Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 21 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आम्ही इथले डॉन आहोत, तुला येथे राहायचे असेल तर…; संभाजीनगरात परप्रांतीय कामगारावर हल्ला

तू बाहेरून आला आहेस, आम्ही इथले डॉन आहोत. तुला येथे राहायचे असेल तर हप्ता द्यावा लागेल, अशी धमकी देत तडीपार गुंडाच्या टोळीने परप्रांतीय मजुराला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 21, 2026 | 06:30 PM
आम्ही इथले डॉन आहोत, तुला येथे राहायचे असेल तर...; संभाजीनगरात परप्रांतीय कामगारावर हल्ला

आम्ही इथले डॉन आहोत, तुला येथे राहायचे असेल तर...; संभाजीनगरात परप्रांतीय कामगारावर हल्ला

Follow Us
Follow Us:

छत्रपती संभाजीनगर : तू बाहेरून आला आहेस, आम्ही इथले डॉन आहोत. तुला येथे राहायचे असेल तर हप्ता द्यावा लागेल, अशी धमकी देत तडीपार गुंडाच्या टोळीने परप्रांतीय मजुराला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. हप्ता देण्यास नकार दिल्याने त्याच्या हातावर चाकूने वार करून खिशातील २ हजार रुपये लुटले आहेत. ही घटना मंगळवारी (१८ ऑगस्ट) रात्री ९.३० वाजेच्या सुमारास मुकुंदवाडीतील संजयनगर येथे घडली आहे. या प्रकरणी चौघांविरुद्ध दरोडा, मारहाण व धमकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तडीपार गुंड सिद्धार्थ सोनवणे ऊर्फ सिध्या आणि रेकॉर्डवरील गुन्हेगार युवराज चव्हाण ऊर्फ लल्या यांना अटक करण्यात आली आहे. दोघे साथीदार पसार आहेत. अटक आरोपींना एक दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक विवेक सोनवणे यांनी दिली.

फिर्यादी मनबहादूर भिमबहादूर थापा (४८, रा. संजयनगर) हे चिकलठाणा येथील नम्रता केटरिंगमध्ये काम करतात. १८ ऑगस्ट रोजी रात्री ते बाजारात जाण्यासाठी घराबाहेर उभे असताना युवराज, सिद्धार्थ व त्यांचे दोन साथीदार तेथे आले. त्यांनी मनबहादूर यांना पकडून हप्ता मागितला. त्यांनी आपण गरीब असल्याचे सांगून सोडण्याची विनंती केली; मात्र आरोपींनी शिवीगाळ करत मारहाण केली. मनबहादूर यांचा आरडाओरडा ऐकून मित्र मदतीला आले. त्यावेळी सिद्धार्थने मध्ये पडल्यास तुमचाही गेम करून टाकू, अशी धमकी दिली. त्यानंतर चौघांनी मनबहादूर यांना खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व दोन हजार रूपये हिसकावून पोबारा केला.

हे सुद्धा वाचा :  मायमर रुग्णालयात शिक्षिकेसह नवजात बाळाचा मृत्यू; उपचारातील हलगर्जीपणाच्या आरोपांनी खळबळ

तिकीट विक्री केंद्रात रेल्वे कर्मचाऱ्यावर हल्ला

पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारातील तिकिट विक्री केंद्रातील कर्मचाऱ्यावर चाकूने वार करुन रोकड लुटून नेल्याची प्रकार समोर आला आहे. ही घटना मंगळवारी मध्यरात्री घडली असून, चोरट्यांनी चाकूने वार केल्याने रेल्वे कर्मचारी जखमी झाला आहे. रेल्वे कर्मचाऱ्याच्या गळ्यातील सोनसाखळी, मोबाइल, तसेच तिकिट विक्रीतून जमा झालेली २६ हजारांची रोकड असा ४ लाख ९१ हजार रुपयांचा मुद्देमाल लुटून नेला आहे. केल्विन सोलोमन मायला (वय २९, रा. धायरकर कॉलनी, मुंढवा) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांत दोन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: An incident involving the assault of a worker has occurred in sambhajinagar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 21, 2026 | 06:30 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Sambhajinagar

संबंधित बातम्या

चाकूने भोसकून सराईत गुंडाची हत्या; प्रेयसीला दुसऱ्या तरुणासोबत पाहून झाला वाद अन्…
1

चाकूने भोसकून सराईत गुंडाची हत्या; प्रेयसीला दुसऱ्या तरुणासोबत पाहून झाला वाद अन्…

कान्हे येथे 105 ग्रॅम गांजा जप्त, 55 वर्षीय व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल; वडगाव मावळ पोलिसांची कारवाई 
2

कान्हे येथे 105 ग्रॅम गांजा जप्त, 55 वर्षीय व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल; वडगाव मावळ पोलिसांची कारवाई 

Daund Murder : दौंडमध्ये 70 वर्षीय महिलेचा धारदार शस्त्राने खून; 12 तासात 2 आरोपींना ठोकल्या बेड्या
3

Daund Murder : दौंडमध्ये 70 वर्षीय महिलेचा धारदार शस्त्राने खून; 12 तासात 2 आरोपींना ठोकल्या बेड्या

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा ७.९७ लाखांचा साठा जप्त, दोघांना अटक; अन्न व औषध प्रशासनाची मध्यरात्री धडक कारवाई
4

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा ७.९७ लाखांचा साठा जप्त, दोघांना अटक; अन्न व औषध प्रशासनाची मध्यरात्री धडक कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.