Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

एकनाथ खडसेंच्या फार्महाऊसवर ड्रोनद्वारे रेकी! पोलिसांकडे तक्रार; घटना कॅमेऱ्यात कैद

माजी मंत्री तथा आमदार एकनाथ खडसे यांच्या मुक्ताईनगर येथील 'खडसे फार्म'वर अज्ञात व्यक्तीकडून रात्रीच्या वेळी ड्रोनद्वारे संशयास्पद चित्रीकरण करण्यात आल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 05, 2026 | 12:40 PM
एकनाथ खडसेंच्या फार्महाऊसवर ड्रोनद्वारे रेकी! पोलिसांकडे तक्रार; घटना कॅमेऱ्यात कैद

एकनाथ खडसेंच्या फार्महाऊसवर ड्रोनद्वारे रेकी! पोलिसांकडे तक्रार; घटना कॅमेऱ्यात कैद

Follow Us
Follow Us:

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार पक्ष) ज्येष्ठ नेते, माजी मंत्री तथा आमदार एकनाथ खडसे यांच्या मुक्ताईनगर येथील ‘खडसे फार्म’वर अज्ञात व्यक्तीकडून रात्रीच्या वेळी ड्रोनद्वारे संशयास्पद चित्रीकरण करण्यात आल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. आपल्याविरोधात मोठे षडयंत्र रचले जात असल्याची तीव्र शंका व्यक्त करीत आमदार खडसे यांनी जळगावचे पोलिस उपअधीक्षकांकडे पत्राद्वारे तक्रार दाखल केली आहे. याशिवाय उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाजवळ मलकापूर रोडवरील खडसे फार्महाऊसवर २८ सप्टेंबरला रात्री ७.५० ते ८.१५ च्या दरम्यान अचानक एक ड्रोन घिरट्या घालताना दिसून आले. या ड्रोनद्वारे फार्महाऊस परिसराचे चित्रीकरण केले जात होते. घटनेच्या वेळी आमदार खडसे हे मुंबई दौऱ्यावर होते. मात्र, फार्महाऊसवर कार्यरत असलेले रखवालदार सचिन मराठे यांना ही घटना लक्षात आली. त्यांनी प्रसंगावधान राखून आपल्या मोबाइलमध्ये या संपूर्ण प्रकाराचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करून पुरावा म्हणून जतन केला आहे.

या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस मुख्यालयातील उपअधीक्षकांसह मुक्ताईनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक व उपविभागीय अधिकाऱ्यांना पत्राची प्रत पाठविली आहे. फार्महाऊसवर ड्रोनद्वारे रेकी करणाऱ्या व्यक्तींचा शोध घेऊन या संपूर्ण प्रकरणाची सखोल व उच्चस्तरीय चौकशी आणि दोषींवर कारवाई करत अहवाल सादर करावा, अशी मागणी आहे.

हे सुद्धा वाचा : ठाकरे गटाला मोठा धक्का! उपनेता शरद कोळीवर MPDA अन्वये कारवाई; थेट येरवडा कारागृहात रवानगी

हे तर माझ्याविरोधातील मोठे षडयंत्र

घटनेबाबत बोलताना आमदार खडसे यांनी आपल्या सुरक्षेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. रात्रीच्या वेळी अशाप्रकारे विनापरवाना ड्रोन उडवून रेकी करणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. यापूर्वी देखील माझी कोणतीही परवानगी न घेता सलग ६२ दिवस माझे मोबाईल फोन बेकायदेशीरपणे टॅप करण्यात आले होते, ज्याबाबत मी मुंबईतील पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. आता पुन्हा असा प्रकार घडत असल्याने माझ्याविरोधात कुठेतरी मोठे षडयंत्र रचले जात असावे, असा आरोप आमदार खडसे यांनी केला आहे.

हे सुद्धा वाचा : भवानी पेठेत किरकोळ वादातून तरुणाची हत्या; डोक्यात सिमेंटचा ब्लॉक घालून संपवलं

Web Title: An incident involving a drone flying over eknath khadses farmhouse has occurred nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 05, 2026 | 12:40 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • eknath khadse
  • Jalgaon

संबंधित बातम्या

Parents Association : दिवेआगार घटनेनंतर पालक संघटना आक्रमक, थेट मुख्यमंत्र्यांना धाडलं पत्र
1

Parents Association : दिवेआगार घटनेनंतर पालक संघटना आक्रमक, थेट मुख्यमंत्र्यांना धाडलं पत्र

Jalgaon News: यावलकरांसाठी मोठी बातमी! ५६ कोटींची पाणीपुरवठा योजना प्रगतीपथावर, ५० टक्के काम पूर्ण
2

Jalgaon News: यावलकरांसाठी मोठी बातमी! ५६ कोटींची पाणीपुरवठा योजना प्रगतीपथावर, ५० टक्के काम पूर्ण

रिक्षातील प्रवाशाला कोयत्याचा धाक दाखवून लुटले; 24 तासांत सराईत टोळी जेरबंद
3

रिक्षातील प्रवाशाला कोयत्याचा धाक दाखवून लुटले; 24 तासांत सराईत टोळी जेरबंद

तरुणाईंच्या मुळ प्रश्नांना भाजपने उत्तर द्यावे, कितीही गुन्हे दाखल केले तरीही…; हर्षवर्धन सपकाळांचा इशारा
4

तरुणाईंच्या मुळ प्रश्नांना भाजपने उत्तर द्यावे, कितीही गुन्हे दाखल केले तरीही…; हर्षवर्धन सपकाळांचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.