Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यात चोरट्यांचा सुळसुळाट; बस प्रवासात तब्बल 34 लाखांचे दागिने चोरले

डोंबविलीच्या सराफ कारागिराकडील तब्बल ३४ लाख रुपयांचे दागिने खासगी बस ट्रॉव्हल्समधून प्रवास करताना दोन चोरट्यांनी चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 20, 2025 | 04:50 PM
पुण्यात चोरट्यांचा सुळसुळाट; बस प्रवासात तब्बल 34 लाखांचे दागिने चोरले

पुण्यात चोरट्यांचा सुळसुळाट; बस प्रवासात तब्बल 34 लाखांचे दागिने चोरले

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : राज्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, राज्यातील वेगवेगळ्या भागातून चोरीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता एक मोठी बातमी समोर आली आहे. डोंबविलीच्या सराफ कारागिराकडील तब्बल ३४ लाख रुपयांचे दागिने खासगी बस ट्रॉव्हल्समधून प्रवास करताना दोन चोरट्यांनी चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विजापूर ते मुंबई ट्रॉव्हल्समधून प्रवास करताना ही घटना घडली असून, पाठिमागच्या सीटवर बसलेल्या दोघांनी ते चोरल्याचा संशय आहे. याप्रकरणी भेहराराम कुमावत (वय ४४, रा. डोंबिवली ईस्ट) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानूसार दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, भेहराराम हे डोंबिवली ईस्ट परिसरात सराफी कारागिर म्हणून काम करतात. येथे दागिने तयार केल्यानंतर ते विजापूर येथील काही सराफांना विक्री करतात. गेल्या दीड वर्षांपासून ते हा व्यवसाय करतात. दरम्यान, ते दागिने घेऊन विजापूर येथे गेले होते. काही दागिने विक्री केले. उर्वरित ३३ लाख ५० हजारांचे दागिने व १ लाख १२ हजार रुपयांची रोकड घेऊन ते विजापूरवरून मुंबईकडे परतत होते. ते खासगी ट्रॉव्हल्सने प्रवास करत होते. त्यांच्या पाठिमागील सीटवर दोन व्यक्ती बसलेल्या होत्या.

बस हडपसर टोल नाक्याजवळील द्राक्ष संशोधन केंद्राज‌वळ आल्यानंतर लघुशंकेसाठी थांबविली होती. तेव्हा काही पॅसेंजर खाली उतरले. तक्रारदार देखील उतरले होते. ते परत आले, तेव्हा त्यांना बॅगेतील दागिने व रोकड चोरून नेल्याचे लक्षात आले. ते मुंबईत गेले. संबंधित सराफांना याची माहिती दिली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी हडपसर पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांना प्रथम तक्रारीत तथ्य आढळले नव्हते. परंतु, पोलिसांनी प्राथमिक चौकशी केली. तेव्हा पाठिमागे बसलेले पॅसेंजर द्राक्ष केंद्रापासूनच गायब झाल्याचे लक्षात आले. तसेच, त्यांचे मोबाईल देखील घटनेनंतर बंद झाल्याचे तांत्रिक तपासातून समोर आले आहे. आता पोलीस त्या दोघांचा शोध घेत आहेत.

Web Title: An incident of thieves stealing jewelry during a bus journey has been revealed nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 20, 2025 | 04:50 PM

Topics:  

  • cmomaharashtra
  • crime news
  • Hadapsar
  • maharashtra
  • Pune Crime
  • Pune Police

संबंधित बातम्या

MPSC परीक्षेत यश मिळवणाऱ्या अश्विनी केदारी यांचे निधन, शरीराचा ८०% भाग एका वेदनादायक अपघातात भाजला
1

MPSC परीक्षेत यश मिळवणाऱ्या अश्विनी केदारी यांचे निधन, शरीराचा ८०% भाग एका वेदनादायक अपघातात भाजला

विसर्जन मिरवणुकीत वाद; शिरोलीत दोघांवर सत्तूरने सपासप वार
2

विसर्जन मिरवणुकीत वाद; शिरोलीत दोघांवर सत्तूरने सपासप वार

Crime News Live Updates : आयुष कोमकरला धडाधड 9 गोळ्या घातल्या, आरोपींबाबत धक्कादायक माहिती उघड
3

Crime News Live Updates : आयुष कोमकरला धडाधड 9 गोळ्या घातल्या, आरोपींबाबत धक्कादायक माहिती उघड

MHADA ची बंपर लॉटरी, फक्त १५ लाखांमध्ये मिळवा घर, या भागात मिळेल तुमच्या स्वप्नातील घर
4

MHADA ची बंपर लॉटरी, फक्त १५ लाखांमध्ये मिळवा घर, या भागात मिळेल तुमच्या स्वप्नातील घर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.