...अन्यथा पुणे शहर बंद पाडू!"; MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्यावरून रोहित पवारांचा इशारा
गेल्या पाच-सहा दिवसांपासून एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसोबत पुण्यातील एस.एम. जोशी पुलाजवळ एमपीएसीच्या विद्यार्थ्याचे आंदोलन सुरू आहे. आमदार रोहित पवार हे या आंदोलनाचे नेतृत्त्व करत आहेत. विवेक भीमनवार यांनी राजीनाम दिला असून तो तातडीने घ्यावा, अशी मागणी रोहित पवार यांच्याकडून करण्यात आली आहे.
भीमनवार यांनी परवा संध्याकाळीच मुख्यमंत्र्यांकडे त्यांचा राजीनामा पाठवला आहे. पण मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा पाठवून काहीच उपयोग नाही, त्यांनी राजीनामा राज्यपालांकडे पाठवायला पाहिजे होता.पण त्यांनी राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे पाठवल्याने हा विषय त्यांच्या कोर्टात गेला आहे. पण भीमनवार यांचा राजीनामा घेतल्यास उद्या सामान्य लोक कोणाचाही राजीनामा मागतील, उद्या मुख्यमंत्र्यांचाही राजीनामा मागितला जाऊ शकतो. त्यामुळे आता हा खेळ सगळा त्यांच्या इगोवर आला आहे. अशी टिकाही रोहित पवार यांनी केली.
खरंतर भीमनवार यांनी राज्यपालांकडे राजीनामा देणे अपेक्षित होते. पण त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठवला. भीमनवार यांनीही खेळी खेळली असावी, मी राजीनामा दिलाय, आता तुम्हाला मला वाचवायचं आहे. त्यामुळे त्यांनी हा चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात टाकला आहे. पण आजच्या मंत्रिमंडळाचा बैठकीत राजीनाम्यावर निर्णय नाही झाला तर आम्ही पुणे बंद पाडू, असा इशाराही रोहित पवार यांनी दिला आहे.
आम्हाला आतल्या गोटातून माहिती मिळाली आहे. भीमनवार यांनी मुख्यमंत्र्यांवरील ताण वाढवला आहे. आता मित्राला वाचवायचे की इगो जपायचा की विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य करायच्या. दुपारी कॅबिनेटमध्ये काय निर्णय होतो ते पाहू, नाहीतर ठरल्याप्रमाणे आम्ही पुणे बंद पाडणार, असा इशारा रोहित पवार यांनी दिला आहे.
पुण्यात सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला परवानगी नाकारल्यानंतरही आंदोलन सुरू असल्याने पुणे पोलिसांनी २९ खासगी शिकवणी व अभ्यासिका चालकांसह ५१ विद्यार्थ्यांना नोटिसा बजावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
CM Meeting on MPSC: MPSC विद्यार्थ्यांच्या विजयाचा एल्गार! शासनाकडून मागण्या मान्य
पुण्यात एमपीएससीच्या विविध मागण्यांसाठी तीन ठिकाणी आंदोलने सुरू असून ही आंदोलने बेकायदा असल्याचे सांगत पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. तसेच आंदोलनाला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदत करणाऱ्यांवरही कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. आंदोलनस्थळी पुरावे गोळा करण्यासाठी चित्रीकरण करण्यात येत असल्याची माहितीही पोलिसांनी दिली आहे.
या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी पुणे पोलिसांच्या कारवाईवर भाष्य केले. पोलिसांकडून टेलिग्राम चॅनेललाही नोटिसा पाठवण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. तसेच काही विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष भेटून नोटीस देण्याचा प्रयत्न झाल्याचेही त्यांनी म्हटले. “माझी पुणे पोलिसांना विनंती आहे की, दिल्ली पोलिसांप्रमाणे वागू नका. अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते,” असा इशारा रोहित पवार यांनी दिला.
एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांचा राजीनामा तात्काळ मंजूर करून नवीन पारदर्शक अध्यक्षांची नियुक्ती करावी.
परीक्षा प्रक्रियेतील विलंब, उत्तरतालिकांमधील गोंधळ आणि कथित गैरप्रकार थांबवून पारदर्शक भरती प्रक्रिया राबवावी.
आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत या विषयावर निर्णय न झाल्यास आंदोलन तीव्र करत पुणे बंदची हाक देण्यात आली आहे.
“विद्यार्थ्यांच्या भवितव्यापेक्षा सरकारचा अहंकार मोठा असू शकत नाही. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत भीमनवार यांचा राजीनामा मंजूर न झाल्यास रस्त्यावर उतरून पुणे बंद करू.”
— रोहित पवार (आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस SP)






