधित बातम्या

केज तालुक्यात खळबळ! प्रियकराच्या मुलानेच केली महिलेची हत्या; मृतदेह पुरला अन्…
1

केज तालुक्यात खळबळ! प्रियकराच्या मुलानेच केली महिलेची हत्या; मृतदेह पुरला अन्…

मोशीत महिलेचा निर्घृण खून, चेहरा विद्रूप करून ओळख लपवण्याचा प्रयत्न; पोलिसांनी २४ तासांत उकलले खुनाचे गूढ
2

मोशीत महिलेचा निर्घृण खून, चेहरा विद्रूप करून ओळख लपवण्याचा प्रयत्न; पोलिसांनी २४ तासांत उकलले खुनाचे गूढ

धक्कादायक ! सरकारी नोकरीचे आमिष दाखवून अत्याचार, ‘तो’ व्हिडिओ व्हायरल
3

धक्कादायक ! सरकारी नोकरीचे आमिष दाखवून अत्याचार, ‘तो’ व्हिडिओ व्हायरल

बारामतीत बंद घर चोरट्यांच्या निशाण्यावर! पत्रकाराचे घर फोडले; सोनं, चांदीसह पावणे चार लाखांचा ऐवज लंपास
4

बारामतीत बंद घर चोरट्यांच्या निशाण्यावर! पत्रकाराचे घर फोडले; सोनं, चांदीसह पावणे चार लाखांचा ऐवज लंपास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.