
पुरंदरमध्ये खळबळ! धमकी देत अल्पवयीन तरुणीवर अत्याचार; हॉटेलमध्ये नेले अन्...
सासवड : राज्यासह देशभरात अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटनांध्ये मोठी वाढ झाली आहे. वाढत्या घटनांमुळे अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशातच आता अल्पवयीन मैत्रिणीला लॉजवर नेत तिथे तिचे अश्लील फोटो काढले. त्यानंतर ते फोटो समाज माध्यमात व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर बलात्कार केल्याची घटना पुरंदर तालुक्यातील झेंडेवाडी जवळील व्हिक्टरी इन इव्हिनिंग मध्ये घटना घडली आहे. याप्रकरणी सासवड पोलिस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पियुष रामराव राऊत (वय २१. रा.अन्सारी मार्ग, हडपसर, पुणे) असे गुन्हा नोंदवण्यात आल्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, पिडीत अल्पवयीन मुलगी आणि आरोपी हे मित्र आहेत. आरोपीने मैत्रिणीला मंगळवारी (दि. २२) सप्टेंबर रोजी झेंडेवाडी जवळील व्हिक्टरी इन इव्हिनिंग मध्ये घेऊन आला. तिथे तिच्यासोबत अश्लील फोटो काढत ते समाज माध्यमात व्हायरल करण्याची धमकी देत बलात्कार केला. त्यानंतर दिनांक २३ सप्टेंबर रोजी पुन्हा तेच फोटो व्हायरल करण्याची धमकी देवून तिला त्याच हॉटेलच्यावर नेत तिच्यावर बलात्कार केला.
दरम्यान, घरी गेल्यावर मुलीने सर्व प्रकार कुटुंबियांना सांगितल्यानंतर कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर तेथून गुन्हा सासवड पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक वैभव सोनवणे याबाबत अधिक तपास करीत आहेत.
व्हिक्टरी इन इव्हिनिंग हॉटेल पुन्हा चर्चेत
दिवे घाटाच्या माथ्यावर पुरंदर तालुक्याच्या हद्दीत झेंडेवाडी येथे व्हिक्टरी इन इव्हिनिंग नावाने हॉटेल उभारले आहे. या हॉटेलच्या पाठीमागच्या बाजूला वर्षानुवर्षे बेकायदेशीर धंदे सुरु आहेत. येथील हुक्का पार्लरवर यापूर्वी अनेकवेळा कारवाई करून लाखो रुपयांचा माल जप्त केला आहे. आता या हॉटेलमध्ये पुन्हा असाच प्रकार घडल्याने स्थानिक नागरिकांनी हॉटेल कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी केली आहे.