Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सांगलीतील निवृत्त बँक कर्मचाऱ्याची फसवणूक; तब्बल 22 लाखांना घातला गंडा

सांगलीतून एक मोठी बातमी समोर आली आहे. निवृत्त बँक कर्मचाऱ्याला २१ लाख ७५ हजार रुपयांना गंडा घालण्यात आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 15, 2025 | 03:33 PM
सांगलीतील निवृत्त बँक कर्मचाऱ्याची फसवणूक; तब्बल 22 लाखांना घातला गंडा

सांगलीतील निवृत्त बँक कर्मचाऱ्याची फसवणूक; तब्बल 22 लाखांना घातला गंडा

Follow Us
Close
Follow Us:

सांगली : राज्यात फसवणूकीचे प्रमाण वाढले आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून फसवणुकीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता सांगलीतून एक मोठी बातमी समोर आली आहे. निवृत्त बँक कर्मचाऱ्यास आपल्या बँक खात्यावरील व्यवहार होणार नाहीत, अशी भीती घालून ऑनलाइन ‘केवायसी’ पूर्ण करण्याचा बहाणा करीत खाते ‘हॅक’ करून २१ लाख ७५ हजार रुपयांना गंडा घालण्यात आला आहे. याप्रकरणी दिलीप मारुतीराव शिंदे (रा. प्रथमेश बंगला, घनशामनगर, सांगली) यांनी संजयनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, फिर्यादी शिंदे बँक ऑफ इंडियाचे निवृत्त कर्मचारी आहेत. नोव्हेंबर २०२४ मध्ये त्यांना एका मोबाईल क्रमांकावरून एसएमएस आला. तुमचे बँक ऑफ इंडियाचे खाते आज ‘सस्पेंड’ होईल. तुम्ही बँक व्यवस्थापक राहुल गुप्ता यांच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क सांगा, असे सांगितले. शिंदे यांनी थोड्या वेळाने दिलेल्या मोबाईल क्रमांकावर कॉल केला. तेव्हा समोरून बोलणार्‍या व्यक्तीने मी राहुल गुप्ता, हेड ऑफिस, बँक ऑफ इंडिया, मुंबई येथून बोलतो. तुमचे अकाऊंट सस्पेंड झाले असून, ते अ‍ॅक्टिव्ह करण्यासाठी केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यासाठी आधारकार्ड क्रमांक, बँकेच्या खात्याला लिंक असलेला मोबाईल क्रमांक विचारून घेतला. एक व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक देऊन त्यावर माहिती शेअर करायला सांगत मोबाईल सुरूच ठेवला. शिंदे यांनी सांगितलेल्या व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर आधार कार्ड क्रमांक, खात्याला जोडलेला मोबाईल क्रमांक, पिन क्रमांक शेअर केला.

हे सुद्धा वाचा : राणेंच्या वक्तव्यावरून शरद पवार गट आक्रमक; बॅनरमधून फडणवीसांना विचारला ‘हा’ सवाल

खात्यातून परस्पर काढली रक्कम

राहुल गुप्ता म्हणून बोलणाऱ्या व्यक्तीने तुम्ही ज्येष्ठ नागरिक असल्यामुळे तुमचे खाते ऑनलाइन करत आहे, असे सांगून मोबाईल चालू ठेवा, अशा सूचना केल्या. १५ ते २० मिनिटात प्रक्रिया पूर्ण होईल, असे सांगितले. परंतु एवढ्या कालावधीत शिंदे यांचे खातेच भामट्याने ‘हॅक’ केले. त्यानंतर त्यांच्या खात्यातील २१ लाख ७५ हजार रुपये परस्पर काढून घेतले. बँकेच्या खात्यातील मोठी रक्कम काढून घेतल्याचे दिसून येताच शिंदे यांना धक्का बसला. त्यांनी १५ नोव्हेंबर २०२४ रोजी बँकेशी संपर्क साधून हा प्रकार सांगितला. काही दिवस तांत्रिक चौकशी पूर्ण झाल्यानंतर त्यांनी ११ फेब्रुवारी २०२५ रोजी संजयनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी भामट्याविरोधात गुन्हा दाखल केला.

हे सुद्धा वाचा : पुण्यात तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न; धक्कादायक कारणही आलं समोर

Web Title: An incident of cheating of a retired bank employee in sangli has come to light nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 15, 2025 | 03:33 PM

Topics:  

  • cmomaharashtra
  • crime news
  • Froud
  • maharashtra

संबंधित बातम्या

काष्टी–सावर्डे दरम्यान रस्त्यावर झाड कोसळले; ग्रामीण वाहतुकीचा खोळंबा, स्थानिक लोकवस्ती प्रभावित
1

काष्टी–सावर्डे दरम्यान रस्त्यावर झाड कोसळले; ग्रामीण वाहतुकीचा खोळंबा, स्थानिक लोकवस्ती प्रभावित

मी विश्वास नांगरे पाटील बोलतोय…! नवी मुंबईत लोकप्रिय पोलीस अधिकाराच्या नावाने वृद्धेची 21 लाखांची फसवणूक
2

मी विश्वास नांगरे पाटील बोलतोय…! नवी मुंबईत लोकप्रिय पोलीस अधिकाराच्या नावाने वृद्धेची 21 लाखांची फसवणूक

मरकटवाडी, पाचघर सह दोन गावांचा संपर्क तुटला; गारनदीच्या पुलावर पाणी तुंबले
3

मरकटवाडी, पाचघर सह दोन गावांचा संपर्क तुटला; गारनदीच्या पुलावर पाणी तुंबले

मोखाड्यात चिकनगुनिया सदृश्य रुग्णसंख्येत वाढ; नागरिक चिंतेत
4

मोखाड्यात चिकनगुनिया सदृश्य रुग्णसंख्येत वाढ; नागरिक चिंतेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.