Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

निलंग्यात कर्जवसुलीसाठी दोघांचे अपहरण; गाडीत बसवून शेतात नेले अन्…

कर्जवसुलीच्या नावाखाली कायद्याला धाब्यावर बसवत थेट अपहरण व मारहाणीचा मार्ग अवलंबल्याची संतापजनक घटना निलंगा तालुक्यात उघडकीस आली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 16, 2026 | 03:56 PM
निलंग्यात कर्जवसुलीसाठी दोघांचे अपहरण; गाडीत बसवून शेतात नेले अन्...

निलंग्यात कर्जवसुलीसाठी दोघांचे अपहरण; गाडीत बसवून शेतात नेले अन्...

Follow Us
Follow Us:

निलंगा : कर्जवसुलीच्या नावाखाली कायद्याला धाब्यावर बसवत थेट अपहरण व मारहाणीचा मार्ग अवलंबल्याची संतापजनक घटना निलंगा तालुक्यात उघडकीस आली आहे. दोन जणांना जबरदस्तीने गाडीत बसवून शेतातील शेडमध्ये तब्बल तीन दिवस डांबून ठेवत अमानुष मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांविरोधात निलंगा पोलिस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

 

निलंगा तालुक्यातील नणंद येथील गोपाळ नारायणपूरे यांच्या फिर्यादीवरून दत्ता मोहळकर, राणा आर्य, नवनाथ मोहळकर, आदित्य कमले आणि उद्धव शिंदे या पाच जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नणंद येथील पुंडलिक व्यंकटराव भोसले यांनी भाग्यवंती फायनान्सकडून कर्ज घेतले होते. मात्र त्यांनी कर्जाची परतफेड न केल्याने त्या कर्जाचे साक्षीदार असलेल्या चक्रधर मधुकर नारायणपूरे यांच्यावर फायनान्सकडून सतत वसुलीचा दबाव टाकला जात होता. या प्रकरणात अडकू नये म्हणून गोपाळ नारायणपूरे यांनी निलंगा येथील काही व्यक्तीकडून तब्बल २१ लाख रुपये कर्ज घेऊन भाग्यवंती फायनान्सचे पैसे भरले. त्यानंतर त्यांनी घेतलेल्या कर्जाचे हप्तेही नियमित भरले. मात्र तरीही आरोपींची दादागिरी थांबली नाही.

दिनांक २६ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी आरोपी थेट नणंद गावात दाखल झाले. त्यांनी गोपाळ नारायणपूरे व साक्षीदार आण्णाराव कोरके यांना धमकावत जबरदस्तीने गाडीत बसवले. त्यानंतर दोघांना निलंगा येथील उदगीर मोड परिसरातील एका शेतातील शेडमध्ये नेऊन तब्बल तीन दिवस कैद करून ठेवले. या काळात आरोपींनी दोघांनाही निघृण मारहाण करत पैशांसाठी दबाव टाकला तसेच जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या, असे पोलिसांना सांगण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा : पुण्यात धक्कादायक प्रकार! कॉलेज तरुणावर जीवघेणा हल्ला; तरुणाच्या डोक्यात कोयता अडकला आणि…

अखेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

या प्रकरणी निलंगा पोलीस ठाण्यात दत्ता मोहळकर, राणा आर्य, नवनाथ मोहळकर, आदित्य कमले व उद्धव शिंदे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक सदानंद वाघमारे पुढील तपास करीत आहेत. कर्जवसुलीच्या नावाखाली अपहरण, कैद आणि मारहाणीचे प्रकार वाढत असल्याने निलंगा तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अशा सावकारी प्रवृत्तीवर पोलिसांनी कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

Web Title: An incident of kidnapping of two people for debt recovery has taken place in nilanga taluka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 16, 2026 | 03:55 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Kidnaped Case

संबंधित बातम्या

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…
1

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…

धक्कादायक ! गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला गंडा; 20 लाखांची केली फसवणूक
2

धक्कादायक ! गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला गंडा; 20 लाखांची केली फसवणूक

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं ! महिन्याभराच्या बाळाचा पैशांत सौदा; आईच्या तक्रारीनंतर धक्कादायक प्रकार उघड
3

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं ! महिन्याभराच्या बाळाचा पैशांत सौदा; आईच्या तक्रारीनंतर धक्कादायक प्रकार उघड

Crime News: शेटफळमध्ये एका वादातून गाव पेटलं; जवानावर सत्तूरने वार, 100 जणांचा जमाव रस्त्यावर
4

Crime News: शेटफळमध्ये एका वादातून गाव पेटलं; जवानावर सत्तूरने वार, 100 जणांचा जमाव रस्त्यावर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.