Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तू मला खूप आवडते, मी तुला नोकरी लावतो अन्…; पुण्यातील संतापजनक प्रकार

पुण्यातून एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. एका शिकवणी चालकाने विद्यार्थीनीशी अश्लील कृत्य केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 10, 2025 | 08:16 PM
तू मला खूप आवडते, मी तुला नोकरी लावतो अन्...; पुण्यातील संतापजनक प्रकार

तू मला खूप आवडते, मी तुला नोकरी लावतो अन्...; पुण्यातील संतापजनक प्रकार

Follow Us
Close
Follow Us:
  • राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या
  • पुण्यात शिकवणी चालकाने केला विद्यार्थिनीचा विनयभंग
  • शिकवणी चालकाला स्वारगेट पोलिसांनी केली अटक
पुणे : राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. दररोज वेगवेगळ्या भागात घटना घटना घडत असल्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशातच आता पुण्यातून एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. एका शिकवणी चालकाने विद्यार्थीनीशी अश्लील कृत्य केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. शिकवणी चालकाला स्वारगेट पोलिसांनी अटक केली आहे. सुरेश दौलत रौंदळ (वय ४६, रा. गौरव राज बिल्डींग, दत्तनगर, आांबेगाव, कात्रज) असे अटक केलेल्या शिकवणी चालकाचे नाव आहे. याबाबत एका अल्पवयीन मुलीने स्वारगेट पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित मुलगी आरोपी रौंदळ याच्याकडे शिकवणीला येत होती. स्वारगेट भागात आरोपी रौंदळ खासगी शिकवणी चालवितो. गुरुवारी (९ ऑक्टोबर) सकाळी पावणे आठच्या सुमारास मुलगी शिकवणी वर्गात एकटीच होती. त्यावेळी आरोपी रौंदळ याने मुलीशी संवाद साधला. ‘तू शिकवणी वर्गात प्रवेश घेतल्यापासून मला खूप आवडते. मी शाळा सुरू करणार आहे. तू शिक्षण पूर्ण केल्यानंतर मी तुला शाळेत नोकरी देईल तसेच तुला मी सोन्याची रिंग देणार आहे’, असे सांगून रौंदळने मुलीशी अश्लील कृत्य केले. घाबरलेल्या मुलीने याबाबतची माहिती कुटुंबीयांना दिली.

या घटनेची माहिती मिळताच सहायक निरीक्षक राहुल कोलंबीकर, उपनिरीक्षक पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. आरोपी रौंदळला ताब्यात घेऊन पोलिसांनी त्याच्यावर बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण कायद्यान्वये (पोक्सो) तसेच विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून, उपनिरीक्षक पाटील तपास करत आहेत.

हे सुद्धा वाचा : पुण्यात खळबळ! NDA मध्ये विद्यार्थ्याने उचललं टोकाचं पाऊल; गळफास लावून केली आत्महत्या

Web Title: An incident of a teacher molesting a student has taken place in pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 10, 2025 | 08:16 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

Crime News : तळेगावात गुन्हेगारीचा सुळसुळाट; कोयत्याच्या धाकाने लूट, तरुणाचे अपहरण
1

Crime News : तळेगावात गुन्हेगारीचा सुळसुळाट; कोयत्याच्या धाकाने लूट, तरुणाचे अपहरण

महाबळेश्वरमध्ये खवले मांजराच्या खवल्यांची तस्करी उघड; वनविभागाने आरोपीला सापळा रचून पकडले
2

महाबळेश्वरमध्ये खवले मांजराच्या खवल्यांची तस्करी उघड; वनविभागाने आरोपीला सापळा रचून पकडले

Pune Crime: पोटदुखीची तक्रार, तपासणीत धक्कादायक खुलासा; अल्पवयीन पाच महिन्यांची गर्भवती, सुरक्षा रक्षक भक्षक ठरला!
3

Pune Crime: पोटदुखीची तक्रार, तपासणीत धक्कादायक खुलासा; अल्पवयीन पाच महिन्यांची गर्भवती, सुरक्षा रक्षक भक्षक ठरला!

पुण्यात चाललंय काय? आयुर्वेदिक मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यावसाय; पोलिसांनी केली मोठी कारवाई
4

पुण्यात चाललंय काय? आयुर्वेदिक मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यावसाय; पोलिसांनी केली मोठी कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.