Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • बजेट 2026
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • budget 2026 |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

इन्स्टाग्रामवरील मैत्री पडली महागात; अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवले अन्…

सोशल मीडियावरील ओळख कधी धोकादायक ठरू शकते, याचे आणखी एक उदाहरण घडले आहे. इंस्टाग्रामवरून एका अल्पवयीन मुलीशी ओळख करून, तिच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 25, 2025 | 04:05 PM
इन्स्टाग्रामवरील मैत्री पडली महागात; अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवले अन्...

इन्स्टाग्रामवरील मैत्री पडली महागात; अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवले अन्...

Follow Us
Close
Follow Us:
  • राज्यात अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ
  • अल्पवयीन मुलीला इन्स्टाग्रामवरील मैत्री पडली महागात
  • बारामतीतील संतापजनक प्रकार उघडकीस
बारामती : राज्यासह देशभरात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. अशातच आता बारामतीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सोशल मीडियावरील ओळख कधी धोकादायक ठरू शकते, याचे आणखी एक उदाहरण घडले आहे. इंस्टाग्रामवरून एका अल्पवयीन मुलीशी ओळख करून, तिच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी २३ वर्षीय तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पीडित मुलीच्या आईने बारामती शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी तरुण एमआयडीसी परिसरात वास्तव्यास आहे. त्याने एप्रिल ते ऑक्टोबरदरम्यान इंस्टाग्रामद्वारे मुलीशी सतत संपर्क ठेवत तिला चॉकलेट्स व विविध भेटवस्तू देऊन तिचा विश्वास संपादन केला. फक्त १३ वर्षांची असलेल्या या अल्पवयीन मुलीला आरोपीने लग्नाचे आमिष दाखवत शरीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकारानंतर मुलीच्या कुटुंबाने धैर्य दाखवत थेट पोलिसांकडे धाव घेतली आहे. याप्रकरणी शहर पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे. पोलिसांकडून आरोपीचा शोध घेतला जात असून, अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेसंदर्भात पालकांनी अधिक जागरूक राहावे, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.

हरियाणातील नात्याला काळिमा फासणारी घटना

हरियाणाच्या फरीदाबादमधून नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली. पत्नी घर सोडून गेल्यानंतर वडील दररोज रात्री स्वत:च्या १४ वर्षीय मुलीवर बलात्कार करत असल्याची घटना समोर आली आहे. अल्पवयीन मुलगी आजारी पडल्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे. हरियाणाच्या फरीदाबाद जिल्ह्यातील बल्लभगड येथे एका ४२ वर्षीय ऑटो-रिक्षा चालकाने स्वत:च्या १४ वर्षांच्या मुलीवर वारंवार बलात्कार केल्याबद्दल अटक केली आहे. आरोपी वडिलांना अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून एक वडील आपल्या १४ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करत होता.

Web Title: An incident of molestation of a minor girl has taken place in baramati

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 25, 2025 | 04:01 PM

Topics:  

  • Arrested News
  • Baramati Crime
  • Baramati Police
  • crime news

संबंधित बातम्या

Triple Murder: घराच्या अंगणात आई-वडील Pregnant बहिणीचं पुरलं शव, ‘दृष्यम’देखील Fail; पोलिसांचीही दिशाभूल, अंगावर काटा
1

Triple Murder: घराच्या अंगणात आई-वडील Pregnant बहिणीचं पुरलं शव, ‘दृष्यम’देखील Fail; पोलिसांचीही दिशाभूल, अंगावर काटा

Crime News: पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांना चाकूचा धाक दाखवत लुटलं; मध्यरात्री जाधववाडीत खळबळ
2

Crime News: पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांना चाकूचा धाक दाखवत लुटलं; मध्यरात्री जाधववाडीत खळबळ

Crime News: ‘टीडब्ल्यूजे’ कंपनीचा मालक समीर नार्वेकर पत्नीसह अटकेत; अनेकांना कोट्यवधींचा चुना
3

Crime News: ‘टीडब्ल्यूजे’ कंपनीचा मालक समीर नार्वेकर पत्नीसह अटकेत; अनेकांना कोट्यवधींचा चुना

धक्कादायक ! शेतात जनावरे नेण्यावरून झाला वाद; तरुणाने हल्ला करत थेट शेतकऱ्याची केली हत्या
4

धक्कादायक ! शेतात जनावरे नेण्यावरून झाला वाद; तरुणाने हल्ला करत थेट शेतकऱ्याची केली हत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.