संग्रहित फोटो
महेश दळवी यांचा १९ ऑक्टोबर रोजी दानोळी येथील चांदोली वसाहतीत शिवप्रेमी चौक ते सह्याद्री चौक मार्गावरील धोंडीराम गुरव यांच्या घरासमोर गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी अज्ञात कारणावरून महेश दळवी यांच्यावर गोळीबार करून त्यांना गंभीर जखमी केले. या घटनेत त्यांचा मृत्यू झाला. अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे रोहित भुपाल मगदूम (वय २६, रा. उमळवाड) संतोष भिमराव कोळी (वय २७, रा. चांदोली वसाहत, दानोळी) अनमोल सुनील करे (वय ३३, रा. कोथळी) आणि अश्विनकुमार ऊर्फ ऋषिकेश राजेंद्र भोई (वय २९, रा. सांगलीवाडी, सांगली) अशी आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक चौकशीत संशयितांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.
हे सुद्धा वाचा : अत्याचाराच्या गुन्ह्यात अटक, कोठडीत दुखापत अन् मृत्यू; सोलापुरातील घटनेनं खळबळ
संशयितांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके नियुक्त
याप्रकरणी त्यांचे भाऊ विजय बजरंग दळवी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल आणि अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली संशयितांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके नियुक्त करण्यात आली होती. तपासादरम्यान जयसिंगपूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांना गोपनीय बातमीदारामार्फत संशयित आरोपी हातकणंगले परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार ठाकूर व त्यांच्या पथकाने सापळा रचून संशयितांना ताब्यात घेतले.
Ans: शिरोळ तालुक्यातील दानोळी येथील चांदोली वसाहतीत १९ ऑक्टोबर रोजी महेश बजरंग दळवी (वय ४१) यांच्यावर गोळ्या झाडून खून करण्यात आला. मोटारसायकलवरून आलेल्या दोन व्यक्तींनी त्यांच्यावर गोळीबार केला होता.
Ans: जयसिंगपूर पोलिसांनी रोहित मगदूम, संतोष कोळी, अनमोल करे आणि अश्विनकुमार ऊर्फ ऋषिकेश भोई या चार संशयितांना अटक केली आहे. ते हातकणंगले परिसरात असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले.
Ans: शनिवारी (२४ ऑक्टोबर) न्यायालयात हजर केले असता चारही संशयितांना आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. प्राथमिक चौकशीत संशयितांनी गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.






