Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

MPSC Student Protest : मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली आंदोलनाची दखल; आयोगाच्या अध्यक्ष-सदस्यांवर कारवाईसाठी मोठी शिफारस

MPSC Student Protest : पुण्यात सुरू असलेल्या MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली आहे. आयोगाच्या माजी-विद्यमान अध्यक्ष आणि सदस्यांविरोधात संविधानाच्या कलम 317 अंतर्गत कारवाईसाठी समिती गठीत करण्याची शिफारस राज्यपालांकडे करण्यात आली आहे.

  • By विवेक
Updated On: Oct 05, 2026 | 07:00 PM
Devendra fadnavis o MPSC Protest

Devendra fadnavis o MPSC Protest

Follow Us
Follow Us:
  • MPSC अध्यक्ष आणि सदस्यांवर कारवाईसाठी समितीची शिफारस
  • संविधानाच्या कलम 317 अंतर्गत चौकशीची मागणी
  • पेपरफुटी प्रकरणामुळे पुण्यात विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू
 

MPSC Student Protest : पुण्यात MPSC च्या विविध मुद्द्यांवरून विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे. पेपरफुटी प्रकरणासह आयोगाच्या कामकाजावर विद्यार्थ्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. या आंदोलनाची आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल जिष्णूदेव वर्मा यांच्याकडे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माजी आणि विद्यमान अध्यक्ष तसेच सदस्यांविरोधात संविधानाच्या कलम 317 अंतर्गत कारवाई करण्यासाठी समिती गठीत करण्याची विनंती केली आहे.

निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती?

मुख्यमंत्र्यांनी केलेल्या शिफारशीनुसार उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्याची मागणी करण्यात आली आहे. या समितीने तीन महिन्यांच्या आत अहवाल सादर करावा आणि त्या अहवालातील निष्कर्षांच्या आधारे पुढील कार्यवाही करण्यात यावी, अशी विनंती राज्यपालांकडे करण्यात आली आहे.

MPSC Protest : रोहित पवारांचं आंदोलन ‘पॉलिटिकल स्पॉन्सर्ड’? 200 ते 250 गाड्यांमधून कार्यकर्ते आणले’, भाजप नेत्याचा गंभीर आरोप

विद्यार्थ्यांसोबत झालेल्या चर्चेदरम्यान आयोगाच्या अध्यक्षांना थेट हटवण्यापूर्वी चौकशीची प्रक्रिया आवश्यक असल्याचं स्पष्ट करण्यात आलं होतं. त्यानंतर फडणवीस यांनी समिती स्थापन करण्याची शिफारस केल्याचं सांगण्यात आलं आहे.

पेपरफुटीमुळे विद्यार्थी आक्रमक

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या अन्न व औषध प्रशासन विभागातील औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेचा पेपर फुटल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे. या पेपरफुटीचा तीन विद्यार्थ्यांना फायदा झाल्याचं समोर आलं होतं. या विद्यार्थ्यांसह अन्य आरोपींनाही अटक करण्यात आली आहे.

थेट MPSCकडून घेण्यात आलेल्या परीक्षेचा पेपर फुटल्याने स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी संतप्त झाले आहेत. आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याची मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे.

पुण्यात तीन ठिकाणी आंदोलन

MPSCच्या विविध प्रश्नांवर पुण्यात एकूण तीन ठिकाणी आंदोलन सुरू असल्याची माहिती आहे. आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखालीही विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे.

याशिवाय राज्य सेवा मुख्य परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचा पॅटर्न बहुपर्यायी असावा की वर्णनात्मक, यावरूनही विद्यार्थ्यांमध्ये वेगवेगळी मतं आहेत. त्यामुळे MPSCच्या कामकाजासह परीक्षा पद्धतीवरूनही वातावरण तापलं आहे.

महेंद्र हरपाळकर यांची सचिवपदावरून बदली

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, MPSCच्या स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी आणि क्लासचालक यांच्यात बैठक झाली होती. या बैठकीत MPSCचे सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या बदलीचं आश्वासन विद्यार्थ्यांना देण्यात आलं होतं.

त्यानुसार महेंद्र हरपाळकर यांना MPSC च्या सचिवपदावरून कार्यमुक्त करण्यात आलं आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून आणखी कोणते निर्णय घेतले जातात, याकडे लक्ष लागलं आहे. आता पेपरफुटी प्रकरण आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित होत आहेत. सरकारने समिती गठीत करण्याची शिफारस केल्याने या चौकशीतून नेमकं काय समोर येतं, हे महत्त्वाचं ठरणार आहे.

CJP Leaders Claim Arrest Plan: अभिजीत, आशुतोष, सौरवसह CJP नेत्यांना अटक करण्याचे प्लॅनिंग; बड्या नेत्याचा खळबळजनक दावा

Web Title: Mpsc student protest devendra fadnavis recommends action against commission members

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 05, 2026 | 07:00 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • MPSC
  • MPSC Paper Leak
  • rohit pawar

संबंधित बातम्या

MPSC Protest: ‘एका परीक्षेमुळे आयुष्य…..’; आंदोलक विद्यार्थ्यांच्या भेटीत सामाजिक कार्यकर्ते अभिजीत दीपके भावूक
1

MPSC Protest: ‘एका परीक्षेमुळे आयुष्य…..’; आंदोलक विद्यार्थ्यांच्या भेटीत सामाजिक कार्यकर्ते अभिजीत दीपके भावूक

काँग्रेस कार्यालयात घुसून आदिवासी विद्यार्थ्यांची धरपकड, ‘पोलिसांनी गुन्हेगारांसारखी वागणूक दिली’; NSUIचा गंभीर आरोप
2

काँग्रेस कार्यालयात घुसून आदिवासी विद्यार्थ्यांची धरपकड, ‘पोलिसांनी गुन्हेगारांसारखी वागणूक दिली’; NSUIचा गंभीर आरोप

MPSC Protest : रोहित पवारांचं आंदोलन ‘पॉलिटिकल स्पॉन्सर्ड’? 200 ते 250 गाड्यांमधून कार्यकर्ते आणले’, भाजप नेत्याचा गंभीर आरोप
3

MPSC Protest : रोहित पवारांचं आंदोलन ‘पॉलिटिकल स्पॉन्सर्ड’? 200 ते 250 गाड्यांमधून कार्यकर्ते आणले’, भाजप नेत्याचा गंभीर आरोप

Shashikant Shinde Pune MPSC Protest: दोन दिवसांत तोडगा काढा, अन्यथा रस्ता अडवू! शशिकांत शिंदेंचा सरकारला थेट इशारा
4

Shashikant Shinde Pune MPSC Protest: दोन दिवसांत तोडगा काढा, अन्यथा रस्ता अडवू! शशिकांत शिंदेंचा सरकारला थेट इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.